Skip to main content

मेटफॉर्मिन टाइप 2 मधुमेहासाठी औषध

  ब्लॉग सं. 2025/1 51 दिनांकः 1 जून , 2025. मित्रांनो ,  जे मधुमेही आहेत,आणि टाइप 2 या प्रकारात मोडतात. म्हणजेच साधारणतः चाळीशी नंतर मधुमेह झाला आहे.त्यांना मेटफॉर्मिन बद्दल कल्पना असेल किंवा असायला हवी. मेटफॉर्मिन हे टाइप 2 मधुमेह नियंत्रणासाठी सर्वाधिक वापरले जाणारे औषध आहे.त्याची परिणामकारकता , सुरक्षितता , आणि परवडणारी किंमत , यामुळे हे पहिल्या पसंतीचे औषध मानले जाते.मेटफॉर्मिन कसे कार्य करते आणि त्याचे संभाव्य दुष्परिणाम काय आहेत , हे जाणून घेणे आवश्यक आहे. मेटफॉर्मिन म्हणजे काय ? मेटफॉर्मिन हे बिग्वानाइड्स नावाच्या औषधांच्या वर्गातील आहे.हे टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये,रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते.आरोग्यदायक आहार आणि नियमित व्यायाम यांसोबत,याचा उपयोग विशेषतः केला जातो. टाइप 1 मधुमेहासाठी हे औषध सहसा वापरले जात नाही , कारण त्या स्थितीत शरीर इन्सुलिन तयार करत नाही. मेटफॉर्मिन दोन मुख्य प्रकारांमध्ये उपलब्ध आहे: 1.        तत्काळ परिणाम करणाऱ्या गोळ्या – दिवसातून अनेक वेळा घेतल्या जातात. 2....

पेपर बॅक पुस्तकांना पर्याय-ई-बूक

Blog No.2023/320. 

Date: -29th, December 2023.

मित्रांनो,   

            नुकत्याच पुणे येथे संपन्न झालेल्या पुणे पुस्तक महोत्सवात 12.50 कोटी रुपयांच्या पुस्तकांची विक्री झाली. अशी बातमी कानावर आली.ही बातमी नक्कीच उत्साहवर्धक आहे.एक लेखक म्हणून हे लिहीत नाही तर एक वाचक म्हणून आणि पुस्तक प्रेमी म्हणून देखिल ही बातमी आनंद देणारी आहे. कारण पुस्तके ही ज्ञान देतात,करमणूक करतात,धकाधकीच्या जिवनात सहारा देतात आणि वेगळा विचार करायला लावतात.

          म्हणून पुस्तके वाचली गेली पाहिजेत.आजचा हा ब्लॉग लिहायचे कारण हे की नुकतंच माझ्या वाचनात आलं की इतर देशांमध्ये ई-बूक घेऊन वाचणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.जगभरात 19.10 कोटी ई-पुस्तके विकत घेतली गेली.त्यामानाने मराठी ई-बूक कमी विकत घेतली जातात.खरं तर इतर जगाच्या मनाने आपल्या देशात शहरात भेडसावणारी समस्या म्हणजे मनाप्रमाणे रहायला घर मिळणे.घर म्हणजे पूर्वी ज्याला घर म्हणत असतं,ते स्वतःचे वेगळे असे घर ही कल्पना शहरात तरी दुर्मिळ आणि महाग झालेली आहे.आता घर म्हणजे वन, टू किंवा थ्री बीएचके फ्लॅट.भिंतीतील कपाटे ही कल्पना देखिल दुर्मिळ होत चालली.आधी कमीतकमी दोन विटांच्या भीती असतं,म्हणजे 6 इंची भीत असते,आता एका विटेची भिंत,त्यामुळे भिंतीतली कपाटे बघायला मिळतं नाहीत.

         आज काल कुणी पुस्तकं वाचत नाही,अशी ओरड असते.पण वास्तविकता हे खरे नाही, लोक वाचतात. जिथे शक्य आहे तिथे लायब्ररी लावून पुस्तके वाचली जातात. तरुण मंडळी ई-बूक वाचतात.सीनियर मंडळी सोबत बरीच तरुण मंडळी आहेत ती देखिल ई-बूक वाचतात.गावात आजकाल चांगले वाचनालय मिळतं नाही किंवा शहरात जवळपास वाचनालय नसतं, पुस्तकं विकत घेतली तर ठेवायला जागा नाही,म्हणून वाचन सोडले आहे.अशा सर्व लोकांसाठी हा लेख मी लिहीत आहे.आजकाल अँन्ड्रॉईड मोबाईल नाही असे फार कमी लोक आढळतील.त्यामुळे ह्या लोकांनी आता आपली वाचनाची आवड भागविण्यासाठी, ई-बूक वाचणे सुरु करावे असे मला वाटते.

ई-बूक वाचनासाठी किंडल- Amazon पर्याय   

       आजकाल Amazon च्या Kindle वर खूप सारी पुस्तके उपलब्ध आहेत आणि पहिल्या पॅराग्राफमधे सांगितल्याप्रमाणे पुस्तके विकत घेतली तर ठेवायला जागा नाही,म्हणून ई-बूक ही खूप छान सोय उपलब्ध झाली आहे.ई-बूक वाचण्यासाठी काय काय करायला हवे, हे सविस्तर खालील प्रमाणे:-

1 तुमच्याकडे कमीतकमी अँन्ड्रॉईड मोबाईल सेट असायला हवा.

2 तुमच्या अँन्ड्रॉईड मोबाईलवर तुम्हाला प्ले स्टोर वरुन Amazon आणि Kindle app डाउनलोड करावे लागेल.

3 Kindle वर prime रीडिंग बूक आणि ई-बूक उपलब्ध असतात.Prime रीडिंग बूक ही ई-बूकच असतात.

4 तुम्हाला Amazon वरुन ई-बूक विकत घेण्याची गरज नाही.त्यासाठी तुम्हाला Kindle Unlimited चे सब्स्क्रिप्शन विकत घ्यावे लागते. ह्याचे शुल्क असते,1 महिन्यासाठी रु.199/-, 6 महिन्यासाठी रु.999/- आणि 12 महिन्यासाठी रु.1799/-. पण हे शुल्क भरले की, तुम्हाला Amazon वर फ्री मधे ई-पुस्तक विकत घेता येते आणि वाचता येते.एकदा हे Kindle Unlimited चे सब्स्क्रिप्शन विकत घेतले की तुम्हाला तुमच्या सब्स्क्रिप्शन चा कालावधी संपेपर्यन्त जास्तीतजास्त इतकीच ई-पुस्तके वाचता येतील.अगदी रु. 100/- चे एक अशी 18 ई-पुस्तके वर्षभरात वाचून झाली की पैसे वसूल आणि त्यावरील वाचलेली ई-पुस्तके हा बोनस.मी गेल्या वर्षभरात 22 ई-पुस्तके वाचली.भाषेचे बंधन नाही.तुम्ही कुठल्याही,तुम्हाला येत असलेल्या भाषेतील ई-पुस्तक वाचू शकता. वर्षभरचे सब्स्क्रिप्शन फायदेशीर कारण त्यात रु.600/-चा डिस्काऊंट मिळतो.   

5  ज्याना पुस्तक वाचायची जास्त आवड आहे, त्यांच्यासाठी Amazon वर Kindle टॅब्लेट सुद्धा उपलब्ध आहे. त्याचा आकार मोठा असतो.जास्त कम्फर्टने वाचता येते.त्याची किंमत रु.9000/- पासून पुढे आहे.ज्यांना परवडत असेल ते असे देखिल करू शकता. मी मोबाईलवर वाचतो.पण हा देखिल एक पर्याय आहे.         

6 चला तर मगनवे वर्ष जवळ येत आहे.नव्या वर्षाचा नवीन संकल्प करा.ह्यापुढे मी ई-बूक वाचायला सुरुवात करेन.मी प्ले स्टोर वरुन Amazon आणि Kindle app डाउनलोड करेन. Kindle Unlimited चे सब्स्क्रिप्शन विकत घेईन. वाटल्यास सुरुवातीला एक महिन्याचे  सब्स्क्रिप्शन घेऊन बघा. एक रु.200/- चे ई-पुस्तक घेऊन वाचायला सुरुवात करा. 

तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

 प्रसाद नातु, पुणे.                                          

Comments

  1. People just don't read...even free Kindle books are not downloaded! That is my experience

    ReplyDelete
  2. e-books वाचणाऱ्या वाचणाऱ्यांसाठी छान माहिती.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...