Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

चला ई-बुक वाचू या



 Blog No.2023/320
Date:-29th, December,2023.

मित्रांनो,

            सकाळी सकाळी मनांत आलं,आज जरा वेगळ्या विषयाकडे तुम्हाला घेऊन जायचे. शहरात प्रामुख्याने भेडसावणारी समस्या,रहायला मनाप्रमाणे घर मिळणे.घर म्हणजे पूर्वी ज्याला घर म्हणत असतं,ते स्वतःचे वेगळे असे घर ही कल्पना शहरात तरी दुर्मिळ आणि महाग झालेली आहे.आता घर म्हणजे वन, टू किंवा थ्री बीएचके फ्लॅट.त्यात दर काही महिन्यांनी वाढत जाणारा टी.व्ही.चा आकार,आजकाल एकमेकांच्या घरी सहकुटुंब गप्पा मारायला जाणे वगैरे प्रकार, दुर्मिळ होत चालला असला,तरी कुणी आलंच तर बसायला म्हणून घेतलेले मोठमोठाले सोफे.कितीही मोठा फ्लॅट घेतला तरी जागा पुरेशी पडत नाही,ही समस्या. भिंतीतील कपाटे ही कल्पना देखिल दुर्मिळ होत चालली.आधी कमीतकमी दोन विटांच्या भीती असतं,आता एका विटेची भिंत,त्यामुळे भिंतीतली कपाटे बघायला मिळतं नाहीत.

            आज काल कुणी पुस्तकं वाचत नाही,अशी ओरड असते.पण वास्तविकता तशी नाही, लोक वाचतात. जिथे शक्य आहे तिथे लायब्ररी लावून पुस्तके वाचली जातात. तरुण मंडळी ई-बूक वाचतात.आमचा जो पुस्तक प्रेमी समूह (व्हॉटस् अप ग्रुप)  आहे,त्यात सीनियर मंडळी सोबत बरीच तरुण मंडळी आहेत,जी वाचनात मागे नाहीत ती ई-बूक वाचतात.पण बरेच लोक पूर्वी वाचत असतं,त्यांनी गावात चांगले वाचनालय नाही किंवा शहरात ते रहातात तिथे वाचनालय नाही, पुस्तकं विकत घेतली तर ठेवायला जागा नाही,म्हणून वाचन सोडले आहे.अशा सर्व लोकांसाठी हा लेख मी लिहीत आहे. असे समजा लागेल तर. आजकाल अँन्ड्रॉईड मोबाईल नाही असे फार कमी लोक आढळतील.त्यामुळे ह्या लोकांनी आता आपली वाचनाची आवड भागविण्यासाठी, ई-बूक वाचणे सुरु करावे असे मला वाटते.

            आजकाल Amazon च्या Kindle वर खूप सारी पुस्तके उपलब्ध आहेत आणि पहिल्या पॅराग्राफमधे सांगितल्याप्रमाणे पुस्तके विकत घेतली तर ठेवायला जागा नाही,म्हणून वाचणे सोडायचे ही जरूरी नाही. आपल्याला ई-बूक ही खूप छान सोय उपलब्ध झाली आहे.ई-बूक वाचण्यासाठी काय काय करायला हवे, हे सविस्तर खालील प्रमाणे:-

1 तुमच्याकडे कमीतकमी अँन्ड्रॉईड मोबाईल सेट असायला हवा.

2 तुमच्या अँन्ड्रॉईड मोबाईलवर तुम्हाला प्ले स्टोर वरुन Amazon आणि Kindle app डाउनलोड करावे लागेल.

3 Kindle वर prime रीडिंग बूक आणि ई-बूक उपलब्ध असतात. पण prime रीडिंग बूक ही ई-बूकच असतात.

4 तुम्हाला Amazon वरुन ई-बूक विकत घेण्याची गरज नाही. त्यासाठी तुम्हाला Kindle Unlimited चे सब्स्क्रिप्शन विकत घ्यावे लागते. ह्याचे शुल्क असते,1 महिन्यासाठी रु.199/- 6 महिन्यासाठी रु.999/- आणि 12 महिन्यासाठी रु.1799/-. पण हे शुल्क भरले की, तुम्हाला Amazon वर फ्री मधे ई-पुस्तक विकत घेता येते. एकदा हे Kindle Unlimited चे सब्स्क्रिप्शन विकत घेतले की तुम्हाला तुमच्या सब्स्क्रिप्शन चा कालावधी संपेपर्यन्त जास्तीतजास्त इतकीच ई-पुस्तके ववाचता येतील,असे बंधन नाही.अगदी रु. 100/- चे एक अशी 18 ई-पुस्तके वर्षभरात वाचून झाली की पैसे वसूल आणि त्यावरील वाचलेली ई-पुस्तके हा बोनस.मी गेल्या वर्षभरात 22 ई-पुस्तके वाचली.भाषेचे बंधन नाही. तुम्ही कुठल्याही,तुम्हाला येत असलेल्या भाषेतील ई-पुस्तक वाचू शकता. वर्षभरचे सब्स्क्रिप्शन फायदेशीर कारण त्यात रु.600/-चा डिस्काऊंट मिळतो.   

5  ज्याना पुस्तक वाचायची जास्त आवड आहे, त्यांच्यासाठी Amazon वर Kindle टॅब्लेट सुद्धा उपलब्ध आहे. त्याचा आकार मोठा असतो. जास्त कम्फर्टने वाचता येते.त्याची किंमत रु.9000/- पासून पुढे आहे.ज्यांना परवडत असेल ते असे देखिल करू शकता. मी मोबाईलवर वाचतो.पण हा देखिल एक पर्याय आहे.         

6 चला तर मग, नवे वर्ष जवळ येत आहे.नव्या वर्षाचा नवीन संकल्प करा.ह्यापुढे मी ई-बूक वाचायला सुरुवात करेन. मी प्ले स्टोर वरुन Amazon आणि Kindle app डाउनलोड करेन. Kindle Unlimited चे सब्स्क्रिप्शन विकत घेईन.

लागेल तर सुरुवातीला एक महिन्याचे  सब्स्क्रिप्शन घेऊन बघा. एक रु.200/- चे ई-पुस्तक घेऊन वाचायला सुरुवात करा. 

     आजचा ब्लाॅग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बाॅक्समधे लिहा. पुन्हा भेटूया एका नव्या ब्लाॅग मधे.तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. मस्त रहा, स्वस्थ रहा, आनंदी जगा.


प्रसाद नातु, पुणे.                                          

Comments

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...