Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

HDL : चांगल्या कोलेस्टेरॉलकडे लक्ष असू द्या

ब्लॉग नं. 2026/025.

दिनांकः 25 जानेवारी, 2026. 

मित्रांनो,

HDL : चांगले कोलेस्टेरॉल – हृदयाच्या आरोग्याचा खरा रक्षक

आजकाल रक्ततपासणीचा अहवाल हातात आला की,अनेकांची नजर थेट कोलेस्टेरॉल या शब्दावर जाते. “कोलेस्टेरॉल वाढलंय” असे ऐकताच घाबरायला होते.पण खरं पाह्यला गेलं तर सर्वच कोलेस्टेरॉल वाईट नसतं.त्यातीलच एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे HDL – High Density Lipoprotein, ज्याला आपण चांगले कोलेस्टेरॉल म्हणतो.आजच्या या ब्लॉगमध्ये HDL – High Density Lipoprotein आपण सविस्तर जाणून घेऊ या.    

सविस्तर:

HDL म्हणजे नेमके काय?

HDL हे रक्तामधील एक प्रकारचे लिपोप्रोटीन आहे,जे शरीरातील अतिरिक्त कोलेस्टेरॉल गोळा करून,ते यकृताकडे परत नेते.यकृत ते कोलेस्टेरॉल नष्ट करून किंवा पित्तामार्फत शरीराबाहेर टाकते.त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल साचत नाही. याच कारणामुळे HDL ला चांगले कोलेस्टेरॉल म्हटले जाते.

HDL चे महत्त्व का आहे?

HDL चे मुख्य काम म्हणजे रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवणे. त्यामुळे, रक्तवाहिन्यांमध्ये प्लॅक साचत नाही, रक्तप्रवाह सुरळीत राहतो, हृदयविकार, हृदयविकाराचा झटका व स्ट्रोकचा धोका कमी होतो. थोडक्यात सांगायचे तर, HDL हे हृदयासाठी एक प्रकारचे संरक्षण कवच आहे.

HDL कसे काम करते?

HDL शरीरात Reverse Cholesterol Transport ही प्रक्रिया करते.म्हणजे,रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर साचलेले अतिरिक्त कोलेस्टेरॉल गोळा करते, ते यकृतापर्यंत पोहोचवते, यकृत (Liver) ते कोलेस्टेरॉल शरीरातून बाहेर टाकते.यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होत नाहीत आणि हृदयावर ताण येत नाही.

HDL ची योग्य पातळी किती असावी?

HDL पातळी (Level) साधारणतः, पुरुषांमध्ये 40 mg/dL पेक्षा कमी असेल तर धोकादायक असते,तसेच स्त्रियांमध्ये 50 mg/dL पेक्षा कमी असेल तर धोकादायक असते. 40–59 mg/dL समाधानकारक

60 mg/dL किंवा अधिक उत्तम असते.  

👉 HDL जितके जास्त, तितके हृदय अधिक सुरक्षित.

HDL कमी का होते?

आजच्या जीवनशैलीमुळे अनेकांमध्ये HDL कमी आढळते. त्यामागची कारणे अशी,शारीरिक  हालचालींचा अभाव, सतत बसून काम करणे, धूम्रपान करणे,वजन जास्त असणे,रक्तात जास्त साखर असणे आणि पांढऱ्या पिठाच्या पदार्थाचे अधिक सेवन, मधुमेह असणे, वाढते वय आणि आनुवंशिक कारणे.

HDL कमी असल्याचे धोके:

HDL कमी असल्यास पुढील आजारांचा धोका वाढतो. हृदयरोग, हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, तसेच

मेटाबॉलिक सिंड्रोम आणि LDL (वाईट कोलेस्टेरॉल) वाढणे. म्हणूनच फक्त LDL कमी करण्यावर लक्ष केंद्रित न करता HDL वाढवणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

HDL नैसर्गिकरित्या कसे वाढवता येईल?

 

1. नियमित व्यायाम:  दररोज 30 ते 45 मिनिटे व्यायाम, चालणे, सायकलिंग, पोहणे आणि हलके ताकदवर्धक व्यायाम यामुळे HDL 5 ते 10 % पर्यंत वाढू शकते.

2. चांगल्या चरबीचा (Good Fats) वापर:   आहारात पुढील गोष्टींचा समाविष्ट करा:-ऑलिव्ह तेल, बदाम, अक्रोड, जवस, चिया बिया, ओमेगा-३ युक्त पदार्थ इत्यादि. आहारातून पुढील गोष्टी वर्ज करा, ट्रान्स फॅट, तळलेले व पॅकेज्ड पदार्थ इत्यादि

3. धूम्रपान टाळा: धूम्रपान बंद केल्यास काही आठवड्यांत HDL सुधारते.

4. वजन नियंत्रणात ठेवा: फक्त 5 ते 10 % वजन कमी केल्यासही HDL वाढते.

5. साखर आणि रिफाइन्ड कार्बोहायड्रेट कमी करा: जास्त साखर खाल्याने HDL कमी होते आणि ट्रायग्लिसराइड्स वाढते.

वय वाढल्यावर HDL चे महत्त्व:

            वयाची 60 वर्षे झाल्यानंतर,शरीरातील चयापचय मंदावतो. या वयात, HDL कमी होण्याची शक्यता वाढते, व्यायाम व आहार यांचे महत्त्व अधिक वाढते, म्हणूनच ज्येष्ठांनी HDL पातळीवर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

समारोप: 

म्हणूनच,HDL म्हणजे केवळ एक आकडा नाही, तर हृदयाच्या आरोग्याचा खरा मित्र आहे.LDL कमी करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच HDL वाढवणेही गरजेचे आहे. निरोगी जीवनशैली, संतुलित आहार आणि नियमित हालचाल यांमुळे HDL वाढवता येते आणि हृदय दीर्घकाळ निरोगी ठेवता येते.

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

प्रसाद नातु.

(आरोग्य आणि जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)

📝 टीप: हा लेख केवळ माहितीपुरता आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.  

 

Comments

  1. अतिशय उपयुक्त ब्लॉग
    मिलिंद निमदेव

    ReplyDelete
  2. उपयुक्त माहिती

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...