Skip to main content

कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे

  ब्लॉग नं. 2025/35 2 . दिनांक: 1 6 डिसेंबर, 2025. मित्रांनो, आजच्या गतिमान कॉर्पोरेट जगात कर्मचारी हे फक्त काम करणारी माणसे नसतात.ते आपल्या संस्थेचे भावनिक केंद्र ( Emotional Core) असतात.त्यामुळे कॉर्पोरेट समग्र कल्याणाला ( Corporate Wellbeing )  आता पर्याय नाही.ते प्रत्येक व्यवसायासाठी आता अत्यावश्यक झाले आहे. कॉर्पोरेट समग्र कल्याण ( Corporate Wellbeing ) म्हणजे काय? याविषयी आपण आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत.     सविस्तर: आज काल प्रत्येक नियोक्त्याला ( Employer ) त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे म्हणजे फक्त “गुड टू डू” गोष्ट नाही , तर ती त्यांच्या संस्थेच्या वाढीमध्ये सर्वात महत्त्वाची गुंतवणूक झाली  आहे.एक विश्वासार्ह , वैज्ञानिक आणि रचनाबद्ध कॉर्पोरेट,मेंटल हेल्थ प्रोग्राम अशा पद्धतीने बनविते की त्याचा, कर्मचारी टिकवून ठेवणे , उत्पादकता वाढवणे आणि संस्थेबद्दलची बांधिलकी ( loyalty) मजबूत करण्यास मोठा हातभार लागतो. 1) बर्नआउट: संस्थेत शांतपणे पसरत जाणारी आग: गॅलपच्या 2024 च्या अहवालानुसार, भारतीय कर्मचाऱ्यांपैक...

स्व. मुकेश एक सुरेल गायक

 Blog No.2023/225              

Date:- 27th, August 2023. 

मित्रांनो,

           नुकतंच आपण एका महान गायकाची जन्मशताब्दी  साजरी केली. दर्दभऱ्या आवाजाचा हा गायक ज्याने आपल्या आवाजाने जवळपास 30 वर्षे चित्रपटसृष्टी गाजविली.त्या गायकाचे 27 ऑगस्ट 1976 रोजी डेट्रॉईट,मिशिगन,अमेरिका येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.आज त्या गायकाची 47 वी पुण्यतिथि,तुम्ही ओळखले असेलच की तो गायक म्हणजे दूसरा तिसरा कुणी नसून स्व. मुकेश हे आहेत. आज त्यांची पुण्यतिथी. त्यानिमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठीचा हा ब्लॉग.                 

 मुकेश यांचे वैयक्तिक जीवन:-

           मुकेश यांचा जन्म २२ जुलै १९२३ ला दिल्ली येथे माथुर कायस्थ कुटुंबात झाला.त्यांचे वडील जोरावर चंद माथूर हे अभियंता होते.त्यांच्या आईचे नावं चंद्राणी माथूर होते.दहा मुलांमध्ये ते सहावे. मुकेशची बहीण सुंदर प्यारी यांना शिकवण्यासाठी घरी संगीत शिक्षक येतं असे.त्यांची शिकवणी मुकेश बाजूच्या खोलीतून ऐकत असे.पुढे मुकेश त्यांचा शिष्य झाला. मुकेशने दहावीनंतर शाळा सोडली आणि सार्वजनिक बांधकाम विभागात काही काळ काम केले. दिल्लीत नोकरीत असतांना त्यांनी व्हॉईस रेकॉर्डिंगचे प्रयोग केले आणि हळूहळू त्यांनी  गायन क्षमता आणि त्यांचे वाद्य कौशल्य विकसित केले.

गाण्याची कारकीर्द

मुकेशना पहिल्यांदा मोतीलाल या त्यांच्या दूरच्या नातेवाईकाने ब्रेक दिला. मुकेशने आपल्या बहिणीच्या लग्नात गाणे गायले होते.मोतीलाल त्यांना मुंबईत घेऊन गेले आणि पंडित जगन्नाथ प्रसाद यांच्याकडे गायनाचे धडे गिरवले.याच काळात मुकेश यांना निर्दोषया हिंदी चित्रपटात अभिनेता-गायक म्हणून भूमिका ऑफर करण्यात आली. नीलकंठ तिवारी लिखित निर्दोष चित्रपटासाठी अभिनेता-गायक म्हणून त्यांचं पहिलं गाणं  "दिल ही बुझा हुआ हो तो" होतं. पार्श्वगायक म्हणून त्यांनी पहिलं हिट गाणं 1945 मध्ये पहली नजर चित्रपटासाठी "दिल जलता है तो जलने दे" हे अनिल बिस्वास यांनी संगीतबद्ध केलेलं गाणं अभिनेता मोतीलालसाठी गायलं. मुकेशनी सैगल शैलीतून बाहेर पडून नौशाद यांच्या मदतीने स्वतःची शैली तयार केली. सुरुवातीला मुकेश अनोखी अदा (1948), मेला (1948), अंदाज (1949) यासारख्या चित्रपटांमध्ये नौशादसाठी गायले.मुकेश सुरुवातीला दिलीपकुमारचा आवाज होते. पण नंतर दिलीप कुमार यांनी रफीची निवड केली आणि मुकेश राजकपूरचा आवाज बनले.मुकेश यांनी शंकर-जयकिशनसाठी सर्वाधिक 133 गाणी रेकॉर्ड केली आहेत,त्यानंतर कल्याणजी आनंदजी साठी 99 गाणी गायलीत.4 फिल्मफेअर पुरस्कारांपैकी, मुकेशने शंकर-जयकिशन यांनी संगीत दिलेल्या  गाण्यांसाठी 3 पुरस्कार जिंकले.1974 मध्ये मुकेश यांना रजनीगंधा (1974) मधील "कई बार युही देखा है" या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आणि अनारी (1959) चित्रपटातील "सब कुछ देखना हमने" या गाण्यासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.पहचान (1970) मधील सबसे बडा नादान वही है", बेईमान (1972) मधील "जय बोलो बेईमान की" (शंकर-जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेली तिन्ही गाणी) आणि "कभी कभी मेरे दिल में", चित्रपटाचे शीर्षक गीत (1976) (संगीत खय्याम यांचे होते). एकूण 1300 गाणी त्यांनी गायली आहेत. त्यांच्या समकालीनांनी गायलेल्या गाण्यांपेक्षा ही संख्या कमी आहे, पण वस्तुस्थिती अशी आहे की मुकेश यांनी प्रमाणापेक्षा गुणवत्तेवर भर दिला.

"नैना है जादू भरे." "छलिया मेरा नाम”,"मेरे टूटे हुए दिल से", "डम डम डिगा" "मुझको इस रात की तनहाई में." "हम छोड चले हैं महफिल को." "हमने तुजको प्यार किया है जितना." "चल मेरे दिल लहराके चल." "मैं तो एक ख्वाब हूं." "चांद सी मेहबूबा हो." “चंदन सा बदन चंचल चितवतन” "वक्त करता जो वफा." "दीवानों से ये मत पूछो." "खुश रहो हर खुशी है." "चांदी की दीवार." कोई जब तुम्हारा हृदय तोड़ दे." "दर्पण को देखा." "जो तुमको हो पसंद." "कहीं दूर जब दिन ढल जाये","मैंने तेरे लिए ही सात रंग के" "एक प्यार का नगमा है","सब कुछ सिखा हमने", "जीना यहाँ मरना यहाँ" "कहता है जोकर सारा जमाना." “राम करे ऐसा हो जाये” “जाने कहाँ गए वो दिन,” “बहारोंने मेरा चमन लूटकर” “भूली हुई यादों मुझे” “आँसू भरी है ये जीवनकी”. “कोई जब तुम्हारा हृदय तोड़ दे” “सुहाना सफर ये मौसम हंसी” “दोस्त दोस्त ना रहा” “ओ मेरे सनम” “नैन हमारे सांज सकारे" “ओह रे ताल मिले नदी के चल” “तन मन धन सब है” “जिनके हृदय श्रीराम बसे” “ज्योत से ज्योत जागते चलो” “ऐ सनम जिसने तुझे” यासारखी सुरेख गाणी गायली.आपल्या कारकिर्दीत मुकेश यांनी राज कपूरसाठी 110 गाणी, मनोज कुमारसाठी 47 गाणी आणि दिलीप कुमारसाठी 20 गाणी गायली.

वैयक्तिक जीवन

मुकेश यांनी रायचंद त्रिवेदी, लक्षाधीश यांची मुलगी सरल त्रिवेदीशी विवाह केला. या जोडप्याला पाच मुले होती - रीता, गायक नितीन, नलिनी (मृत्यू. 1978), मोहनीश आणि नम्रता (अमृता). अभिनेता नील नितीन मुकेश हा मुकेश (नितीनचा मुलगा) यांचा नातू आहे.

मृत्यू

मुकेश यांचे 27 ऑगस्ट 1976 रोजी डेट्रॉईट, मिशिगन, यूएसए येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, जेथे ते एका कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करण्यासाठी गेले होते.जेव्हा त्यांच्या मृत्यूची बातमी त्यांचे परिचित आणि अभिनेते राज कपूर यांच्यापर्यंत पोहोचली.तेव्हा त्यांना अश्रू अनावर झाले आणि त्यांनी टिप्पणी केली, "मी माझा आवाज गमावला आहे," जे मुकेशच्या आवाजाची आणि त्यांच्या अफाट सहवासाची साक्ष आहे.

मुकेशच्या मृत्यूनंतर त्यांची रिलीज न झालेली,1977 मध्ये धरम वीर,अमर अकबर अँथनी,खेल खिलाडी का,दरिंदा आणि चांदी सोना यांसारख्या चित्रपटांमध्ये गाणी रिलीज झाली.1978 मध्ये आहुती, परमात्मा, तुम्हारी कसम आणि सत्यम शिवम सुंदरम यांसारख्या चित्रपटांमध्ये मुकेशच्या गाण्यांची संख्या लक्षणीय होती,जिथे मुकेशने त्यांचे शेवटचे चित्रपट गाणे चंचल शीतल निर्मल कोमल हे राज कपूरचा धाकटा भाऊ शशी कपूरसाठी गायले होते.

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

प्रसाद नातु,पुणे

Comments

  1. अजरामर गायकावर आपण खूप सुंदर लिहिले. छान ब्लाॅग

    ReplyDelete
  2. नमन 🙏🌺🌺

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...