ब्लॉग नं. 2025/350. दिनांक: 14 डिसेंबर, 2025. मित्रांनो, माझा धाकटा भाऊ मला नेहमी म्हणतो,मी द ररोज सकाळी उपाशी पोटी,कच्च्या लसूणाच्या 2 पाकळ्या नियमितपणे खातो. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत असे, तर कधी कधी ही गोष्ट हसण्यावारी नेट असे की, लसूणाच्या 2 पाकळ्या खाऊन काय होणार आहे. पण काल माझ्या वाचनात एक पोस्ट आली. शीर्षक होतं,” द ररोज सकाळी लसूणाच्या 2 पाकळ्या खाल्ल्याने काय होते ? फायदे , तोटे आणि योग्य पद्धत.” मी पोस्ट पूर्ण वाचून काढली आणि खरोखर चक्रावून गेलो,की खरोखर लसूणाच्या 2 पाकळ्याने इतकं काही होऊ शकतं. आता तुमची उत्सुकता कशाला ताणून ठेऊ,वाचा आजच्याच ब्लॉगमध्ये. सविस्तर: लसूण हा जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेला , पण आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी असा घटक आहे. त्याचे बॅक्टेरियाविरोधी , दाहक-विरोधी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म शतकानुशतके ओळखले गेले आहेत. म्हणूनच अनेक जण लसणाला “नैसर्गिक सुपरफूड” असेही म्हणतात. ब...
Blog No.2023/246
Dated 21-09-2023.
मित्रांनो,
साधारणतः 25 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. आमच्या कडे फक्त दिड दिवसांचा गणपती असतो. पहिल्या दिवशी
आरती आटोपल्यावर जेवण आटोपून आम्ही गप्पा मारत बसलो. आणि रात्री मला जाग आली. एक गणपतीचे स्तुतिपर गीत मला सुचले.
मी धडपडत उठलो. एक वही आणि पेन घेतला. स्फुरलेले गीत लिहून काढले. दोन कडवी सुचली होती. ती लिहून काढली. त्या नंतर मी त्यात कडवी जोडायचा प्रयत्न केला, पण सुचल्या नाहीत. ती गणेश स्तुति मी आज येथे पोस्ट करत आहे. त्याला त्याचं वेळा मला त्याची चाल सुचली.
गणपती स्तुती
तुझ्या सारखा तू गणराया
तुझी प्रार्थना येई फळा.
देतो विद्या सकळासी तू
देई सुख शांती सकळा !!
विद्यापती तू मंगलमुर्ती
नाम तुझे रे सदैव ओठी.
विद्याची गर लाभता
येईल संगती ती चपळा !1!
नामाचे तव महात्म्य इतुके
जळून जातील सर्व पातके.
सुखःकर्ता तू दिन दुबळ्यांसी
दुष्ट कापती चळाचळा !2!
रचनाकार@ प्रसाद नातु
Comments
Post a Comment