ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026. मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये. आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...
आज सकाळी सकाळीच मोबाईलची रिंग वाजली . तस धावतच फोन घेतला. तर समोरून माझा मित्र सदा भोजनी ओरडलाच “ राजा लेका अभिनंदन “ . मी म्हटले “कशाबद्धल? काय केले आहे मी? “. “अरे कुण्या गावच पाखरू ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहिर झाला आहे. काल पासून मी, सारे मित्र , साहित्य अकादमीतले तुझे मित्र, सारेच तुला शोधत आहेत , आहेस कुठे ?." त्याने एका दमात सारे सांगितले अन विचारले देखिल.
“अरे काय सांगतो आहेस? खरं काय ? मी काल पासून निवांत मिळावा म्हणून सातपुड्याच्या पायथ्याशी माझ गाव आहे तिथे आलो आहे. इथे रेंज चा जरा प्रोब्लेम आहे. म्हणूनच फोन स्वीच ऑफ केलेला “ मी म्हटले.
“अरे काय राजा आता जंगी पार्टी लागेल, लवकर येशील “ सदा म्हणाला.
“पार्टी देईन रे पण मला एकदा माझ्या डोळ्याने न्यूज पेपर वाचू दे “ मी म्हटले . तसे “ हात तिच्या भेंडी साला” अस काहीसे बम्बैय्या स्टायलनी म्हणाला. अन फोन बंद केला.
मी शांतपणे खुर्चीवर बसून विचार करू लागलो. गेली ५-६ म्हणजे २००१ ते २००६ ही पाच वर्षे मोठी खडतर गेलीत . मला चांगल्या सगळ्याच प्रकाशकाकडून माझे साहित्त्य साभार पोच परत येत होते . हा नाही म्हणायला छोट्या छोट्या मासिक, वर्तमान पत्रातून अधून मधून काही काही छापून येत होत. पण फक्त प्रपंचाला हातभार लागेल एवढच. घरची शेती असल्याने प्रपंच त्यावर अवलंबून नव्हता म्हणा. पण साहित्यिक म्हणून प्रसिद्धी मिळावी ही माझी इच्छा काही पूर्ण होत नव्हती. अनेक चांगल्या चांगल्या कथा सुद्धा परत आल्या याच वाईट वाटायचं. पण ईलाज नव्हता . वाचकापर्यंत पोहोचण्या आधी प्रकाशक आणि संपादक यांना माझं साहित्य आवडणे आवश्यक होते. पण मी हिम्मत हरलो नव्हतो .
अशातच हैदराबाद च्या एका टीवी चॅनेल कडून गूढ मालिकांसाठी साहित्य मागविले जात होतं . म्हणून मी अर्ज केला आणि आश्चर्य म्हणजे माझ्या कथांचा मध्यवर्ती आशय त्यांना आवडला होता. म्हणून त्यांनी मला हैदराबादला पाचारण केले होते . त्यांच्याशी बोलणी करून करार करायचा होता. ८ दिवसांचा अवधी दिला होता. मी रिझर्वेशन केले , पण कन्फर्म मिळाले नाही. मी आईला सांगितले स्टेशन वर जातो . कन्फर्म झाले तर ट्रेन नी जाईन नाही तर बस ने . हैदराबादला पोहोचल्यावर कळवितो असे आईला सांगितले . मोबाईल तेवढा प्रचलित नव्हता अन मी वापरत ही नव्हतो .आईचा निरोप घेऊन स्टेशन वर निघालो. पावसाळ्याचे दिवस असल्याने गाडीला तेवढी गर्दी नव्हती . रिझर्वेशन मिळाले होते. स्लीपर क्लास चेच केले होते . मला एसी आवडायचे नाही म्हणा किवा सवय नव्हती म्हणा मी स्लीपर पसंद करायचो. स्लीपर क्लास मध्ये सामान्य लोकांसोबत प्रवास करतांना एखादे वेळेस एखाद दुसरे कथानक सापडायचे. संध्याकाळी साडेपाच चे सुमारास गाडी आली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे नागपूर हून वेळेत सुटली. गाडीने जसा वेग घेतला तशी सर्व प्रवाश्यानी आपआपली जागा घेतली आणि एकमेकांची ओळख काढणे वगैरे सुरु झाले. महाराष्ट्र बल्लारपूर पर्यंत होतं आणि नंतर आंध्र प्रदेश त्यामुळे गाडीत मराठी प्रवासी तसे कमीच होते. तेलगु लोकच अधिक . त्यात एक लुंगी आणि पांढरा स्वच्छ सदरा असा पेहेराव केलेले सज्जन माझ्या समोरच्या बर्थवर बसले होते. मी सहज ओळख करून घ्यावी म्हणून त्यांना विचारले “ आप कहा जा रहे है ?, हैदराबाद? “ “नही मे काझीपेठ जाऊंगा , वहासे दुसरी ट्रेन पकड के विजयवाडा जाऊंगा “ त्यांनी उत्तर दिले . “ आप कहा हैदराबाद जा रहे हो “ त्यांनी विचारले . “हां हैदराबाद जा रहा हुं. हैदराबाद कि एक टीवी चॅनैल वाले ने मुझे हॉरर सिरीयल के लिये चर्चा हेतू बुलाया है. अगर सब कुछ ठीक रहा तो ॲग्रीमेंट हो जायेगा” मी सांगितले.
“ओहो तो आप रायटर हो , वेरी गुड , जरा निंद आने तक हमे सुनावो कूछ , हमे हॉरर पसंद है .” ते म्हणाले.
“जरूर सर “ असे म्हणून मी त्यांना एक दोन कथा ऐकविल्या . मध्ये एक दोनदा त्यांना घरून फोन आले . ते तेलगुतून बोलत होते पण माझ्या कडे बघून मधेच काही सांगत होते. त्यावरून माझ्या विषयी काही बोलत असावे असे वाटले. भूत हे नेहमीच वाईट असते असे नाही प्रसंगी भूत माणसाची मदत ही करते ही माझ्या कथांची मध्यवर्ती कल्पना आहे असे मी त्यांना सांगितले . ते म्हणाले छान कल्पना आहे आणि गोष्टीही आवडल्याचे म्हणाले.
बल्लारपूर ला जेवण घेतल्यावर गाडी निघाली. तशी सगळ्यांनी झोपायची तयारी सुरु केली. मी त्यांना विचारले कि मी थोडा लिहीन म्हणतो तर थोडा वेळ लाईट चालू ठेवला तर चालेल का तर म्हणाले काही हरकत नाही. मी लिहिण्यासाठी पेन शोधू लागलो पेन सापडेना . माझी खुडबुड ऐकून त्यांनी विचारले "पेन हवाय का?".मी हो म्हटले. माझा पेन मी कुणाला तरी रिझर्वेशन स्लीप भरायला दिला होता त्याने परत दिला नसल्याचे मी त्याने सांगितले. ते म्हणाले “ ये लो मेरा पेन , मेरा लकी पेन है , काझीपेठ आनेके पहले वापस दे देना . मी लिहित बसलो होतो . मधेच त्यांना फोन आला असावा कारण ते तेलगुत बोलत होते. त्यांच्या तोंडून पेन हा शब्द एक दोन वेळा ऐकायला मिळाला. एखाद्या तासाने झोप यायला लागली तशी मीही आवरायला सुरुवात केली .पण थोडा आडवा झालो तर झोप येत नव्हती. सारखा विचार सतावत होता. आता तरी नशीब उघडणार कि नाही.
गाडीने मन्चेरीयल स्टेशन सोडले अन एका नदीच्या पुलावरून गाडी जात असल्याचे आवाजा वरून जाणविले आणि अचानक एक मोठा आवाज झाला . गाडीचा बहुदा अपघात झाला होता . नंतरचे काही आठवत नाही. पण बेशुद्धावस्तेतून जेंव्हा जागा झालो तेंव्हा मी मन्चेरीयलच्या एका हॉस्पिटल मध्ये होतो. मला विशेष लागले नव्हते . गाडी नदीत पडल्याने सामान सुमान वाहून गेले होते. पण आश्चर्य म्हणजे माझ्या खिशाला तो पेन मात्र घट्ट चिकटून होता. पण त्या पेन च्या मालका बद्धल काहीच कळले नव्हते. आता हैदराबाद ला जाणे शक्य नव्हते . त्यांनी जी तारीख दिली होती ती उलटून गेली होती. रेल्वेने प्रवाश्यांच्या घरी पोहोचायची सोय केलेली होती म्हणून नागपूर ला परतलो . घरी परतलो तर सारेच काळजीत होते . कारण माझी काहीच खबरबात नव्हती. माझे रिझर्वेशन कन्फर्म झाले कि नाही. त्यांना काहीच माहित नसल्याने ते गोंधळलेले होते. कारण त्या अपघातात जवळपास १५० लोकांनी आपले प्राण गमावले होते. पण मृतकांच्या यादीत नांव नव्हते. ही त्यांच्यासाठी एक समाधानाची गोष्ट होती.
मी देवाचे आभार मानले अन पुन्हा आपल्या लेखनाच्या कामाला सुरुवात केली. त्या हैदराबाद च्या वाहिनीला ही पत्र टाकायचे ठरविले. म्हटले बघू या एक चान्स घ्यावा. त्या तेलगु गृहस्थाच्या त्या लकी पेननेच पत्र लिहिले. आणि आश्चर्य म्हणजे त्या चॅनेल वाल्याने मला पुन्हा एकदा ऑफर दिली होती आणि या वेळेस एयर तिकीट पाठविले होते. मी हैदराबाद ला विमानाने जाऊन आलो. करार झाला होता . त्यांनी प्रत्येक एपिसोड चे घसघशीत मानधन दिले होते. माझी टीव्ही सिरीयल ‘अकल्पित ‘ चांगलीच गाजली. त्यानंतर “बुमर्रंग , असेही घडते , पडदा , सावली , एक घर असेही “ या सिरीयल चांगल्याच गाजल्या.चांगला टीआरपी असल्याने माझ्या सगळ्याच सिरियल्स प्राईम टाईमवर दाखविल्या गेल्या . हॉररला साधारणतः रात्री १० नंतरची वेळ मिळते. पण माझ्या सगळ्याच सिरियल्स ना ९ च्या स्लाॅट मध्ये दाखविले गेले.
सिरीयल मध्ये अशी अफाट प्रसिद्धी मिळाल्यावर मी माझी मुळ आवड कथा लेखनाकडे आणि कादंबरी लेखनाकडे वळलो . माझं नाव सीरियल्स मुळे चर्चेत आल्याने कथा संग्रह आणि कादंबर्याही प्रसिद्ध झाल्या . माझे सारी कडेच नाव झाले. मुख्य म्हणजे या सर्व लेखनांत तो पेन माझ्या सोबत होता . भलेही मी शाई नवीन भरत होतो पण पेन तोच होता.
अन अचानक माझ्या “कुण्या गावच पाखरू : या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याचे माझ्या मित्राने सदाने सांगितल्याने ह्या सगळ्या स्मृती जागृत झाल्या होत्या. मी धावतच सदा कडे पोहोचलो. दारावरची बेल वाजविली. दार उघडले . सदा दारातच उभा होता . त्याने मला मिठीच मारली. म्हणाला “राजा नाव काढलस, किती अभिमान वाटतो मला कि माझा एक मित्र साहित्य अकादमी पुरस्कार विजेता साहित्यिक आहे’.
“ खरच रे मलाही कधी कधी आश्चर्य वाटते हे कसे शक्य झाले. गेली १० वर्षे मी या क्षेत्रात आहे. त्यातील ५-६ वर्षे नुसती धडपड करण्यातच गेली. अन अचानक एवढी प्रसिद्धी , खर नाही वाटत , मीही तोच , कथा कल्पना माझ्याच , प्रकाशक , संपादक तेच हे सगळेच अद्भुत वाटते . पण एक सांगू सदा जी गोष्ट मी आजवर कुणाला सांगितली नाही ती तुला सांगतो. अन मी त्याला पेन ची गोष्ट सांगितली. या अवधीत बदलला होता माझा पेन. सदा म्हणाला “पण पेन चा काय संबध. “ “ काय संबध माहित नाही पण जरूर काही गूढ आहे असे वाटते.” मी म्हटले.
काही दिवसातच मला साहित्य अकादमी चे अधिकृत पत्र आले. दिल्ली ला बोलावले होते. या वेळेस त्यांनी आज पर्यंत हा पुरस्कार मिळालेल्या सर्वांनाच बोलाविले होते. त्यामुळे मी खूप उत्साहित होतो. वेगवेगळ्या भाषातील मोठमोठ्या लेखकांशी ओळख होणार होती. मी आई बाबांना न्यायचे ठरविले होते . सोहळा पाहण्यासाठी . माझे बाबाही साहित्यिक होते. कथा लिहायचे पण लक नव्हते हेच खरे. त्यामुळे साहित्य पेटीत राहिले होते. आपल्या मुलाचे कौतुक पाहण्यासाठी त्यांनी यावं अशी माझी इच्छा होती आणि त्यांचीही.
ठरल्या प्रमाणे आम्ही तिघेही दिल्लीला पोहोचलो. पुरस्कार स्वीकारल्या वर मला चार शब्द बोलण्यास सांगितले. मी बोलतांना त्या लकी पेन चा आणि तो देणाऱ्या चा उल्लेख केला.
नंतर जेवण्याच्या कार्यक्रमात एक मध्यमवयीन स्त्री मला भेटायला आल्या. आपली ओळख करून देत मला म्हणाल्या “ मे मिसेस रेड्डी , साहित्यिक जे वी अनंत रेड्डी कि पत्नी हुं. आपका जो अक्सिडेंट हुआ था. उस गाडीमे मेरा हसबंड भी था. उसका ॲक्सिडेंट के बाद कूच ही दिनो मे डेथ हुआ और वो जो पेन आपके पास है वो मेरे हसबंड ने आपको दिया था. आपके बारेमे मेरा हसबंड बताया था . पेन के बारेमे भी बताया था उसने. बहुत अच्चा रायटर था , अकादमी पुरस्कार विजेता भी था वो. पद्मश्री भी मिला था उन्हे. मेरे सपने मे आके बोला मै मदद करुंगा उसकी , वो बहुत होशियार है ऐसा कहा तुम्हारे बारेमे “ त्यांनी मला सांगितले आणि मला गुड लक देऊन त्या दुसरी कडे निघून गेल्या. अनंत रेड्डी नी एवढा मोठा साहित्यिक असून मला साधी ओळख ही दिली नव्हती. माझ्यासाठी ही गोष्ट एक संदेश देऊन गेली.
माझ्या यशाचं रहस्य मला कळले होते. अन माझ्या हॉरर कथांची मध्यवर्ती कल्पना भूत हे चांगले ही असू शकते या विचारांना वास्तवाची पावतीही मिळाली होती.
Comments
Post a Comment