Skip to main content

उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो? 0605

ब्लाॅग नं.2026/126. दिनांकः 6 मे, 2026 . मित्रांनो , 50 पेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींसाठी , उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो. कारण वाढत्या वयानुसार , शरीराची तापमान नियंत्रित करण्याची क्षमता कमी होते.अशा वेळी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.त्यासाठी काय उपाय करायचे , हे आपण सविस्तर जाणून घेऊ या. सविस्तरः काही महत्त्वाचे उपाय खालील प्रमाणे आहे: 1. खाण्यापिण्याच्या सवयीः नियमित पाणी पिणे: तहान लागली नसली तरीही,दिवसातून किमान 8-10 ग्लास पाणी प्या.वृद्ध व्यक्तींमध्ये तहान लागण्याची जाणीव कमी होते , त्यामुळे पाण्याची बाटली सोबत ठेवा. ताक आणि शहाळे: ताजे ताक , शहाळ्याचे पाणी आणि कोकम सरबत यांसारखी नैसर्गिक पेये शरीराला थंड ठेवतात. प्रथिने आणि हलका आहार: पचायला जड असलेले अन्न (उदा. तळलेले पदार्थ) टाळा. वरण-भात , मुगाची खिचडी , नाचणीचे सत्व यांसारखे हलके आणि पौष्टिक पदार्थ घ्या. 2. ऊन आणि उष्णतेपासून संरक्षण: वेळेचे नियोजन: दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडणे टाळा. जर काही महत्त्वाचे काम असेलच , तर सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा पूर्ण करा. पेहराव: सैल , फ...

पुस्तके आणि पुरस्कार

 



मित्रांनो                


                आज एका वेगळ्या विषयावर मी हा ब्लॉग लिहीत आहे. माझी आज पर्यन्त एकूण 8 पुस्तके प्रकाशित झाली. सहा कथासंग्रह आणि दोन कादंबऱ्या. दृश्य-अदृश्य, सुनयना, होस्ट इज घोस्ट, चित्र आणि चेहरा, कथास्टक आणि मिली हे सहा कथासंग्रह आणि राणी तेजस्विनी व सहप्रवासी ह्या दोन कादंबऱ्या. त्या निमित्ताने पुस्तके आणि पुरस्कार ह्यांचा खूप जवळून संबंध आला आणि पुस्तकांना मिळणारे पुरस्कार किती अनमोल (?) असतात, ते पहिल्यांदाच कळून आले. ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार, युवा पुरस्कार, सरस्वती सन्मान, क्रॉसवर्ड बुक्स अवॉर्ड इत्यादि सारखे सन्माननीय अपवाद वगळूया.

            मी एकदा फेसबूक पहात बसलो होतो.वाचनात आले,“इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर सेल्फ पब्लिशिंग ऑथर्स”, आपले नामांकन आताच सादर (submit) करा. मी त्यात दिलेला फॉर्म भरायला सुरुवात केली.नावं,गावं, मोबाईल नंबर,ईमेल आयडी,मग ज्या पुस्तकासाठी नामांकन सादर करावयाच आहे त्याचे नावं इत्यादि भरून झाले. ते सबमिट केले. मग पुढे जे पेज आले ते पाहून मला आश्चर्याचा धक्का बसला. पेमेंट डिटेल्स मधे मला डेबिट किंवा क्रेडिट कार्डचे डिटेल्स टाकून $110 चे पेमेंट करायचे होते आणि माझ्या पुसकाची पीडीएफ अपलोड करावयाची होती. म्हणजे थोडक्यात आजच्या तारखेत आजच्या युएसडी च्या रेट प्रमाणे रु.9100/- दिल्यावर मला माझ्या पुस्तकासाठी “इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर सेल्फ पब्लिशिंग ऑथर” मिळाले असते. म्हणजे त्यासाठी पात्रता काय तर रु.9100/- देऊन तो पुरस्कार मी विकत घ्यायचा.

            मग गुगलवर अधिक सर्च केल्यावर कमी अधिक प्रमाणात आजकाल पुरस्कार मिळविण्याची हीच पद्धत आहे,हे लक्षांत आले.ह्यासाठी एखाद्या मंडळाला शोधायचे,त्या मंडळाला किंवा संस्थेस देणगी द्यायची.त्यातून ते तुम्हाला पुरस्कार देणार.तुमच्या जवळ जेवढे पैसे अधिक तेवढे तुमच्या पुस्तकांना पुरस्कार अधिक, असे समीकरण आहे. अन्यथा जी पुस्तके बाजारात येऊन 1-2 महिने झाले नाहीत आणि ती वाचकांना माहिती झाली नाहीत अशा पुस्तकांना पुरस्कार कसे मिळतात,ह्याचे मला जे कोडे पडले होते, त्याचे उत्तर मला फेसबुक मुळे मिळाले.      



            “इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर सेल्फ पब्लिशिंग ऑथर” साठी जे कुणी सेल्फ पब्लिशिंग ऑथर (लेखक) इच्छुक असतील ते माझ्याशी कमेन्ट बॉक्स मधे आपला ईमेल आयडी देऊन त्या संबंधीचे डिटेल्स मिळवू शकता.मला अशा पुरस्कार विकत घेण्यात रस नसल्याने मी अजून पावेतो असा प्रयत्न केला नाही.पण प्रत्यक्ष संपर्क करून त्या बद्दल अधिक माहिती मला जाणून घ्यायला आवडेल,म्हणून मी एका साइटला जाऊन पूर्ण माहिती घेतली.वर लिहिल्या प्रमाणे सारे काही सबमिट केले, मॅन्युस्क्रिप्ट आणि कवर पेज अपलोड केले,शेवटी पेमेंट करायचे होते, $ 230, तिथून मी परत फिरलो.

            तुमच्या प्रतिक्रिया ह्या ब्लॉगच्या कमेन्ट बॉक्स मधे पोस्ट करा. ज्यांना पुरस्कार मिळविण्यात रस असेल त्यांनी कमेन्ट बॉक्स मधे आपला ईमेल आयडी द्यावा.पैसे भरल्यावर पुरस्कार मिळायला हवा. मी अजून खात्री करून घेतलेली नाही. त्यामुळे आपण स्वतःच्या जबाबदारीवर ही जोखीम उचलावी हे येथे नमूद करू इच्छितो.

 

माहिती सौजन्य :-@google,com                                                                                      प्रसाद नातु,पुणे                                                                                                                  

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...