Skip to main content

'या' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर

ब्लॉग नं. 2026/1 71.   दिनांक: 20 जून, 2026. मित्रांनो, संध्याकाळी 5 नंतरच्या ' या ' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर दिवस मावळत असताना , आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं , तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते , संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता , त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर ( Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ.    सविस्तर: ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या एका अहवालानुसार , आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते , तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी , रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो. आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या ...

लाल भोपळ्याच्या बिया आरोग्यास फायदेकारक

ब्लाॅग नं:2025/175
दिनांकः 25 जून, 2025.

मित्रांनो,

            लाल भोपळ्याची भाजी किंवा रायतं केल्यावर,आपण लाल भोपळ्याच्या बिया फेकून देतो. फार क्वचित काही लोक त्याचा वापर करतांना दिसतात.लाल भोपळ्याच्या बियांमध्ये किती पोषण मूल्य आहेत, या बियांमद्धे प्रथिने आहेत,विविध व्हिटॅमिन्स आणि खनिजे देखिल आहेत. हे आजच्या ब्लॉगमध्ये आपण जाणून घेणार आहोत.        

सविस्तर:

भोपळ्याच्या बिया: पोषण आणि फायदे:

भोपळ्याच्या बिया (पेपिटास) लहान,हिरव्या रंगाच्या बिया आहेत,ज्या भोपळ्याच्या चिरल्यानंतर आत आढळतात. त्या पोषणमूल्यांनी समृद्ध असून आरोग्यासाठी पयुक्त आहेत.त्यात कुठली पोषणमूल्ये आहेत,ते पाहू या.   

भोपळ्याच्या बिया खालील पोषकद्रव्यांनी समृद्ध आहेत:

निरोगी फॅट्स: लाल भोपळ्याच्या बियांमध्ये ओमेगा-3 आणि ओमेगा-6 सारख्या असंतृप्त फॅट्स आहेत.  

प्रथिने: लाल भोपळ्याच्या बिया, वनस्पतीजन्य प्रथिनांचा म्हणजे (Plant-based Proteins) चा उत्तम स्रोत आहे.

व्हिटॅमिन्स: लाल भोपळ्याच्या बियांमध्ये, व्हिटॅमिन E, K, आणि B गटातील पोषकतत्त्वे आढळून येतात.

खनिजे: लाल भोपळ्याच्या बियांमध्ये,मॅग्नेशियम, झिंक, लोह, मॅंगनीज, फॉस्फरस आणि पोटॅशियम ही खनिजे देखिल आढळून येतात.

अँटिऑक्सिडंट्स:  लाल भोपळ्याच्या बिया,शरीरातील दाह कमी करून ऑक्सिडेटिव्ह ताण रोखतात.अशा प्रकारे त्या अँटिऑक्सिडंट्सचे कार्य करतात.  

लाल भोपळ्याच्या बियांचे आरोग्यदायी फायदे:

हृदयासाठी फायदेशीर:

लाल भोपळ्याच्या बियांमध्ये असलेल्या मॅग्नेशियम व ओमेगा-3 फॅट्स हृदयाचे कार्य सुधारते.तसेच अँटिऑक्सिडंट्समुळे रक्तवाहिन्यांचे नुकसान टळते.

रक्तातील साखर नियंत्रण:

लाल भोपळ्याच्या बियांमध्ये असलेल्या मॅग्नेशियममुळे इन्सुलिन नियंत्रित होते,ज्यामुळे रक्तातील साखर कमी होते.

तसेच लाल भोपळ्याच्या बियांचे सेवन हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास कारणीभूत ठरतात. झिंक आणि अँटिऑक्सिडंट्स रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात.

हाडांचे आरोग्य सुधारते:

लाल भोपळ्याच्या बियांमध्ये असलेल्या मॅग्नेशियममुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते.

झोप सुधारते:

लाल भोपळ्याच्या बियांमध्ये असलेल्या,ट्रायप्टोफॅन घटकांमुळे  सेरोटोनिन आणि मेलाटोनिन तयार होते,जे झोप झोप चांगली लागण्यास सहाय्यभूत ठरते.

वजन नियंत्रण:

फायबर आणि प्रथिनांचा समावेश असल्याने भोपळ्याच्या बिया पौष्टिक आणि पोटभरणारा स्नॅक ठरतात.

पुरुषांच्या आरोग्यासाठी:

पुरुषांमध्ये मूत्राशयाच्या खाली आणि मूत्रमार्गाभोवती प्रोस्टेट ग्रंथी असतात.लाल भोपळ्याच्या बियांमध्ये असलेल्या झिंकमुळे प्रोस्टेटचे आरोग्य सुधारते.तसेच व्हिटॅमिन E आणि फॅट्समुळे त्वचा चमकदार व केस मजबूत होतात.

भोपळ्याच्या बिया आहारात कशा समाविष्ट करायच्या?

भोपळ्याच्या बिया, कच्च्या किंवा भाजून कुरकुरीत स्नॅक म्हणून खाऊ शकता.किंवा डिशमध्ये सॅलड, दही, ओट्स, किंवा सूपमध्ये मिसळून खाता येईल. ब्रेड, मफिन्स किंवा ग्रॅनोला बार तयार करताना वापरा त्यात मिसळून खाता येईल.याचा उपयोग स्मूदीमध्ये टाकून करता येईल.बिया बारीक करून इतर पीठांमध्ये मिसळून त्याचे सेवन करता येते.

भोपळ्याच्या बियांचे साठवणुकीचे उपाय:

भोपळ्याच्या बिया शक्यतो,हवाबंद डब्यात थंड व कोरड्या ठिकाणी ठेवा.अधिक काळ टिकवण्यासाठी फ्रिजमध्ये साठवा.

भोपळ्याच्या बियांची रेसिपी: भोपळ्याच्या बियांचा हलवा:

साहित्य:

1)1 कप भाजलेल्या भोपळ्याच्या बिया:2) साखर किंवा गूळ: 1/2 कप, 3) दूध: 1 कप;4) तूप: 2 चमचे, 5)  वेलची पूड: 1/4 चमचा; 6) शर (ऐच्छिक): 4-5 काड्या; 7)सजावटीसाठी ड्रायफ्रूट्स.

कृती:

बिया कोरड्या तव्यावर भाजून घ्या.दूध गरम करून त्यात केशर मिसळा व बाजूला ठेवा.कढईत तूप गरम करून बिया परतून घ्या.मग त्यात साखर किंवा गूळ टाकून सतत ढवळत राहा.मिश्रण घट्ट झाल्यावर वेलची पूड घाला.ड्रायफ्रूट्सने सजवा व गरमागरम हलवा सर्व्ह करा.

समारोप:

वर दिलेली रेसिपी मी घरी एकदा करून पहाणार आहे. तुम्ही ही करून बघा,तुम्हाला कदाचित,आवडेल देखिल,अशी आशा आहे. पुनः ही केवळ चविष्ट नसेल तर,ही रेसिपी विविध औषधी गुण आणि पोषणमूल्ये सोबत घेऊन तुमच्या पानांत सजणार आहे.    

आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

प्रसाद नातु, पुणे.


Comments

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...