Skip to main content

मेटफॉर्मिन टाइप 2 मधुमेहासाठी औषध

  ब्लॉग सं. 2025/1 51 दिनांकः 1 जून , 2025. मित्रांनो ,  जे मधुमेही आहेत,आणि टाइप 2 या प्रकारात मोडतात. म्हणजेच साधारणतः चाळीशी नंतर मधुमेह झाला आहे.त्यांना मेटफॉर्मिन बद्दल कल्पना असेल किंवा असायला हवी. मेटफॉर्मिन हे टाइप 2 मधुमेह नियंत्रणासाठी सर्वाधिक वापरले जाणारे औषध आहे.त्याची परिणामकारकता , सुरक्षितता , आणि परवडणारी किंमत , यामुळे हे पहिल्या पसंतीचे औषध मानले जाते.मेटफॉर्मिन कसे कार्य करते आणि त्याचे संभाव्य दुष्परिणाम काय आहेत , हे जाणून घेणे आवश्यक आहे. मेटफॉर्मिन म्हणजे काय ? मेटफॉर्मिन हे बिग्वानाइड्स नावाच्या औषधांच्या वर्गातील आहे.हे टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये,रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते.आरोग्यदायक आहार आणि नियमित व्यायाम यांसोबत,याचा उपयोग विशेषतः केला जातो. टाइप 1 मधुमेहासाठी हे औषध सहसा वापरले जात नाही , कारण त्या स्थितीत शरीर इन्सुलिन तयार करत नाही. मेटफॉर्मिन दोन मुख्य प्रकारांमध्ये उपलब्ध आहे: 1.        तत्काळ परिणाम करणाऱ्या गोळ्या – दिवसातून अनेक वेळा घेतल्या जातात. 2....

इन्कम-टॅक्स रिटर्न स्वतः फाइल करा भाग 1

Blog No. 2023/167        

Date: 1st, July 2023.


मित्रांनो,

            आज 1 जुलै, म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्याचा महिना.31 जुलै ही शेवटची तारीख आहे.रिटर्न स्वतः फाइल करीत असाल तर सोबत फॉर्म 16, टीडीएस सर्टिफिकेट, जर शेअर्समधे गुंतवणूक केलेली असेल आणि शेअरची विक्री केली असेल तर, कॅपिटल गेन्स सर्टिफिकेट, म्यूचुअल फंड विक्री केली असेल तर त्याचे सर्टिफिकेट सोबत ठेवा.तसेच इन्कम टॅक्स च्या साइटवरुन Annual Information Statement (AIS) आणि Taxpayer Information Statement (TIS)  डाउनलोड करुन ठेवा. TIS open करण्यासाठी तुमचा PAN no small characters मधे आणि त्यानंतर तुमची जन्मतारीख जर 01011965 असेल तर ती लिहून उघडता येईल. abcda1234f01011965 हा पासवर्ड टाकावा लागेल.       तुमचे या वर्षात केलेले सर्व व्यवहार TIS मधे तुम्हाला दिसतील.स्वतःचे रिटर्न स्वतःच फाइल करा.    

 

ITR form कुठला निवडाल?

            खाली दिलेल्या 4 फॉर्म्स पैकी एक नेमका तुमच्यासाठी असेल.जर शंका असेल तर माझ्या मेल आयडी वर संपर्क करा.        

 

Form ITR 1:-

Resident Individuals having Income below or equal to Rs.50 Lakhs from

            Salary/pension

            One House Property

            Others sources    

 

Form ITR 2:-

Every Income from ITR of more than Rs.50 Lakhs

            Capital Gains

            More than one house property

            Foreign Income/Foreign Asset

            Crypto Income (if reported as Capital gains)

            Holding directorship in a Company

            Holding unlisted equity shares

 

Form ITR 3:-  

Every Income from ITR of more than Rs.50 Lakhs

            Capital Gains

            More than one house property

            Foreign Income/Foreign Asset

            Crypto Income (if reported as Capital Gains)

            Holding directorship in a Company

            Holding unlisted equity shares

            Business/Profession

            Crypto Income (if reported as Business Income)

            As a partner in a firm

 

Form ITR 4:- 

            Resident Individuals and HUF’s having

            Total Income is less than or equal to Rs.50.00 Lakhs

             Salary/pension

            One House Property

            Others sources.

 

फॉर्म निवडला की पुढे काय?

            फॉर्म निवडला की फॉर्म 16, टीडीएस सर्टिफिकेट, जर शेअर्समधे गुंतवणूक केलेली असेल आणि शेअरची विक्री केली असेल तर कॅपिटल गेन्स सर्टिफिकेट, म्यूचुअल फंड विक्री केली असेल तर त्याचे सर्टिफिकेट हे TIS आणि AIS सोबत जुळवून बघा. काही वेळेस बँकेकडून काही स्टेटमेंट इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला सबमिट केल्यावर तिथे अपलोड व्हायला वेळ लागू शकतो.वर सांगितल्याप्रमाणे जर आकडेवारी जुळत नसेल तर थोडी वाट पहा आणि लेटेस्ट TIS आणि AIS मधून मधून बघा.जुळले की पुढची स्टेप रिटर्न भरणे आणि फाइल/सबमिट करणे.ते भाग 2 मधे पाहू.माझा मेल आयडी pknatoo25360@gmail.com      

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

 

प्रसाद नातु,पुणे.

Comments

  1. Chan mahiti purna blog ani IT return bharnyas madat karnara

    ReplyDelete
  2. Good information it may help many to file return

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...