ब्लॉग नं:2025/174.
दिनांक: 24 जून, 2025.
मित्रांनो,
नोक्ट्यूरिया
ही एक अशी अवस्था आहे,ज्यामध्ये रात्री झोपेतून वारंवार
लघवीसाठी जाग येते. ही समस्या प्रामुख्याने वृद्धांमध्ये आढळते,परंतु कोणत्याही वयातील व्यक्तींना
होऊ शकते.नोक्ट्यूरिया हा एक रोग नसून,एखाद्या अंतर्निहित समस्येचे किंवा
जीवनशैलीच्या सवयीचे लक्षण आहे.आजच्या ब्लॉगमधे याबाबत सविस्तर जाणून घेऊ.
सविस्तरः
नोक्ट्यूरिया होण्याची कारने कोणती ती आपण जाणून घेऊ,त्यानंतर
नोक्ट्यूरियाची लक्षणे आणि त्यावर काय उपाय आणि उपचार आहेत,ते देखिल बघू.
नोक्ट्यूरियाची कारणे:
1. जीवनशैलीशी
संबंधित कारणे:
झोपण्यापूर्वी
द्रवपदार्थ (विशेषतः कॅफिन किंवा अल्कोहोल) जास्त प्रमाणात घेणे.तसेच काही मूत्रवर्धक
पदार्थ (काही औषधे किंवा अन्नपदार्थ) घेतल्यामुळे नोक्ट्यूरियाचा त्रास होऊ शकतो.
2. वैद्यकीय स्थिती:
ओव्हरअॅक्टिव ब्लॅडर
(ओएबी):
OAB)
म्हणजे लघवीचे नियंत्रण व्यवस्थित न राहण्याची स्थिती. ही
समस्या मूत्राशयाच्या स्नायूंमध्ये असणाऱ्या अति-संवेदनशीलतेमुळे होते, ज्यामुळे लघवी करण्याची तीव्र इच्छा वारंवार होते.
मूत्र मार्गाचा संसर्ग (युटीआय):
UTI (Urinery
Track Infection) म्हणजे
मूत्रमार्गातील कोणत्याही भागात,जसे की मूत्राशय,मूत्रमार्ग
(urethra), किंवा मूत्रपिंडांमध्ये संसर्ग होणे. सामान्यतः
हा संसर्ग बॅक्टेरियामुळे
होतो, परंतु काही वेळा व्हायरस किंवा बुरशीमुळेही होऊ शकतो.
सौम्य प्रोस्टेट ग्रंथी वाढ (बीपीएच):
बीपीएच (Benign Prostatic
Hyperplasia)
म्हणजे प्रोस्टेट ग्रंथीची वाढ झाल्याने निर्माण होणारी स्थिती.ही एक गैरकर्करोगजन्य
(non-cancerous) समस्या असून, प्रामुख्याने
वृद्ध पुरुषांमध्ये आढळते. प्रोस्टेट ग्रंथी मूत्राशयाच्या खाली आणि
मूत्रमार्गाभोवती (urethra) असते. वय वाढल्यावर ही ग्रंथी
मोठी होते, ज्यामुळे मूत्रमार्ग संकुचित होतो आणि लघवी करणे
कठीण होते.
मधुमेह:
मधुमेहामुळे लघवीचे प्रमाण वाढते.ज्यामुळे रात्री वारंवार लघवीसाठी जावे लागते.हे नोक्ट्यूरियाचे एक कारण आहे. हृदयविकार: हृदयविकारांमुळे दिवसा साठलेला द्रव रात्री बाहेर पडतो.
किडनी समस्या: किडनीचे मूत्र एकाग्र करण्याचे कार्य
कमी होणे.
झोपेचे विकार: स्लीप अॅपनियामुळे अप्रत्यक्षपणे
नोक्ट्यूरिया होतो.
एडिमा: पायांमध्ये साचलेला द्रव रात्री
झोपताना हलतो.
3. वयाशी संबंधित बदल:
मूत्राशयाची
क्षमता कमी होणे.वासोप्रेसिन नावाच्या हार्मोनचे उत्पादन कमी होणे, जे मूत्राचे प्रमाण नियंत्रित करते.
4. औषधांचे परिणाम:
उच्च
रक्तदाब किंवा हृदयविकारांसाठी घेतले जाणारे मूत्रवर्धक याचा ही परिणाम होऊन नोक्ट्यूरिया
होऊ शकतो.द्रव संतुलनावर परिणाम करणारी इतर औषधे.
नोक्ट्यूरियाची लक्षणे
1.रात्री वारंवार लघवीसाठी
जाग येणे.2.झोपेत व्यत्यय आल्यामुळे थकवा आणि चिडचिड होणे.3.खराब झोपेमुळे
जीवनमानात घट.4.काही प्रकरणांमध्ये लघवीचा तातडीचा त्रास किंवा लघवी रोखण्यात अडचण
होणे.
उपाय आणि उपचार:
जीवनशैलीत बदल:
1.झोपण्यापूर्वी द्रवपदार्थ
कमी करणे: झोपेच्या
2-3
तास आधीपासून द्रवपदार्थ घेणे टाळा.
2.मूत्रवर्धक पदार्थांवर
नियंत्रण ठेवा: विशेषतः
संध्याकाळी कॅफिन आणि अल्कोहोल घेण्याचे टाळा.
पाय उंच ठेवा: संध्याकाळी पाय उंच ठेवल्याने
पायातील साचलेला द्रव कमी होतो.
तंदुरुस्त राहा: मूत्राशयावरील दाब कमी होतो.
वैद्यकीय उपचार:
मुळ कारणांवर उपचार करा: युटीआय, मधुमेह
किंवा हृदयाशी संबंधित समस्यांचे निदान आणि उपचार करा.
औषधे:
ओव्हरअॅक्टिव
ब्लॅडरसाठी अँटिकोलिनर्जिक्स.बीपीएचसाठी अल्फा-ब्लॉकर्स किंवा 5-अल्फा रिडक्टेस इनहिबिटर्स.रात्री
मूत्राचे प्रमाण कमी करण्यासाठी डेस्मोप्रेसिन.तसेच झोपेचे विकार व्यवस्थापित करा.स्लीप
अॅपनियासाठी सतत सकारात्मक वायुदाब (सीपीएपी) उपचार.
मूत्राशयाचे प्रशिक्षण:
मूत्राशयाची
क्षमता वाढवण्यासाठी आणि नियंत्रण सुधारण्यासाठी विशिष्ट तंत्रांचा उपयोग करा.
घरगुती उपाय:
औषधी
चहा (उदा. कॅमोमाइल) मूत्राशय शांत करण्यास मदत करू शकतो.नियमित व्यायामाने
रक्ताभिसरण सुधारते आणि आरोग्य चांगले राहते.
समारोपः
नोक्ट्यूरिया
तुमचे दैनंदिन जीवन विस्कळीत करत असल्यास किंवा लघवी करताना त्रास होतो, वेदना होतात किंवा रक्त दिसल्यास
त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. नोक्ट्यूरियाचे मूळ कारण ओळखून त्यावर योग्य
उपचार केल्यास ही समस्या प्रभावीपणे हाताळता येते.
आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि
आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.
प्रसाद
नातु, पुणे.
आरोग्यावर महत्त्वपूर्ण माहिती विशेषतः सीनियर सिटीजन साठी
ReplyDelete