Skip to main content

मेटफॉर्मिन टाइप 2 मधुमेहासाठी औषध

  ब्लॉग सं. 2025/1 51 दिनांकः 1 जून , 2025. मित्रांनो ,  जे मधुमेही आहेत,आणि टाइप 2 या प्रकारात मोडतात. म्हणजेच साधारणतः चाळीशी नंतर मधुमेह झाला आहे.त्यांना मेटफॉर्मिन बद्दल कल्पना असेल किंवा असायला हवी. मेटफॉर्मिन हे टाइप 2 मधुमेह नियंत्रणासाठी सर्वाधिक वापरले जाणारे औषध आहे.त्याची परिणामकारकता , सुरक्षितता , आणि परवडणारी किंमत , यामुळे हे पहिल्या पसंतीचे औषध मानले जाते.मेटफॉर्मिन कसे कार्य करते आणि त्याचे संभाव्य दुष्परिणाम काय आहेत , हे जाणून घेणे आवश्यक आहे. मेटफॉर्मिन म्हणजे काय ? मेटफॉर्मिन हे बिग्वानाइड्स नावाच्या औषधांच्या वर्गातील आहे.हे टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये,रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते.आरोग्यदायक आहार आणि नियमित व्यायाम यांसोबत,याचा उपयोग विशेषतः केला जातो. टाइप 1 मधुमेहासाठी हे औषध सहसा वापरले जात नाही , कारण त्या स्थितीत शरीर इन्सुलिन तयार करत नाही. मेटफॉर्मिन दोन मुख्य प्रकारांमध्ये उपलब्ध आहे: 1.        तत्काळ परिणाम करणाऱ्या गोळ्या – दिवसातून अनेक वेळा घेतल्या जातात. 2....

पॅन 2.00 प्रकल्प PAN 2.00 Project

ब्लॉग नं. 2024/289

दिनांक:- 30 नोव्हेंबर, 2024.

मित्रांनो,

        नुकतीच तुम्ही पॅन कार्ड संबंधात न्यूजपेपर आणि समाज माध्यमातून आलेली माहिती वाचली असेल.केंद्रीय मंत्रिमंडळाने पॅन 2.0 प्रकल्पाला मंजुरी दिली आहे, ज्यामुळे विद्यमान कायम खाते क्रमांक (Permanent Account Number - PAN) प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होणार आहेत. हा प्रकल्प करदात्यांच्या सेवांमध्ये सुधारणा करण्यासोबतच भारतातील व्यावसायिक प्रक्रियांना सुलभ करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

सविस्तर:

पॅन 2.0 चे नवे वैशिष्ट्ये:

या प्रकल्पांतर्गत पॅन कार्डमध्ये आता QR कोडचा समावेश करण्यात येईल,हे कार्ड सर्व करदात्यांना विनामूल्य उपलब्ध करून दिले जाईल.या संबंधात पुढे बोलतांना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, पॅन 2.0 हे सर्व शासकीय यंत्रणांसाठी  एकत्रित व्यवसाय ओळखपत्र (Unified Business Identifier) म्हणून कार्य करेल आणि नियामक गरजा सुलभ करेल.

वर्तमान पॅन कार्ड्सची वैधता:

QR कोड नसलेल्या वर्तमान पॅन कार्ड्सच्या वैधतेबद्दल चिंता व्यक्त केली गेली आहे. अशा पॅन कार्ड्स वैध राहतील की त्यांना अद्ययावत करणे आवश्यक असेल याबाबतची स्पष्टता लवकरच दिली जाईल.

पॅन 2.0 म्हणजे काय?

25 नोव्हेंबर 2024 च्या सरकारी प्रसिद्धीपत्रकानुसार, पॅन 2.0 प्रकल्प हा महत्त्वपूर्ण ई-गव्हर्नन्स उपक्रम आहे. या प्रकल्पाचा उद्देश पॅन (Permanent Account Number) आणि टॅन (Tax Deduction and Collection Account Number) सेवांमध्ये तांत्रिक प्रगतीद्वारे करदात्यांची नोंदणी प्रक्रिया सुधारण्याचा आहे.

पॅन 2.0 ची वैशिष्ट्ये:

  • पॅन आणि टॅन सेवांची एकात्मिक प्रणाली.
  • प्रगत पॅन पडताळणी प्रणाली.
  • विशिष्ट शासकीय डिजिटल प्रणालींमध्ये पॅनचा सार्वत्रिक ओळखपत्र (Universal Identifier) म्हणून उपयोग.
  • कागदरहित व सुलभ सेवा.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, "पॅन कार्ड हे मध्यमवर्गीय आणि लहान व्यावसायिकांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. पॅन 2.0 च्या माध्यमातून आम्ही मजबूत डिजिटल पायाभूत सुविधा तयार करत आहोत."

तुम्हाला पॅन 2.0 साठी पुन्हा अर्ज करावा लागेल का?

विद्यमान पॅन कार्ड धारकांना पॅन 2.0 प्रणाली अंतर्गत नवीन पॅनसाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही. सध्याचे पॅन कार्ड्स वैध राहतील आणि चालू असतील. मात्र, ज्यांना त्यांचे पॅन तपशील अद्ययावत किंवा दुरुस्त करायचे आहेत, त्यांच्यासाठी तो पर्याय उपलब्ध असेल.

QR कोड नसलेल्या विद्यमान पॅन कार्ड्सचे काय?

QR कोडचा समावेश 2017-18 पासूनच पॅन कार्डांमध्ये करण्यात आला आहे. पॅन 2.0 उपक्रमांतर्गत, या QR कोडमध्ये सुधारणा होणार असून तो डायनॅमिक QR कोड स्वरूपात असेल, जो पॅन डेटाबेसमधील अद्ययावत माहिती प्रदर्शित करेल.

ज्यांच्या पॅन कार्ड्समध्ये QR कोड नाही, त्यांना नवीन QR कोडसह पॅन कार्डसाठी अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध असेल. हे विद्यमान पॅन 1.0 प्रणाली किंवा नवीन पॅन 2.0 प्रणाली अंतर्गत करता येईल.

पॅन तपशील अद्ययावत करण्याचा मार्ग:

सध्याच्या पॅन कार्ड वर नांव,जन्म तारीख आणि पॅन क्रमांक आहे.पण नवीन पॅनवर  पॅन कार्डधारक आपले नाव, पत्ता, जन्मतारीख, ईमेल, मोबाईल नंबर, किंवा इतर माहिती अद्ययावत करू शकेल. पॅन 2.0 प्रणाली पूर्णपणे अंमलात आल्यानंतर ही प्रक्रिया विनामूल्य असेल. सध्या, आधार आधारित ऑनलाइन सुविधांचा वापर करून ईमेल, मोबाईल नंबर, आणि पत्ता विनामूल्य अद्ययावत करता येतो. खालील अधिकृत संकेतस्थळांवर ही सेवा उपलब्ध आहेत:

  • NSDL Address Update Service
  • UTIITSL Address Update Portal

समारोप:

पॅन 2.0 प्रणाली पॅन कार्ड व्यवस्थापन प्रक्रिया अधिक सुलभ करते आणि अनुपालन सुलभतेला चालना देते. हा उपक्रम डिजिटल इंडिया च्या दृष्टीने करदात्यांना सहज सेवा पुरवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.आणि यावर पत्ता असल्याने या पॅन कार्डचा भविष्यात अॅड्रेस प्रूफ म्हणून उपयोग करता येईल असे मला वाटते.या पाठीमागे सरकारचा प्रत्यक्षात काय उद्देश आहे हे पुढे मागे उजेडात येईलच. पण जे काही असेल ते देशाच्या दृष्टीने महत्वाचे असेल असे मला वाटते.        

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

प्रसाद नातु,

image courtesy@jagran josh

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...