ब्लॉग नं. 2026/1 72. दिनांक: 21 जून, 2026. मित्रांनो, आपल्यापैकी बहुतेकांच्या घरात,रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणात एक चर्चा नेहमी रंगते, " मधुमेह ( Diabetes) असेल , तर ताटात भात आणि पोळी दोन्ही एकत्र असावे की नाही ?" आपल्या समाजात हा समज इतका घट्ट रूढ झाला आहे की , रक्तातील साखर वाढण्याच्या भीतीने,अनेक रुग्ण नाईलाजाने या दोन मुख्य पदार्थांपैकी एकाचीच निवड करतात. पण खरंच हा नियम वैद्यकीयदृष्ट्या योग्य आहे का ? चला , आजच्या ब्लॉगमध्ये,आपण यामागील वैज्ञानिक सत्य आणि योग्य पद्धत सविस्तरपणे जाणून घेऊया. सविस्तर: 🛑 समज की गैरसमज ? काय म्हणतात तज्ज्ञ ? ' जीव्हीके हेल्थकेअर ' चे वैद्यकीय संचालक आणि वरिष्ठ मधुमेह तज्ज्ञ डॉ. एन. जी. शास्त्री यांच्या मते , भात आणि पोळी यांचे एकत्र सेवन करणे ही अजिबात समस्या नाही. हा एक मोठा गैरसमज आहे. डॉ. शास्त्री म्हणतात: " भात आणि पोळी हे दोन्ही कर्बोदकांचे ( Carbohydrates) स्रोत आहेत.जेव्हा आपण ते खातो , तेव्हा शरीर ऊर्जेसाठी त्यांचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करते.खरी समस्या या दोन पदार्थांच्या संयोजनात ( Combinat...
मित्रांनो , आपण सगळेच जाणता आहात कि , कोविड 19 ने अखिल जगताला कसे आणि किती नुकसान पोहोचवले आहे.जीवित हानी तर झालीच. पण अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत.जागतिक अर्थव्यवस्थेला ह्याचा खूप मोठा धक्का बसला.आपला भारत देश ह्या जगाचाच हिस्सा किंवा भाग आहे.त्यामुळे भारताची देखील अपरिमित हानी झाली.अर्थ व्यवस्थेला खीळ बसली.भारत हा सामान्यतः सूक्ष्म , लघु आणि मध्यम उद्योगांनी व्यापलेला देश. भारताच्या एकूण जी डी पी च्या 36.9% इतके योगदान सूक्ष्म , लघु आणि मध्यम उद्योगांचे (उत्पादन क्षेत्र ) 2020-21 ह्या कालखंडाचा विचार करता होते.तेच निर्यातीत ह्याच कालखंडात 49.5% सूक्ष्म , लघु आणि मध्यम उद्योगांचे राहिले आहे.जवळपास 15 करोंड लोकांना सूक्ष्म , लघु आणि मध्यम उद्योगांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे.(सौजन्य सूक्ष्म , लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय , केंद्र सरकार) ह्याच कालखंडात मजुरांच्या स्थलांतरांचा विषय ऐरणीवर आला.हे स्थलांतर केलेले मजूर आपल्या गांवी परतले.पण नंतर सगळे कामावर हजर झाले नाहीत किंवा ते अनेक कौटुंबिक समस्यांमुळे कामावर परतू शकले नाहीत.जसे घराकडील...