ब्लॉग नं. 2026/297.
दिनांक: 25 ऑक्टोबर, 2026.
मित्रांनो,
|
प्रास्ताविक: |
बहुतेक हृदयविकार झटक्यांना जीवनशैली कारणीभूत: 'सतत कनेक्टेड' राहण्याच्या आजच्या आधुनिक युगात,उत्पादक जीवनशैली आणि शारीरिक क्षमतेची सीमा ओलांडून,आरोग्याच्या गंभीर संकटापर्यंत पोहोचण्याचे अंतर अत्यंत कमी झाले आहे. कॅलिफोर्नियास्थित हृदयरोग तज्ज्ञ डॉ. संजय भोजराज,ज्यांना दोन दशकांहून अधिक काळ क्लिनिकल अनुभवाचा वारसा आहे, त्यांनी आजच्या 'व्यस्त' पिढीला एक गंभीर इशारा दिला आहे. कुठला आजार केंव्हा होईल,याबाबतचे आधीच सर्व आडाखे मोडीत काढत आजकाल,वयाच्या विशीत देखिल हृदयविकाराच्या धोक्याचे संकट पुढे घोंघावू लागलं आहे. आज याबाबत डॉ. भोजराज यांची मते आणि त्यांनी दिलेल्या सूचना आपण सविस्तर जाणून घेऊ. |
|
सविस्तर: |
डॉ. भोजराज यांच्या मते, हृदयविकाराच्या अत्यंत गंभीर घटना,सहसा एखाद्या एका चुकीच्या निर्णयामुळे घडत नाहीत.त्याऐवजी,त्यांनी एका अशा घातक दिनचर्येकडे लक्ष वेधले आहे,जी व्यक्तीच्या यशस्वी जीवनशैलीला थेट रुग्णालयाच्या खाटेपर्यंत घेऊन जाते. त्यांनी आपल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे: 'मी पाहतो त्या जवळजवळ प्रत्येक हृदयविकाराच्या रुग्णामध्ये ही विशिष्ट दिनचर्या दिसून येते.' एका घातक दिनचर्येचे स्वरूप: सोशल मीडियावर अनेकदा,हृदयविकाराच्या धोक्यांकडे पाहताना मद्यपान किंवा 'व्हेपिंग' (vaping) सारख्या वाईट सवयींवर भर दिला जातो.मात्र, डॉ. भोजराज यांच्या मते, वास्तव अधिक सामान्य आणि सर्वव्यापी आहे. 12 मार्च रोजी इन्स्टाग्रामवर त्यांनी नमूद केले की,हृदयविकाराच्या घटनेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग खालील गोष्टींनी बनलेला असतो: ⦿ रात्री उशिरापर्यंत जागणे, ज्यामध्ये स्क्रीनचा 'ब्लू लाईट' आणि अपूर्ण कामे यांचा समावेश असतो. ⦿ दीर्घकालीन तणाव, जो आता दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग (पार्श्वभूमीचा आवाज) बनला आहे. ⦿ घाईघाईत खाल्लेले (grab-and-go) जेवण,जिथे पोषक तत्त्वांपेक्षा सोयीला अधिक महत्त्व दिले जाते. ⦿ झोपेचे चक्र, जे दरवर्षी अधिकच आकुंचन पावत चालले आहे. या गोष्टींचा प्रामुख्याने समावेश होतो. तरुण लोकांना हृदयविकाराचा झटका आणि धोका: 20,30 आणि 40 च्या वयोगटातील व्यक्तींनी हृदयविकाराचा झटका आणि हृदयविकारांचा धोका कमी करण्यासाठी पाळायचे प्रतिबंधात्मक उपाय देखिल आपण जाणून घेऊ. डॉ.भोजराज म्हणतात:“माझ्या अनुभवानुसार,बहुतेक हृदयविकारांचे प्रकार या दिनचर्येतूनच सुरू होतात. यात कोणतेही मोठे किंवा नाट्यमय निर्णय नसतात; तर अशा छोट्या-छोट्या तडजोडी असतात, ज्या हळूहळू सवयीचा भाग बनतात. कालांतराने, या सवयींचे परिणाम वैद्यकीय चाचण्यांच्या अहवालात दिसून येऊ लागतात.” वयाच्या विशीत हृदयाची काळजी कशी घ्यावी? वयाच्या विशीत असताना,बहुतेक लोक आपल्या शारीरिक तंदुरुस्तीबद्दल किंवा हृदयाच्या आरोग्याबद्दल फारसा विचार करत नाहीत.मात्र, याच काळात आहार, व्यायाम आणि तणाव व्यवस्थापन यांसारख्या जीवनशैलीच्या सवयी घडत असतात,असे डॉ. छाजेर यांनी सांगितले.ते म्हणाले, "जर या वयात योग्य सवयी लावल्या, तर भविष्यात हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो." वय 30 ते 40 च्या दरम्यान काय करावे: जर तुमचे वय 20 ते 30 वर्षांच्या दरम्यान असेल, तर डॉ. छाजेर यांनी खालील गोष्टी सुचवल्या आहेत: ताज्या फळांनी, भाज्यांनी, पूर्ण धान्यांनी (whole grains) आणि प्रथिनांनी (proteins) युक्त आहार घ्या; जंक फूड, अति मीठ आणि तळलेले पदार्थ टाळा; आठवड्यातून किमान 150 मिनिटे मध्यम तीव्रतेचा शारीरिक व्यायाम करा (उदा. वेगाने चालणे, पोहणे किंवा सायकल चालवणे); आणि मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यान (meditation), योगासने किंवा दीर्घ श्वास घेण्याचे व्यायाम (deep breathing techniques) करा. यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होईल. 30 ते 40 वयोगटातील व्यक्तींनी काय करावे? 30 ते 40 वयोगटाबद्दल (मध्यम वयाची सुरुवात) बोलताना,हृदयरोग तज्ज्ञांनी काही धोक्याच्या लक्षणांकडे लक्ष वेधले.या वयात उच्च रक्तदाब (high blood pressure) तसेच कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखरेच्या पातळीत बदल दिसून येऊ शकतात.डॉ. छाजेर म्हणतात की,"अनेक लोक करिअर, कुटुंब आणि इतर जबाबदाऱ्यांमुळे शारीरिक हालचालींकडे दुर्लक्ष करतात, ज्याचा परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होतो." 30 ते 40 वयोगटातील व्यक्तींसाठी प्रतिबंधात्मक उपाय सांगताना डॉ. छाजेर यांनी खालील सूचना दिल्या आहेत: नियमित आरोग्य तपासणी: रक्तदाब,कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखरेची पातळी नियमितपणे तपासा.जर काही तफावत आढळली, तर वेळीच उपचार घ्या. शारीरिक हालचाली वाढवा: केवळ जिममध्ये जाण्यावर अवलंबून न राहता, घरी योगासने करून किंवा घरगुती कामे करून शारीरिक हालचाली वाढवण्याचा प्रयत्न करा. |
|
समारोप: |
बैठी जीवनशैली वाढल्यामुळे आणि एकंदरीत हालचालीच्या अभावामुळे,वाढत चाललेले स्थूलतेचे प्रमाण हे रक्तदाब,कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखरेची पातळी वाढण्यास कारणीभूत होत आहेत.याबद्दल कुणाला दोषही देता येणार नाही.कामाचे बदललेले स्वरूप,कार्य जीवन असंतुलन,कामाच्या अनियमित वेळा याचा तरुण पिढीवर प्रतिकूल परिणाम होत आहे.मी स्वतः हे अनुभवतो आहे की, रोजच्या जीवनाचे ठराविक वेळापत्रक ठरविण्याचा अधिकारसुद्धा आजच्या तरुण पिढीकडे नाही,त्यामुळे सातत्य रहात नाही.भविष्याचा विचार करता,या पिढीनेच यातून मार्ग काढायला हवा, हेच खरे. |
|
|
आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. |
|
महत्वाचे: |
या ब्लॉगची लिंक तुम्ही इतरांना पाठवू शकता. हा ब्लॉग मराठी सोबत इंग्लिश,हिन्दी आणि इतर भारतीय भाषात वाचता येतो,तेव्हा मराठी न समजणाऱ्यांना ब्लॉगची लिंक पाठवू शकता. |
|
📝 अस्वीकरण (Disclaimer): |
हा ब्लॉग सार्वजनिक उपलब्ध माहितीवर आणि/किंवा तज्ञांच्या माहितीवर आधारित आहे.कोणतीही आरोग्यविषयक दिनचर्या नव्याने सुरू करण्यापूर्वी नेहमी आपल्या आरोग्य तज्ञाचा सल्ला घ्या. |
प्रसाद नातु.
होलीस्टीक हेल्थ कोच
(आरोग्य आणि जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)
🙏RR
ReplyDeleteप्रथम इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ने मराठी भाषेमध्ये 11 जुलै 2020 ते 19 ऑक्टोबर 2026 या काळात सर्वात जास्त म्हणजे 1332 ब्लॉग्स आपण लिहिल्याबद्दल आपली रेकॉर्ड बुक्स मध्ये विक्रम केल्याबद्दल नोंद केली याबद्दल आपले खूप खूप हार्दिक अभिनंदन ❤️
ReplyDeleteआपली ही कामगिरी कौतुकास्पद तर आहेच त्याचबरोबर गौरवास्पद सुद्धा आहे.
या ब्लॉग्समार्फत आपण कायम नवीन नवीन माहिती पुरवत आलात जी आरोग्याच्या व इतर संदर्भात अतिशय माहितीपूर्ण व उपयुक्त होती. शब्दात त्याचे वर्णन करावे तितके थोडेच. आभार मानावे हे सुद्धा थोडंच.
खूप खूप हार्दिक अभिनंदन सर. आम्हाला आपला खूप अभिमान वाटतो. आपल्या हातून भविष्यात असे चांगले कार्य घडत राहो ही मनापासून व हृदयापासून सदिच्छा 🙏
आजचा ब्लॉग पण माहिती पूर्ण होता हे सांगायची गरज नाही
🙏