Skip to main content

'या' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर

ब्लॉग नं. 2026/1 71.   दिनांक: 20 जून, 2026. मित्रांनो, संध्याकाळी 5 नंतरच्या ' या ' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर दिवस मावळत असताना , आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं , तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते , संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता , त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर ( Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ.    सविस्तर: ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या एका अहवालानुसार , आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते , तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी , रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो. आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या ...

कोविड 19 , एम.एस एम. ई.उद्योग आणि वारश्याचे नियोजन (Succession Planning )

 


मित्रांनो

आपण सगळेच जाणता आहात कि, कोविड 19 ने अखिल जगताला कसे आणि किती नुकसान पोहोचवले आहे.जीवित हानी तर झालीच.पण अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत.जागतिक अर्थव्यवस्थेला ह्याचा खूप मोठा धक्का बसला.आपला भारत देश ह्या जगाचाच हिस्सा किंवा भाग आहे.त्यामुळे भारताची देखील अपरिमित हानी झाली.अर्थ व्यवस्थेला खीळ बसली.भारत हा सामान्यतः सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांनी व्यापलेला देश. 

भारताच्या एकूण जी डी पी च्या 36.9%  इतके योगदान सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे (उत्पादन क्षेत्र ) 2020-21 ह्या कालखंडाचा विचार करता होते.तेच निर्यातीत ह्याच कालखंडात 49.5% सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे राहिले आहे.जवळपास 15 करोंड लोकांना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे.(सौजन्य सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय,केंद्र सरकार)

ह्याच कालखंडात मजुरांच्या  स्थलांतरांचा विषय ऐरणीवर आला.हे  स्थलांतर केलेले मजूर आपल्या गांवी परतले.पण नंतर सगळे कामावर हजर झाले नाहीत किंवा ते अनेक कौटुंबिक समस्यांमुळे कामावर परतू शकले नाहीत.जसे घराकडील आप्त स्वकियांचे निधन वगैरे.पण ह्या सोबतच जे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग यातून सावरून पुनः  उभे राहू पहात आहेत. त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.त्या समस्या आपण थोडक्यात बघूच.पण   त्यातील सर्वात गंभीर समस्येचा आज मी इथे ऊहापोह करणार आहे. 

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या समोरील समस्या.

1.   खेळत्या भांडवलाची समस्या.

2.   बँकेकडून घेतलेल्या कर्ज खात्यांना एन.पी.ए.होण्यापासून वाचविण्याची समस्या.

3.   काम सोडून निघून गेलेल्या आणि अजून पावेतो परत न आलेल्या कुशल कामगारांची समस्या.  

4.   दुरावलेल्या ग्राहकांना पुनः आपल्या उद्योगाकडे आकर्षित करणे.

5.   कच्चा मालाचा पुरवठा क्रेडिट वर देणाऱ्या पुरवठादारांना क्रेडिट वर पुन्हा पुरवठा करण्यास राजी करणे.कारण कोविड 19 मुळे ते देखील अडचणीत आले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.  

या आणि अश्या असंख्य समस्यांनी बेजार केले आहे.पण यापेक्षा मोठी समस्या ही वारसाहक्क नियोजनाची आहे.ही समस्या आधी नव्हती का?काय आहे ही समस्या,हे थोडक्यात समजावून घेऊ.ही समस्या आधी देखील भेडसावत असे पण ती कोविड 19 च्या उपद्रवामुळे अधोरेखित झाली आहे.

आपल्या देशांत अधिकाधिक उद्योग हे प्रोप्रायटर ह्या एकाच व्यक्ति भोवती केंद्रित झालेले आहे.प्रोप्रायटर हे स्वतः भांडवल गुंतविणार,तोच कामगारांची नियुक्ती करणार,तोच मशीनरी कुठली घ्यायची हे ठरविणार,ईत्यादी,ईत्यादी थोडक्यात काय तर एक खांबी तंबू.तो खांब कोसळला कि तंबू कोसळणारच.कोविड 19 च्या काळात असे अनेक उद्योगाचे स्वामी काळाच्या पडद्याआड गेले.काही उद्योगांत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली.कुणाला काहीही माहित नाही.Contingency Plan वगैरे काहीच नाही. म्हणजे असे जर कधी घडले तर काय करायचे ह्याचे पूर्व नियोजन नसल्याने चांगल्या प्रकारे सुरू असलेल्या उद्योगाचे भवितव्य अंधकारमय झाले आहे.

बरे हे प्रोप्रायटर असलेल्या ठिकाणीच झाले आहे का?नाही,भागीदारी फर्म सुरू करतांना, भागीदारी फर्म मधे कामाची विभागणी बरेचदा केली जाते.पण प्रत्येकाला प्रत्येक गतिविधीचे काम चलावू ज्ञान असायला हवे असे दिसत नाही.एखादे विशिष्ट कार्य करणाऱ्या भागीदाराचे बरे वाईट झाले तर तिथे देखील असा Contingency Plan असतो का? ह्याचे उत्तर बऱ्याच अंशी नाही असेच असेल.पण भागीदारीत निदान सातत्य राहते म्हणजे उद्योग सुरू राहू शकतो. तसेच खासगी कंपनीचे असते.कारण आपल्या देशांत closely held कंपनी मधे शक्य तो परिवारातले किंवा नाते संबंधातले लोक कंपनीचे भागधारक असतात. खासगी कंपनी स्थापन करण्यासाठी 2 सदस्य पुरेसे असतात.तिथे देखील Contingency Plan असतोच असे नाही.मृत्यु हा केव्हाही अपरिहार्य असला तरी कोविड 19 मुळे त्याला सार्वत्रिक स्वरूप प्राप्त झाले.त्यामुळे एक दोन नाही असंख्य उद्योगांना ही समस्या भेडसावत आहे.

हे सारे उद्योगाच्या मालकाच्या बाबतीत झाले.हेच कामगारांच्या बाबतीत झाले आहे.विशेषतः कुशल कामगाराच्या बाबतीत झाले आहे.त्यांचा मृत्यु झाला एवढेच नसून तो परराज्यातला कामगार आपल्या गांवी निघून गेला आणि काही कारणांमुळे परत आलेला नाही किंवा येऊ शकलेला नाही.श्रम विभागणीच्या तत्वाप्रमाणे कामाची विभागणी केली गेली पाहिजे,हे खरे असले तरी कुणीही कर्मचारी हा indispensable अर्थात अपरिहार्य नसायला हवा.हा नाही तर दूसरा असा पर्याय असायला हवा. कुणावरही विसंबून असणे/रहाणे केंव्हा ही धोक्याचेच.यासाठी जसे मालकांसाठी तसेच कामगारांसाठी succession planning आणि contingency plan तयार असणे गरजेचे आहे.मी पुन्हा पुन्हा सांगतोय कि हे आधी देखील गरजेचे होते.पण कोविड 19 मुळे ते अधोरेखित झाले आहे.पुढल्या भागांत बघू या. succession planning आणि contingency plan कसा तयार करावा.  

Comments