Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना आणि आपण

 Blog No.2023/224             

Date:- 26th, August 2023. 

मित्रांनो,

            एका महत्वाच्या विषयावर ब्लॉग लिहावा असं माझ्या मनात कित्येक दिवसांपासून आहे.भारत सर्व बाबतीत प्रगती करतो आहे. पण एका बाबतीत मात्र अजूनही देश मागे आहे. ते म्हणजे भारतातील न्यायालयात प्रलंबित खटल्यांची संख्या. देशात एकूण 5.02 कोटी एवढ्या केसेस प्रलंबित आहेत. त्यातील 59.00 लाखांच्या वर हायकोर्टाकडे प्रलंबित आहेत आणि 70 हजार केसेस सुप्रीमकोर्टात प्रलंबित आहेत.

 प्रास्ताविक

            भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना  (Preamble of Indian Constitution) भारत एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक असल्याचे घोषित करते. प्रस्तावनेत नमूद केलेली उद्दिष्टे म्हणजे सर्व नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि राष्ट्राची एकता आणि अखंडता राखण्यासाठी बंधुभाव वाढवणे.

न्याय

          भारतीय राज्यघटनेच्या नावाने रोज कंठशोष करणाऱ्यास या निमित्ताने सांगावेसे वाटते की,प्रस्तावनेत नमूद केलेली उद्दिष्टे म्हणजे सर्व नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि राष्ट्राची एकता आणि अखंडता या पैकी एकाचे सुद्धा पालन स्वातंत्र्य मिळल्यापासून होतं आहे कां? देशात 5.02 कोटी लोक न्यायापासून वंचित आहे.मोठ मोठे खटले पटापट सुनावणी साठी पुढे येतात. Justice delayed is denied. काही लोक तर कित्येक वर्षापासून जेलमध्ये आहेत. ज्यांचा राहण्याचा खर्च सरकार करत असतं.असं कां? देशातील प्रत्येक नोकरी करणाऱ्या नोकरदाराला आपल्या नोकरीत उत्तरदायित्व (Accountability) या गोष्टीस एकदा तरी सामोरे जावे लागते.मग न्यायदानाच्या बाबतीत उत्तरदायित्व नाही कां? एवढ्या केसेस प्रलंबित म्हणजे सगळ्यांना न्याय हे उद्दिष्ट पाळले जात नाही.

स्वातंत्र्य

स्वातंत्र्य ही नको त्या बाबतीत आहे. म्हणजे राष्ट्रपती किंवा पंतप्रधान यांना शिव्या देण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. जो आपल्या गल्लीत सुद्धा निवडून येऊ शकत नाही. असा माणूस मुख्यमंत्री,पंतप्रधानांना शिव्या देतो आणि ते कसे चुकतात हे सांगतो. ज्याला स्वतःच्या संसाराचा आर्थिक डोलारा कधी सांभाळता आला नाही तो अर्थमंत्र्यांना अर्थव्यवस्थेवर आणि जीडीपीवर शहाणपणा शिकवतो हे स्वातंत्र्य आहे.पण तो स्वतःच्या नोकरीतल्या साहेबांना तुम्ही चुकताहात हे सांगू शकत नाही.लोवर कोर्टातल्या अपीलमध्ये त्या कोर्टाच्य निर्णयाच्या चिंध्या फाडल्या जातात.पण सामान्य माणूस जाहीरपणे कोर्टाविरुद्ध बोलला की Contempt of Court. ब्रिटिश जाऊन 76 वर्षे झाली आता Contempt of Court ही जायला हवे. कारण तेव्हा कोर्टचे जज हे  ब्रिटिश असायचे किंवा त्यांचे हुजरे आणि जनता ही गुलाम होती. गुलामांनी कोर्टाच्या निर्णयाच्या विरुद्ध बोललं तर Contempt of Court साहजिकच होतं.म्हणजे स्वातंत्र्य पूर्णतः नाही.

समानता

       समानतेविषयी न बोललेल बरं.निवडणूक लढविण्याचा अधिकार खूनी, दहशतवादी, गुन्हेगाराला आहे. पण वर्षानुवर्षे आपली नोकरी सांभाळणाऱ्याला मात्र नोकरी सोडल्याशिवाय निवडणूक लढविता येतं नाही. ही समानता आहे कां? एखाद्याला एकापेक्षा जास्त पत्नी करण्याचा अधिकार आणि एखाद्याला एकपत्नी व्रत असे कां? ही समानता आहे कां? म्हणजे समानता हे वैशिष्ट देखिल पाळले जात नाही. समान नागरी कायदा हा राज्यघटनेच्या भाग IV चा एक भाग आहे.ज्यामध्ये राज्य धोरणाची निर्देशक तत्त्वे (DPSP) समाविष्ट आहेत. DPSP मधील कलम 44 म्हणते की "राज्य संपूर्ण प्रदेशात नागरिकांसाठी समान नागरी संहिता सुरक्षित करण्याचा प्रयत्न करेल.हे घटनेत आहे मग याला विरोध कां?

एकता आणि अखंडता     

राष्ट्राची एकता आणि अखंडता कशी मोडीत काढली जाईल,यासाठी बरेच जण प्रयत्न करीत आहे. तामिळनाडूचे एक मंत्री वेलू आपल्या भाषणात म्हणाले होते: "एकेकाळी, भारत या शब्दाचा आपल्यावर फारसा प्रभाव पडला नाही... भारत जणू काही उत्तरेकडील एक जागा आहे... आमची जागा फक्त तामिळनाडू आहे. आणि शक्य असल्यास द्रविडनाडू बनवण्याचा आम्ही विचार केला होता... आमची विचार प्रक्रिया त्या मार्गावर होती." त्यांचा अजूनही तोच प्रयत्न आहे.

            एकंदरीत आपल्या पवित्र घटनेची वैशिष्ट आपल्याच्याने स्वातंत्र्य मिळाल्यापासून पाळली जातं नाहीत. तिथे घटना आज धोक्यात आली म्हणण्यात काय अर्थ आहे.आपण एक राष्ट्र म्हणून जेव्हा कार्य करू, फक्त माझ्या देशावर माझे प्रेम आहे,शाळेत शिकत असेपर्यंतच म्हणणार नाही,कुठल्याही सरकारकडून माझ्यासाठी काय मिळेल अशी अपेक्षा करण्यापेक्षा सरकार देशासाठी काय करेल हा विचार करू. तेव्हाच माझ्या मते जगातील सर्वात मोठी लोकशाही, जगातील एक विकसित देश म्हणून घेण्यास आपण पात्र ठरू.

 

सारांश

            चांद्रयान 3 वर रु. 615 कोटी खर्च झाले असे जे म्हणतात,त्यांना एक गोष्ट सांगाविशी वाटते की “आदिपुरुष” हा चित्रपट बनविण्यासाठी रु.700 कोटी लागलेत.ते त्याने एखाद्या सामाजिक कार्यासाठी कां वापरले नाहीत असे कुणी कां विचारले नाही.ते त्याचे स्वतःचे पैसे होते म्हणून.बुलेट ट्रेन कशाला पाहिजे, मोठमोठाले रस्ते कशाला हवे.तुमच्या ताटात भाकरी आणण्यासाठी मूलभूत सेवा गरजेच्या आहेत.त्या व्हायला हव्यात.प्रत्येक गोष्टीकडे नकारात्मक दृष्टीने पहाणे योग्य नाही. अदानी,अंबानी,टाटा,बिर्ला यासारखे उद्योगपती आपल्या देशासारख्या कल्याणकारी देशात खूप मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्याचे कार्य करत आहेत.जे कल्याणकारी देशात सरकारने करणे अपेक्षित आहे.       

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

प्रसाद नातु,पुणे

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...