ब्लॉग नं. 2026/302.
दिनांक: 30 ऑक्टोबर, 2026.
मित्रांनो,
|
प्रास्ताविक: |
'लिपोप्रोटीन' म्हणजे काय? 'लिपोप्रोटीन' हे कोलेस्ट्रॉल वाहून नेण्याचे कार्य करतं.कोलेस्ट्रॉल वाहून नेणारे
दोन प्रमुख 'लिपोप्रोटीन' असतात.त्यापैकी
एक म्हणजे LDL (लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन).याला अनेकदा 'वाईट कोलेस्ट्रॉल' म्हटले जाते,कारण यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये चरबी
साचून हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका कैक पटीने वाढतो. म्हणूनच, जर तुमच्या वैद्यकीय चाचणी अहवालात LDL ची पातळी
जास्त आली असेल, तर वेळीच योग्य ती काय खबरदारी घेणे आवश्यक आहे, हे आजच्या ब्लॉगमधून समजून घेऊया.
|
|
सविस्तर: |
वाईट' कोलेस्ट्रॉल
कसे कमी करावे? आता
प्रश्न पडतो की, नैसर्गिकरीत्या
किंवा घरगुती आहारातून हे 'वाईट' कोलेस्ट्रॉल
कसे कमी करावे? नुकत्याच एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये 'इंटरनल मेडिसिन' तज्ज्ञ डॉ. अदिती शर्मा यांनी अशा
5 भारतीय पदार्थांची यादी दिली आहे, जे वैज्ञानिक
पुराव्यांवर आधारित असून,उच्च LDL कमी करण्यास मदत करू
शकतात. 'वाईट' कोलेस्ट्रॉल (LDL) कमी
करणारे 5 भारतीय पदार्थ: 1.ओट्स किंवा
दलिया (विरघळणाऱ्या फायबरचा उत्तम स्रोत): आपल्यापैकी
अनेकांच्या घरात दलिया किंवा ओट्स खाल्ले जातात.यात 'बीटा-ग्लुकन' नावाचे
विरघळणारे फायबर भरपूर प्रमाणात असते.हे फायबर आतड्यांमध्ये कोलेस्ट्रॉलला घट्ट
बांधून ठेवते आणि शरीराबाहेर काढून टाकण्यास मदत करते.डॉ. अदिती यांच्या
म्हणण्यानुसार, याचे नियमित सेवन केल्यास LDL ची पातळी 5 ते 10 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते. 2.इसबगोल
(सायलियम हस्क): "हो,हे तेच इसबगोल आहे जे आपण सामान्यतः बद्धकोष्ठतेसाठी वापरतो!"
इसबगोल हे केवळ पोटासाठीच नव्हे तर हृदयासाठीही फायदेशीर आहे.हे पित्त आम्लांना
(bile acids) बांधून ठेवते,ज्यामुळे
यकृताला नवीन पित्त तयार करण्यासाठी शरीरातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉल वापरावे
लागते.परिणामी, रक्तातील LDL ची
पातळी नैसर्गिकरीत्या कमी होते.वैद्यकीय मार्गदर्शक तत्त्वांमध्येही याचा वापर
करण्याचा सल्ला दिला जातो. 3.सुकामेवा
(बदाम आणि अक्रोड): बदाम आणि
अक्रोड हे आरोग्यासाठी उत्तम मानले जातात. हे पदार्थ शरीराला संतृप्त चरबीऐवजी
आरोग्यदायी चरबी (MUFA आणि
ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स) पुरवून कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारतात. तसेच हे 'ApoB'
चे प्रमाण देखील कमी करतात, म्हणजेच
शरीरातील हानिकारक कोलेस्ट्रॉलचे कण कमी होण्यास मदत होते. 4.तंतुमय
पदार्थांनी युक्त भाज्या (भेंडी, दुधी भोपळा, वांगी,
गाजर, पालक): “आहारातील
तंतुमय पदार्थ (Fiber) आतड्यांमधून कोलेस्ट्रॉलचे
पुनर्शोषण कमी करतात आणि इन्सुलिन प्रतिरोधकता देखील सुधारतात,ज्यामुळे अप्रत्यक्षपणे चरबी नियंत्रणात मदत होते.जास्त भाज्या म्हणजे
उत्तम हृदय आरोग्य,” अशी मोलाची शिफारस डॉ. अदिती करतात.आपल्या
जेवणात हिरव्या पालेभाज्या आणि फळभाज्यांचा जास्तीत जास्त समावेश करा. 5.ग्रीन किंवा ब्लॅक टी (जास्त साखरेशिवाय): शेवटी,कोणत्याही साखरेविवाहित ग्रीन टी किंवा ब्लॅक टी पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे.यात 'पॉलीफेनॉल' नावाचे घटक असतात,जे आतड्यांमधील कोलेस्ट्रॉलचे शोषण कमी करतात आणि रक्तवाहिन्यांची अँटिऑक्सिडंट स्थिती सुधारतात.याचा प्रभाव लहान असला तरी, दररोजच्या सवयीत याचा समावेश केल्यास आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरतो. |
|
समारोप: |
आहार आणि
घरगुती उपाय नक्कीच मदत करतात, परंतु आरोग्याबाबत अतिआत्मविश्वास न बाळगता तज्ज्ञांचा सल्ला घेणे
गरजेचे आहे. डॉ. अदिती यांनी स्पष्ट केले आहे की, जर तुमचे
एलडीएल (LDL) आधीच खूप जास्त असेल किंवा तुम्हाला मधुमेह,
उच्च रक्तदाब, पीसीओएस (PCOS), फॅटी लिव्हरचा त्रास असेल, अथवा तुमच्या कुटुंबात
हृदयरोगाचा इतिहास असेल, तर केवळ आहार औषधांची जागा घेऊ
शकत नाही. अशा वेळी योग्य जीवनशैलीसोबत वैद्यकीय औषधोपचार दोन्ही अतिशय आवश्यक
आहेत. भारतीयांमध्ये
हृदयरोग बऱ्याचदा लवकर सुरू होतो आणि सुरुवातीला कोणतीही लक्षणे दिसत नाहीत.
त्यामुळे लक्षणांची वाट पाहू नका. वर्षातून किमान एकदा तुमची लिपिड प्रोफाइल
चाचणी आवर्जून करा आणि आजपासूनच आरोग्यासाठी प्रतिबंधात्मक सवयी अंगीकारा. |
|
|
आजचा
हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये
तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ
रहा,आनंदी रहा,मस्त जगा. |
|
महत्वाचे: |
या ब्लॉगची लिंक तुम्ही इतरांना पाठवू शकता. हा ब्लॉग
मराठी सोबत इंग्लिश,हिन्दी आणि इतर भारतीय भाषात वाचता येतो,तेव्हा मराठी न
समजणाऱ्यांना ब्लॉगची लिंक पाठवू शकता.
|
|
📝 अस्वीकरण
(Disclaimer): |
हा ब्लॉग सार्वजनिक
उपलब्ध माहितीवर आणि/किंवा तज्ञांच्या माहितीवर आधारित आहे.कोणतीही आरोग्यविषयक
दिनचर्या नव्याने सुरू करण्यापूर्वी नेहमी आपल्या आरोग्य तज्ञाचा सल्ला घ्या. |
प्रसाद नातु.
होलीस्टीक
हेल्थ कोच

🙏RR
ReplyDeleteखूप छान माहिती
ReplyDelete