Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

Masked Aadhar Card- मास्क आधार कार्ड

Blog No. 2023/101       

Date: 27th, April 2023.

मित्रांनो नमस्कार,

             तुम्हाला बँक अकाऊंट उघडायचे आहे, तुम्हाला बँकेतून कर्ज हवे आहे,तुम्हाला दुसऱ्या गावी गेल्यावर हॉटेलमधे रूम बूक करावयाची आहे,तुम्हाला अशी अनेक कामे करतांना आधार कार्डची झेरॉक्स मागितली जाते.बहुतेक वेळा हे सारे काही सुरक्षितपणे केले जाते. पण एखाद्या वेळेस जर ह्याचा fraudulent उपयोग झाला म्हणजेच तुम्ही दिलेल्या आधार कार्डचा दुरुपयोग झाला. तर तुम्हाला एखाद्या वेळेस मोठे नुकसान सहन करावे लागते.हे होऊ नये म्हणून त्यावर सरकारने एक उपाय शोधून काढला आहे. त्या बद्दल आज आपण जाणून घेऊ या.       

खूप महत्वाचे

केंद्र सरकारने आधार कार्डबाबत महत्त्वपूर्ण आदेश जारी केले आहेत. या नव्या सूचनेनुसार, सरकारने कुठेही आधार कार्डची झेरॉक्स देऊ नये असे सांगितले आहे.आधार कार्डचा गैरवापर रोखण्यासाठी सरकारने हे आदेश जारी केले आहेत. एखाद्या ठिकाणी आधार कार्डची झेरॉक्स अत्यावश्यक असल्यास आधार कार्डची मुखवटा (Masked) असलेली झेरॉक्स द्यावी, असे सरकारने सुचवले आहे.केंद्र सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार, हॉटेल्स, सिनेमा हॉल किंवा इतर खाजगी संस्थांना ग्राहक किंवा व्यक्तींकडून आधार कार्डच्या प्रती गोळा करण्याचा अधिकार नाही.

मुखवटा (Masked AADHAR Card) आधार वापरा

            आधार कार्डद्वारे होणारी फसवणूक टाळण्यासाठी मास्क केलेले आधार कार्ड वापरण्याचे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. "मास्क केलेले आधार कार्ड" आधार क्रमांकाचे शेवटचे चार अंक दाखवते. त्यामुळे तुमच्या  आधार कार्डचा गैरवापर होण्याची शक्यता खूपच कमी झाली आहे.

मास्क केलेले आधार कार्ड कसे डाउनलोड करायचे? How to download Masked AADHAR Card?

या लिंकवर जा https://myaadhaar.uidai.gov.in/

> तुमचा आधार क्रमांक नमूद करा

तुम्हाला Do you want मुखवटा असलेले आधार कार्ड हा पर्याय दिसेल, तो निवडा

> डाउनलोड पर्याय निवडा आणि आधार क्रमांकाच्या शेवटच्या चार अंकांसह आधार कार्डची प्रत मिळवा.तुमचा 12 अंकी क्रमांक मुखवटा घातलेल्या आधार कार्डमध्ये दिसणार नाही. त्याऐवजी फक्त शेवटचे ४ अंक दिसतील. "मास्क केलेले आधार कार्ड" UIDAI च्या वेबसाइटवरून डाउनलोड केले जाऊ शकते

 समारोप

            आजकाल वारंवार करावा लागणारा आधार कार्ड वापर,त्यामुळे अगदी कितीही काळजी घेतली तरी एखाद्या वेळेस आपल्या कडून दुर्लक्ष होऊ शकते. म्हणून हे masked आधार कार्ड वापरले तर तुमच्या आधार कार्डचा कुणीही दुरुपयोग करू शकणार नाही. एक पूर्वाश्रमीचा बँकर आणि एक जागरूक नागरिक म्हणून आणि समर्थ रामदासांच्या शिकवणी प्रमाणे “जे जे आपणासी ठावे ते ते इतरांसी सांगावे,शहाणे करून सोडावे सकाळ जन” असं मनापासून वाटते म्हणून आजचा ब्लॉग.तर आजच masked आधार कार्ड डाउनलोड करून ठेवा आणि स्वतःला सुरक्षित करा. आजचा ब्लॉग कसा वाटला. ब्लॉगच्या शेवटी कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर  लिहा.

 

फोटो सौजन्य@ जागरण जोश   

प्रसाद नातु, पुणे.    

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...