Skip to main content

उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो? 0605

ब्लाॅग नं.2026/126. दिनांकः 6 मे, 2026 . मित्रांनो , 50 पेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींसाठी , उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो. कारण वाढत्या वयानुसार , शरीराची तापमान नियंत्रित करण्याची क्षमता कमी होते.अशा वेळी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.त्यासाठी काय उपाय करायचे , हे आपण सविस्तर जाणून घेऊ या. सविस्तरः काही महत्त्वाचे उपाय खालील प्रमाणे आहे: 1. खाण्यापिण्याच्या सवयीः नियमित पाणी पिणे: तहान लागली नसली तरीही,दिवसातून किमान 8-10 ग्लास पाणी प्या.वृद्ध व्यक्तींमध्ये तहान लागण्याची जाणीव कमी होते , त्यामुळे पाण्याची बाटली सोबत ठेवा. ताक आणि शहाळे: ताजे ताक , शहाळ्याचे पाणी आणि कोकम सरबत यांसारखी नैसर्गिक पेये शरीराला थंड ठेवतात. प्रथिने आणि हलका आहार: पचायला जड असलेले अन्न (उदा. तळलेले पदार्थ) टाळा. वरण-भात , मुगाची खिचडी , नाचणीचे सत्व यांसारखे हलके आणि पौष्टिक पदार्थ घ्या. 2. ऊन आणि उष्णतेपासून संरक्षण: वेळेचे नियोजन: दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडणे टाळा. जर काही महत्त्वाचे काम असेलच , तर सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा पूर्ण करा. पेहराव: सैल , फ...

पुस्तक परिचय :- न्यू पाथ फाइंडर

 

पुस्तकाचे नांव:- न्यू पाथ फाइंडर

लेखक :- श्री. गौतम कोतवाल            

प्रकाशक:- ग्रीन वर्ल्ड पब्लिकेशन 

परिचयकर्ता:- प्रसाद नातु, पुणे.   

मूल्य:- 280     

पृष्ठ संख्या:- 303     

    आज पुस्तक प्रेमी समूहातील  गौतम कोतवाल ह्यांच्या पुस्तकाचा मी परिचय करून देत आहे. 29 ऑगस्ट 2021 ला  दाखल झालेले गौतम सर एक प्रथितयश बँकर आणि लेखक आहेत.  

    नुकताच श्री. गौतम कोतवाल यांच्याशी ग्रीन वर्ल्ड पब्लिकेशन आणि कॉसमॉस सहकारी बँकेच्या विद्यमाने वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात माझी भेट झाली.ह्या कार्यक्रमात श्री. कोतवाल ह्यांनी लिहिलेल्या काही पुस्तकांना चाळता आले. “न्यू पाथ फाइंडर” हे पुस्तक माझ्या नजरेस आले. सहज कुतुहुल म्हणून मी चाळले आणि मनांत आलं ह्या पुस्तकाचा परिचय फेसबुक वर करून द्यावा.  

    ह्या पुस्तकांस डॉ. विठ्ठल जाधव,माजी पोलिस संचालक ह्यांची प्रस्थावना लाभली आहे. डॉ.जाधव सरांनी लिहिले आहे की, समाजात आशा अनेक युवक-युवती,शालेय विद्यार्थी तसेच शहरी आणि ग्रामीण भागातील अनेक व्यक्ती, बेरोजगार आहेत. जे आयुष्यात स्वतः काही तरी घडविण्यासाठी, बनण्यासाठी धडपडत असतात.प्रामाणिक प्रयत्न करीत असतात. अशाच धडपडणाऱ्या व्यक्तीचा ह्या पुस्तकात,ज्याला डॉ.जाधव सरांनी चरित्रग्रंथ म्हटले आहे,समावेश आहे.अशा 28 जणांचा ह्या चरित्रग्रंथात अंतर्भाव आहे.

    गौतम सरांनी ह्या कर्तृत्ववान लोकांच्या यशोगाथा ह्या पुस्तकांत मांडल्या आहेत. अशा कर्तृत्ववान लोकांचे कर्तृत्व समाजासमोर आणण्याचे एक महत्वाचे काम त्यांनी केले आहे. कर्तृत्ववान लोकांनाच नाही तर इतरांना देखिल ह्यापासून प्रेरणा मिळू शकते. म्हणूनच गौतम सरांचा हा एक स्तुत्य उपक्रम आहे. जो पुस्तक परिचयाच्या वाचकांपर्यंत पोहोचावा हा उद्देश.

    ह्यातील पहिला परिचय श्री उदय बोरावके ह्यांचा आहे.अष्टपैलू कृषिपुत्र असा त्यांनी बोरावके ह्यांचा उल्लेख केला आहे. समृद्धीचा मार्ग गावाकडे वळावा असे बोरावके ह्यांना मनापसून वाटते.अर्थात बऱ्याच लोकांना बरेच काही वाटत असते.पण ते विचार स्वतः अंमलात आणणारे बोरावके ह्यांनी “फार्म तो फोर्क” हे मॉडेल शासनासमोर मांडले आहे. गांव पातळीवर Agri Business Hub च्या स्थापनेचा पुरस्कार हयातून केला आहे. आजपर्यन्त नांदेड जिल्ह्यातील वडाळा 3200 एकर क्षेत्रातील 30 शेतकरी गटांना त्यांनी बोरावके मॉडेल स्थापन करण्यासाठी मार्गदर्शन केले आहे.

    श्री. कुमार सुरेश अन्वेकर ह्यांच्यावर दूसरा लेख आहे. ह्या लेखात 31 वर्षांचा तरुण पुणे शहरात येतो आणि उत्कृष्ट बनावटीच्या व पारंपरिक मोत्याचे दागिन्यांचा घाऊक पुरवठादार म्हणून प्रतिष्ठित पेढी कसा उभारतो हे सर्व जाणून घेणे.खरोखर वाचनीय आहे.

   आपटे मोटर ड्रायविंग स्कूलच्या विलास आपटे ह्यांचा परिचय देखिल असाच प्रेरणादायक आहे. सन 1921 मधे सुरु केलेली संस्था आज देखिल आपटे ह्यांची चौथी पिढी चालवीत आहे. आपटे मोटर ड्रायविंग स्कूल हा पुण्यातील एक ब्रॅंड बनल्याचे लेखक लिहितात. बदलत्या काळानुसार त्यांनी आपल्या व्यवसायात योग्य ते बदल केले. सोबतच सामजिक बांधीलकीचे भान देखिल ही संस्था बाळगून आहे, हे विशेष.

    श्री.दिनेश भागवत हे माळवाडी दौंड जिल्हा पुणे येथील रहिवासी. त्यांचे वडील सीताराम भागवत हे ह्या भागातील बडं प्रस्थ. त्यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि इतर अनेक महत्वाची पदे भूषविली. त्यांच्या आकस्मिक निधनाने भागवत कुटुंबावर संकट कोसळले. शेतीचे विभाजन झाले.  29 एकर शेती वाट्याला आली,त्यातील निम्मी कोरडवाहू. शेतीच्या तुटपुंज्या उत्पन्नास जोड म्हणून त्यांनी राजेंद्र थोरात ह्यांच्यासोबत बगॅस वाहतुकीच्या व्यवसायास सुरुवात केली.त्यांची ह्यानंतरची झेप खरोखर वाखणण्यासारी आहे. पण हे सारे तुम्हाला पुस्तकांतच वाचावे लागेल.

    श्री.धीरज छाजेड हे अशाच उमद्या व्यक्तिमत्वापैकी एक. उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशांत जाऊन ते शिक्षण आटोपलयांवर तिथे स्थायिक न होता. आपल्या देशात परतून ‘Abhi Impact Logistic Solutions Limited ह्या कंपनीच्या देशांत व परदेशांत ग्राहकांचे विस्तृत जाळे त्यांनी विणले आहे. Custom Clearance, transportation, यार्ड मॅनेजमेंट, bonded वेअर हाऊस मॅनेजमेंट ह्या सारख्या सुविधा ही कंपनी पुरविते.

    काही व्यक्तीचे कर्तृत्व खरोखर अफाट असते. व्यंकट गायकवाड हे त्यापैकीच एक 21 ऑक्टोबर 1951 चा जन्म. सिविल इंजीनीरिंगमधे बीई. त्यानंतर एमपीएससी परीक्षा देऊन क्लास वन म्हणून सेवेत रुजू. पुसद तालुक्यातील इसापूर ह्या गावी 80 मीटर उंचीचे धरण बांधण्याच्या कामात इनचार्ज. नांदेड जवळ गोदावरी नदीवर बांधण्यात आलेल्या विष्णुपुरी ह्या प्रकल्पाचे काम त्यांनी पूर्ण केले. लातूर, बीड आणि उस्मानाबाद ह्या तीन जिल्हयाचे अधीक्षक अभियंता, कुकडी प्रकल्पाची जबाबदारी, कोयना धरणाचे धरणाचे मजबूतीकरण आदि महत्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी भूषविल्या.

    अभिजीत घुले पाटील ह्यांचा शेतकरी कुटुंबात जन्म. आधी घुले पाटील लँड developers कंपनी आणि त्यानंतर जीपीएलडी इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रा.लि. ची स्थापना. सोलापूर औरंगाबाद महामार्गाचे बीडजवळील 28 किमी चौपदरीकरणाचे काम ही मोठी उपलब्धी. 

       ह्या पुस्तकांत इतर अनेक जणांच्या बद्दल सविस्तर माहिती दिली आहे. पण ब्लॉग केवढा असावा ह्याला काही मर्यादा आहेत म्हणून इतर व्यक्तींचा परिचय मी दोन-तीन ब्लॉग मधे करून देईन.  

    प्रतिकूल परिस्थितीत देवाला आणि दैवाला दोष न देता मेहनत, जिद्दीच्या जोरावर ह्या सर्वांनी जे मिळविले आहे. ते निश्चितच प्रेरणादायी आहे. यात शंका नाही


   आजकाल पेपर उघडून पाहिला, की निराशा येते. काही वेळेस जेव्हा समाजात काहीच चांगले घडत नाही. असे वाटायला लागले तर समाजात असेही लोक आहेत. जे काही तरी चांगले घडविण्याचा प्रयत्न करीत असतात.हे असे पुस्तक वाचले की ते कळते.गौतम सरांनी ह्या लोकांना प्रकाशात आणण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे वाटते. 

    ह्या नंतर इतर प्रेरणादायी व्यक्तींचा परिचय घेऊन येत आहे. पुढच्या भागात. तो पर्यन्त नमस्कार.  

क्रमशः 


                                                                                                                                प्रसाद नातु , पुणे 

Comments

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...