Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

अजूनही माणुसकी जीवंत आहे.




मित्रांनो,

            कधी कधी मनुष्य छोट्या छोट्या गोष्टीतून खूप काही शिकून जातो आणि कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी मनुष्याला स्वतःला कठोर म्हणणाऱ्या माणसाला भावनिक बनवितात. सध्या मी विदर्भात आलोय. खरं तर हा विदर्भ दौरा मी सेवानिवृत्ती नंतर यावे अशा इराद्याने ठरविला होता. पण त्या वेळी कोरोंनाने थैमान घातले आणि man proposes and god disposes चा अनुभव घेतला.आता जवळपास पावणे तीन वर्षानंतर तो दौरा प्रत्यक्षात उतरला.कदाचित समृद्धी महामार्गाची वाट पहात असेल. समृद्धी महामार्गाने खरोखर नागपूर जवळ आल्याचे जाणवले.अवघ्या 9 तासात,त्यातले साडेचार तास पुणे औरंगाबादला लागले, नागपूरला पोहोचलो. 

अमरावतीस मित्राच्या मुलाच्या लग्नाला 

            18 ला माझ्या एक घनिष्ठ मित्राच्या मुलाचे लग्न अमरावतीला होते. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग नंबर 6 ने अल्पावधीत अमरावतीस पोहोचलो. माझ्या नोकरीच्या अगदी सुरुवातीच्या काळातील मित्रांच्या भेटीने जुन्या आठवणी जागवल्या. “गेले ते दिन गेले’ हे गाणे ओठांवर तरळून गेले. आताच्या पेक्षा लोक एकमेकांच्या किती निकट होते, ते तसे दिवस पुनः येणे नाही.ह्या बाबतीत कधी
काळी एखाद्या विषयासंबंधात चर्चा झाल्यावर एकमत न होणाऱ्यांचे आज चक्क एकमत झाले होते.नव्या युगातील मोबाईल मात्र भाव खाऊन गेला.कारण मित्रांचे हे असे एकत्र येणे सेल्फीने सेव केले, कॅमेराबद्ध केले.

अमरावती ते वर्धा प्रवास 

            पुण्यापासून निघून जवळपास 850 किमी प्रवास छान झाला होता. रस्ते आजकाल खूप छान झालेत असे मत झाले असताना,आम्ही येतांना चांदूर रेल्वे मार्गे वर्ध्याला यायला निघालो. तळेगाव (द) पर्यन्त प्रवास छान सुरु होता आणि अचानक खड्डे दिसू लागले.अतिशय खराब रस्ता कदाचित चांगल्या रस्त्यांना दृष्ट लागू नये म्हणून ठेवल्यासारखा.त्याने कारचे टायर पंक्चर झाले.अगदी बसलेच इतका मोठा खड्डा. 6-6.15 ची वेळ. अंधार पडलेला.रोडच्या बाजूला कार उभी करावी तर जागा दिसेना. एक टायर लटकविलेले दुकान दिसले, तिथे कार उभी केली. रस्त्यावर दोन्ही बाजूने वर्दळ खूप होती पण कामाचा कुणीच नव्हता.अगदी मुकेशचे गाणे “है भीड इतनी पर डील अकेला” आठवून गेले.    

प्रवासात विघ्न            

 अंधारात अचानक लक्ष समोरच्या पेट्रोल पंप कडे गेले. कार कशी बशी तिथपर्यन्त नेली. तिथे एक 20-22 वर्षाचा तरुण मुलगा खुर्चीवर बसून होता. येणाऱ्या जाणाऱ्याला पेट्रोल भरून देत होता. त्याला म्हटले जरा मदत करतोस कां? तो लगेच तयार झाला. डिक्कीत सामान बरेच होते. ते मागच्या सीटवर ठेवले आणि स्टेपनीचे टायर बाहेर काढले. चाकाचे स्क्रू, फिट करण्याच्या मशीनने घट्ट केलेले असल्याने जरा वेळ लागत होता. त्यात तो मधेच त्याच्या ग्राहकांना पेट्रोल भरून देत होता. मधेच स्क्रू ढिले करीत होता.मधे मधे त्याचे जे मित्र पेट्रोल भरायला,त्यांची गाडी घेऊन आले होते,ते देखिल स्क्रू ढिले करायला मदत करीत होते. त्या टायरला ढिले करण्यासाठी असंख्य हात लागले होते. एक सवा तास तो तरुण मुलगा अशी दुहेरी कसरत करीत होता.शेवटी चाक निघाले,त्याने दुसरे चाक लावले.एक दीड किमी वर असलेल्या पेट्रोल पंपावर,पंक्चर सुधरवून घ्या असे म्हणत तो आपल्या कामाकडे निघाला.   

माणुसकीचा परिचय 

            तो जात असतांना मी त्याला आवाज देऊन बाजूला बोलविले.कृतज्ञतेपोटी रु. 500/- देऊ केले.त्याने मोठ्या विनम्रतेने नकार दिला आणि म्हणाला तुमच्या सारख्यांची सेवा करायला मिळावी,ह्या साठीच माझी रात्रीची ड्यूटी ही योजना असावी कदाचित.शहरात जिथे जवळचे सुद्धा परक्यासारखे वागतात.तिथे इतकी निर्व्याज माणुसकी माझ्या नकळत माझे डोळे पाणावले. मनात आलं अजूनही माणुसकी जीवंत आहे.निघता निघता त्याचे नांव विचारायला मी विसरलो नाही,पण त्याचा फोन नंबर विचारायचा राहिला,ह्याची खंत लागून राहिली आहे.          

                                                                                                                            प्रसाद नातु, पुणे                                                                                         

                                                             

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...