Skip to main content

कॅल्शियमसाठी दुधाशिवाय अन्य पर्याय

  ब्लॉग नं. 2026/129. दिनांक: 9 मे, 2026.   मित्रांनो, दुधाशिवाय कॅल्शियम ? हाडांच्या बळकटीसाठी दुधापेक्षाही सरस आहेत हे पदार्थ आपण लहानांपासून ऐकत आलो आहोत की , हाडांच्या बळकटीसाठी ' दूध ' हाच सर्वोत्तम उपाय आहे. दुधाला कॅल्शियमचा खजिना मानले जाते , हे खरेच आहे.पण , जर मी तुम्हाला सांगितले की दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम असलेले,अनेक पदार्थ आपल्या आसपास सहज उपलब्ध आहेत , तर ? कदाचित हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल , पण ही वस्तुस्थिती आहे.चला तर मग , आजच्या ब्लॉगमध्ये,आपण अशाच काही कॅल्शियमयुक्त पदार्थांबद्दल जाणून घेऊया,जे तुमच्या दैनंदिन आहाराला अधिक पौष्टिक बनवू शकतात. सविस्तर: दुधाचे प्रमाण आणि आपली गरज सुरुवातीला एक बेसिक गोष्ट समजून घेऊ.एका कपात (245 मिली) सुमारे 305 मिग्रॅ कॅल्शियम असते. प्रौढांसाठी कॅल्शियमचे दररोजचे शिफारस केलेले प्रमाण ( RDA) 1 ,000 ते 1,200 मिग्रॅ इतके आहे. याचा अर्थ , केवळ एक ग्लास दुध, हे तुमची दैनंदिन गरज पूर्ण करण्यासाठी पुरेसे नाही.तर मग , कॅल्शियमच्या पूर्ततेसाठी इतर कोणते पर्याय आहेत ? पाहूया: 1 . चीज आणि दुग्धजन्य पदार्थ : ·...

लता मंगेशकर

 Blog No.2023/251          

Date:- 28th,September 2023.

मित्रांनो,

               आज स्व. लता मंगेशकर यांची जयंती. खरं तर आजही लता दीदींच्या नावापुढे स्व. लिहायचं म्हणजे कससच होतं, लता दीदी आपल्यात नाहीत ही कल्पना करवत नाही आणि हे असे सारं त्या गेल्यानंतर दिड वर्षांनी होतंय.मग सांगा एक गीत 2013 साली संगीतबद्ध झालेलं, आलं,पण ऐकायला उशिरा मिळालं. अन हृदयात कालवाकालव व्हायला लागली.ऐकताच वेड्यासारखा मी स्वतःशीच म्हणालो नाही, लता दीदी तुम्ही नाही असं म्हणायचं. गाऊ नका लागेल तर, पण कृपया असं म्हणू नका. आज लता दीदींच्या जयंती दिनी हेच गाणं आठवूया.

 प्रास्ताविक      

               हे गीत आहे कविवर्य बा.भ. बोरकरांनी लिहिलेलं आणि सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेल. शब्द आधी बघू आणि मग गाणं ऐकू.                        

आता विसाव्याचे क्षण

आता विसाव्याचे क्षण माझे सोनियाचे मणी
सुखे ओवीत ओवीत
, त्याची ओढतो स्मरणी

काय सांगावे नवल,दूर रानीची पाखरे
ओल्या अंगणी नाचता
होती माझीच नातरे

कधी होती डोळे ओले,मन माणसाची तळी
माझे पैलातले हंस
डोल घेती त्याच्या जळी

कशी पांगल्या प्रेयसी जुन्या विझवून चुली
आश्वासती येत्या जन्मी
होऊ तुमच्याच मुली

मणी ओढता ओढता होती त्याचीच आसवे
दूर असाल तिथे हो
नांदतो मी तुम्हांसवें.

            आठवणीतील गाणी या वेबसाइटवर हे गाणं पूर्ण वाचायला मिळालं. पण त्याच बरोबर संगीत दिग्दर्शक यांनी गीताबद्दल लिहिलेला सुंदर ब्लॉग.सलील कुलकर्णी म्हणतात “माझ्या या रचनेला दीदींचा स्वर मिळाला ही भाग्याची गोष्ट.” एक वृद्ध जोडपं आपल्या आयुष्यातील सुखाच्या, दुखा:च्या क्षणाची आठवण काढत आहेत.मला असं वाटतं या गीतातून “आता विसाव्याचे क्षण” म्हणजेच चिरनिद्रा घेण्याची वेळ समीप येत आहे.

            आजी आजोबा बोलत बसले आहेत आणि नातवंडाची आठवण येणार नाही हे कसं होईल. म्हणून बोरकर लिहितात  “काय सांगावे नवल,दूर रानीची पाखरे, ओल्या अंगणी नाचता होती माझीच नातरे. या वयामद्धे आलेला हळवेपणा त्यांच्या या गीतातील प्रत्येक ओळीत,ठायी ठायी भरलेला आढळतो.

            सलील कुलकर्णी यांनी म्हटलंय की त्यांना या गीतातील “आता” हा शब्द खूप भावला. खरं आहे हे, या “आता”नेच मला भारावून टाकलं. बाकी गीत काय आहे. हे तेव्हा तरी समजून घ्यायची आणि ऐकायची इच्छा तेव्हा झाली नव्हती. आता तुम्ही ऐका आणि तुमचे कमेन्ट अवश्य येऊ द्या.     

लता दीदी तुम्हाला श्रद्धांजली नाही, हा शब्द नाही लिहिता येणार, शब्दसुमनांजली, आदरांजली वाहतो. अशाच तुमच्या स्वरांच्या रूपाने आमच्यात वर्षानुवर्षे वास्तव्य करावं.      

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.  


प्रसाद नातु,पुणे

       

 

 

 

        

 

 

 

Comments

  1. खूप सुंदर लिहीले आहे.हे गाणं ऐकले कीं मन हळवं होते.

    ReplyDelete
  2. आदरांजलि😢🌺🌺

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...