ब्लॉग नं. 2025/350. दिनांक: 14 डिसेंबर, 2025. मित्रांनो, माझा धाकटा भाऊ मला नेहमी म्हणतो,मी द ररोज सकाळी उपाशी पोटी,कच्च्या लसूणाच्या 2 पाकळ्या नियमितपणे खातो. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत असे, तर कधी कधी ही गोष्ट हसण्यावारी नेट असे की, लसूणाच्या 2 पाकळ्या खाऊन काय होणार आहे. पण काल माझ्या वाचनात एक पोस्ट आली. शीर्षक होतं,” द ररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते ? फायदे , तोटे आणि योग्य पद्धत.” मी पोस्ट पूर्ण वाचून काढली आणि खरोखर चक्रावून गेलो,की खरोखर लसूणाच्या 2 पाकळ्याने इतकं काही होऊ शकतं. आता तुमची उत्सुकता कशाला ताणून ठेऊ,वाचा आजच्याच ब्लॉगमध्ये. सविस्तर: लसूण हा जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेला , पण आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी असा घटक आहे. त्याचे बॅक्टेरियाविरोधी , दाहक-विरोधी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म शतकानुशतके ओळखले गेले आहेत. म्हणूनच अनेक जण लसणाला “नैसर्गिक सुपरफूड” असेही म्हणतात. ब...
आज निवांत बसलो असतांना गुलाम अलींची एक गझल आठवली. लग्न व्हायचं होतं.मुली सांगून येत होत्या. पहात होतो.पसंतीस येत नव्हत्या, कधी आईच्या कधी माझ्या. कमी कुणातच काही नसायचं पण ती आपल्या जाणीवातील कमी असायची.गझल खुप म्हणत असे मी तेव्हा. तर ही गझल
"हमे तो अब भी वो गुजरा जमाना याद आता है.
तुम्हे भी क्या कभी कोई दिवाना याद आता है" ची गोष्ट मला आठवली. माझी काॅलेज मधे एक मैत्रिण होती.माझ्या गाण्यांना ती भरभरुन दाद देत असे. काॅलेजमधे तर अगदी एखाद्या गोष्टीत एकवाक्यता झाली की "त्रिशूल" मधला "आपके और मेरे खयालात कितने मिलते जुलते है" हा शशी कपूरने हेमामालिनीस म्हटलेला डाॅयलाॅग आपल्याच साठी असं वाटत असे. मला असं वाटायचं कि ही आपल्या गाण्याला अगदी मनापासून म्हणजे त्यातला अर्थ समजून दाद देते आहे. म्हणून मुली पसंत पडत नसतांना मी एक दिवस ही गझल कागदावर पूर्ण उतरवून घेतली. बरं गंमत अशी असते की इतर वेळेस एखाद्यास तू वेडा आहेस का असे म्हटल्यावर प्रचंड रागावतो तो. पण तोच व्यक्ती तू तिच्या प्रेमांत वेडा झाला आहेस म्हटलं कि अगदी लाजतो त्याच्या अंगावर रोमांच उभे रहातात.हे वाक्य अगदी वारंवार म्हणावे असे त्याला वाटते.
तर ही गझल तिला पूर्णपणे लिहून पाठविली. मला तर जुने दिवस अजूनही आठवताहेत. तुला कुणा दिवान्याची आठवण आहे का? येतेय का?. 8 दिवसानी तिचे पत्र आले. त्या दिवशी मला खऱ्या अर्थाने "वडा केला किंवा पचका केला" याचा काय अर्थ होतो ते कळले. तिचे पोस्ट कार्ड आले. तिने लिहीले होते. गझल छान आहे. कुणी लिहीली आहे रे?
माझ्या मनांत अगदी आलं होतं की तिला लिहावं तुला काय करायचयं गं कुणी लिहीली आहे ते. तू हे बघ ना की ही मी तुला कशासाठी पाठवली आहे. यशवंत देव सरांची क्षमा मागून लिहीतोय.
शब्द प्रधान गायकी ठिक आहे हो. पण समोरच्याने/समोरचीने अर्थासकट ऐकली/वाचली पाहिजे ना.
Comments
Post a Comment