ब्लॉग नं. 2025/350. दिनांक: 14 डिसेंबर, 2025. मित्रांनो, माझा धाकटा भाऊ मला नेहमी म्हणतो,मी द ररोज सकाळी उपाशी पोटी,कच्च्या लसूणाच्या 2 पाकळ्या नियमितपणे खातो. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत असे, तर कधी कधी ही गोष्ट हसण्यावारी नेट असे की, लसूणाच्या 2 पाकळ्या खाऊन काय होणार आहे. पण काल माझ्या वाचनात एक पोस्ट आली. शीर्षक होतं,” द ररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते ? फायदे , तोटे आणि योग्य पद्धत.” मी पोस्ट पूर्ण वाचून काढली आणि खरोखर चक्रावून गेलो,की खरोखर लसूणाच्या 2 पाकळ्याने इतकं काही होऊ शकतं. आता तुमची उत्सुकता कशाला ताणून ठेऊ,वाचा आजच्याच ब्लॉगमध्ये. सविस्तर: लसूण हा जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेला , पण आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी असा घटक आहे. त्याचे बॅक्टेरियाविरोधी , दाहक-विरोधी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म शतकानुशतके ओळखले गेले आहेत. म्हणूनच अनेक जण लसणाला “नैसर्गिक सुपरफूड” असेही म्हणतात. ब...
कविता संग्रह आजकाल कुणी वाचत की नाही माहित नाही. पण मी आज वाचून काढला. ज्याचे नांव आहे "तुझे गीत गाण्यासाठी". सुप्रसिध्द कवी मंगेश पाडगांवकर यांचा हा कविता संग्रह. कवितेचे रूप ,स्वरूप आणि अंतरंग वेगवेगळे असते. या कवितासंग्रहात एकूण 104 कविता आहेत. यातील 30 कवितांना माझ्या माहिती प्रमाणे स्वरसाज चढवून त्यांचे गाण्यांत रूपांतर करण्यांत आले आहे. ही गाणी बहुतेक सर्वांना माहित आहे.
"तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे या" गीताने त्यांनी कविता संग्रहाची सुरूवात केली आहे. हे गाणे सुधीर फडकेंनी अजरामर केले. तर "माझे जीवन गाणे व्यथा असो आनंद असू दे" या पं. जितेंद्र अभिषेकीनी गाईलेल्या गीताने समारोप. पाडगांवकरांचे वैशिष्ठ हे की त्यांनी प्रेम गीत असो, विराणी असो. भक्तीगीत वा गझल वा युगुल गीत असो सर्वाना न्याय दिला. कवितेच्या कुठल्याही प्रकारात त्यांचे शब्द कमी पडले नाहीत यातच त्यांचे मोठेपण जाणवते. या कविता संग्रहात "श्रावणांत घननिळा मध्ये एका कडव्यांत पाडगांवकर म्हणतात 'गतजन्मीची ओळख सांगत आला गंधित वारा' किंवा 'लाजून हासणे अन् हासून ते पहाणे' या गीतातील 'हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे, र्हदयांत बाण जाता त्यालाच दुखः ठावे'. "शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातुनी" मधील 'लाजऱ्या माझ्या फुला रे गंध हा बिलगे जीवा, अंतरीच्या स्पंदनाने अन थरारे ही हवा' असो वा "या जन्मावर या जगण्यावर शतदः प्रेम करावे" मधील 'रंगांचा उघडुनिया पंखा सांज कुणी ही केली, काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली सहा ऋतुंचे सहा सोहळे येथे भान हरावे' तसेच "नीज माझ्या नंदलाला ,नंदलाला रे" मध्ये 'सावल्यांची तीट गाली चांदण्याला नीज आली ,रातराणीच्या फुलांचा गंध आला, नंदलाला रे. ह्या अशा कल्पना केवळ कवीच करू शकतो. "धरिला वृथा छंद" मधे पाडगांवकर विचारतात 'नव्हतेच जर फुल कोठून मकरंद' तर "दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे" मधे पाडगांवकर लिहीतात 'शब्द फुले वेचित रचला चांद तु जुईचा म्हणालीस, चंद्रोत्सव हा सावळ्या भुईचा ,फुलातल्या त्या चंद्राची शपथ तुला आहे.'
पाडगांवकरांनी "दिवस तुझे हे फुलायचे झोपाळ्या वाचून झुलायचे" मधे 'मोजावी नभाची खोली घालावी शपथ ओली ,श्वासात चांदणे भरायचे' म्हटले आहे.
"उंबरठ्यावर माप उलटुनी तुझ्या दारी मी आली" या कवितेत म्हटलयं 'आज फुले हसली माझ्याशी , सुख आले फुलुनी हृदयासी, पाश जुने तोडूनी तुझ्यास्तव प्रथमच आज निघाले.'
अशा प्रकारे अभंग, गझल, भावगीत, या सगळ्याच काव्य प्रकारांना त्यांनी न्याय दिला आहे.
प्रसाद नातु
खुप छान.
ReplyDelete