ब्लाॅग नं.2026/126. दिनांकः 6 मे, 2026 . मित्रांनो , 50 पेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींसाठी , उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो. कारण वाढत्या वयानुसार , शरीराची तापमान नियंत्रित करण्याची क्षमता कमी होते.अशा वेळी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.त्यासाठी काय उपाय करायचे , हे आपण सविस्तर जाणून घेऊ या. सविस्तरः काही महत्त्वाचे उपाय खालील प्रमाणे आहे: 1. खाण्यापिण्याच्या सवयीः नियमित पाणी पिणे: तहान लागली नसली तरीही,दिवसातून किमान 8-10 ग्लास पाणी प्या.वृद्ध व्यक्तींमध्ये तहान लागण्याची जाणीव कमी होते , त्यामुळे पाण्याची बाटली सोबत ठेवा. ताक आणि शहाळे: ताजे ताक , शहाळ्याचे पाणी आणि कोकम सरबत यांसारखी नैसर्गिक पेये शरीराला थंड ठेवतात. प्रथिने आणि हलका आहार: पचायला जड असलेले अन्न (उदा. तळलेले पदार्थ) टाळा. वरण-भात , मुगाची खिचडी , नाचणीचे सत्व यांसारखे हलके आणि पौष्टिक पदार्थ घ्या. 2. ऊन आणि उष्णतेपासून संरक्षण: वेळेचे नियोजन: दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडणे टाळा. जर काही महत्त्वाचे काम असेलच , तर सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा पूर्ण करा. पेहराव: सैल , फ...
Blog No.2023/2 25 Date:- 27 th , August 2023. मित्रांनो , नुकतंच आपण एका महान गायकाची जन्मशताब्दी साजरी केली. दर्दभऱ्या आवाजाचा हा गायक ज्याने आपल्या आवाजाने जवळपास 30 वर्षे चित्रपटसृष्टी गाजविली.त्या गायकाचे 27 ऑगस्ट 1976 रोजी डेट्रॉईट , मिशिगन , अमेरिका येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.आज त्या गायकाची 47 वी पुण्यतिथि ,तुम्ही ओळखले असेलच की तो गायक म्हणजे दूसरा तिसरा कुणी नसून स्व. मुकेश हे आहेत. आज त्यांची पुण्यतिथी. त्यानिमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठीचा हा ब्लॉग. मुकेश यांचे वैयक्तिक जीवन:- मुकेश यांचा जन्म २२ जुलै १९२३ ला दिल्ली येथे माथुर कायस्थ कुटुंबात झाला.त्यांचे वडील जोरावर चंद माथूर हे अभियंता होते.त्यांच्या आईचे नावं चंद्राणी माथूर होते.दहा मुलांमध्ये ते सहावे. मुकेशची बहीण सुंदर प्य...