Skip to main content

'या' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर

ब्लॉग नं. 2026/1 71.   दिनांक: 20 जून, 2026. मित्रांनो, संध्याकाळी 5 नंतरच्या ' या ' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर दिवस मावळत असताना , आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं , तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते , संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता , त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर ( Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ.    सविस्तर: ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या एका अहवालानुसार , आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते , तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी , रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो. आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या ...

गुढी पाडवा: नविन वर्षाच्या शुभेच्छा

ब्लॉग नं.2026/078.

दिनांकः 19 मार्च, 2026. 

मित्रांनो,

🌸 गुढी पाडवा: नववर्षाची आनंदमयी सुरुवात 🌸

गुढी पाडवा हा महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचा आणि आनंददायी सण आहे. हिंदू पंचांगानुसार चैतन्यपूर्ण चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला हा सण साजरा केला जातो. हा दिवस म्हणजेच मराठी नववर्षाची सुरुवात मानली जाते. या दिवशी प्रत्येक घरात नवीन आशा, ऊर्जा आणि सकारात्मकतेचा संचार होतो. आज या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना नविन वर्षाच्या आनंददायी शुभेच्छा.

सविस्तरः

🌿 गुढी पाडव्याचे महत्त्वः

आज काल हे पहायला मिळतं की, ज्या सणांमधे ऐश्वर्य, श्रीमंती, मोठेपणा दाखविण्याची असते किंवा जो सण धूमधडाक्यात करायचा असतो, अशा सणांचं महत्व वाढलंय. या सणांमधून संस्कृतीचे दर्शन होतं, संस्काराचं पावित्र्य कळतं, जपलं जातं. ते सण तेवढे उत्साहाने साजरे होत नाहीत.खरं तर गुढी पाडवा हा केवळ सण नाही, तर तो नवीन सुरुवात, विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे.यामागे अनेक पौराणिक आणि ऐतिहासिक कथा सांगितल्या जातात:

भगवान श्रीराम यांनी रावणावर विजय मिळवून अयोध्येत परत येताना लोकांनी गुढी उभारून आनंद व्यक्त केला, त्यांचं स्वागत केलं होतं, अशी आख्यायिका आहे.तसेच

शालिवाहन विजय या विजयानंतर शालिवाहन शकाची सुरुवात झाली असे मानले जाते. पण आजकाल लोक हे विसरत चाललेत. म्हणून, गुढी पाडव्याची संपूर्ण माहिती देणारा हा ब्लॉग मी लिहीला आहे.

🏠 गुढी कशी उभारली जाते?

गुढी म्हणजे विजयाचा ध्वज. ती घराच्या दारात किंवा खिडकीत उंचावर उभारली जाते. गुढीमध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू:  बांबूची काठी, रेशमी कापड (सहसा पिवळे किंवा केशरी/भगवे), साखरेच्या गाठी,कडुनिंबाची पाने, फुलांची माळ, चांदी किंवा तांब्याचा कलश.

ही गुढी वाईट शक्तींना दूर ठेवते आणि घरात सुख-समृद्धी आणते असा विश्वास आहे.सुर्यास्ताच्या आंत गुढी उतरवून ठेवायची आणि कडुनिंबाची पानं आणि साखरेच्या गाठीचा, म्हणजेच जिवनातील कडू आणि गोड गोष्टींचा प्रतिक असा, प्रसाद भक्षण करायचा असतो.

🍽️ पारंपरिक पदार्थ

गुढी पाडव्याच्या दिवशी खास पदार्थ बनवले जातात: जसे की, पुरी-श्रीखंड 🍨, पुरणपोळी , 🫓कडुनिंब आणि साखरेच्या गाठीचे मिश्रण, खाण्याची परंपरा सांगते की जीवनात गोड आणि कडू दोन्ही अनुभव स्वीकारावे लागतात.

🎉 सण साजरा करण्याची पद्धतः

घराची स्वच्छता आणि सजावट, रांगोळी काढणे, नवीन कपडे घालणे, गुढी उभारणे आणि कुटुंबासोबत पूजा आणि जेवण.

🌼 गुढी पाडव्याचा संदेश:

गुढी पाडवा आपल्याला शिकवतो की: प्रत्येक नवीन वर्ष म्हणजे नवीन संधी,सदप्रवृत्तीचा शेवटी विजय होतो, सकारात्मक विचारांनी जीवन सुंदर होते आणि  परंपरा जपणे ही आपली जबाबदारी आहे.

 समारोप:

गुढी पाडवा हा सण आनंद, उत्साह आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे. या दिवशी आपण जुन्या गोष्टी विसरून नव्या आशा आणि स्वप्नांसह जीवनाची नवी सुरुवात करतो.आपल्याला आणि आपल्या परिवाराला गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

 प्रसाद नातु.

(आरोग्य आणि जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)

📝 टीप: हा लेख केवळ माहितीपुरता आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.  

 

Comments

  1. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...