Skip to main content

'या' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर

ब्लॉग नं. 2026/1 71.   दिनांक: 20 जून, 2026. मित्रांनो, संध्याकाळी 5 नंतरच्या ' या ' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर दिवस मावळत असताना , आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं , तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते , संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता , त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर ( Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ.    सविस्तर: ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या एका अहवालानुसार , आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते , तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी , रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो. आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या ...

महाराष्ट्र भूषण पुरस्कार

 Blog No. 2023/75     

Date: 28, March 2023


 

मित्रांनो,

            नुकत्याच महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा करण्यात आली. 2021 साठीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना शुक्रवारी प्रदान करण्यात आला. आशा भोसले यांच्या बद्दल माहिती नाही असा कुणी संगीत प्रेमी असेल असे वाटत नाही. मी आशाजींबद्दल ब्लॉग करेन पण तो 8 सप्टेंबरला, आशाजींच्या वाढदिवशी.आज त्यांना जो पुरस्कार शुक्रवारी 24 मार्च 2023 ला प्रदान करण्यात आला,त्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराविषयी थोडे बोलू या.

 

प्रास्ताविक

            महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्र सरकार द्वारा दिला जाणारा सर्वात मोठा किंवा सर्वोच्य सन्मान आहे. 1995 ला शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे सरकार सत्तेत असतांना त्यांनी हा सन्मान देणे सुरु केले.2022 पासून देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्यात आली. रु.25.00 लाख रोख,स्मृती चिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

 

कुठल्या क्षेत्रातील कामगिरी बद्दल हा पुरस्कार देण्यात येतो. 

 

1.       कला

2.       साहित्य

3.       खेळ

4.       विज्ञान

5.       समाज सेवा

6.       पत्रकारिता

7.       लोक प्रशासन

8.       चिकित्सा कार्य

 

        ह्या पुरस्कारांची सुरुवात ही 1996 ला झाली.पहिल्या पुरस्काराचे मानकरी महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व अर्थात पु.ल. देशपांडे हे होते.आतापर्यंत हा पुरस्कार 18 वेळा प्रदान करण्यात आला. साहित्य क्षेत्रातील तीन, संगीत क्षेत्रातील तीन,विज्ञान क्षेत्रातील चार, समाजसेवा क्षेत्रातील चार आणि खेळ,चिकित्सा कार्य,लोक प्राशन आणि सिनेमा क्षेत्रातील प्रत्येकी एक व्यक्तीचा सन्मान करण्यात आला. ज्यांची यादी खालीलप्रमाणे:-       

  

 

 

सं

वर्ष

नाम

क्षेत्र

1

१९९६

पु. ल. देशपांडे

साहित्य

2

१९९७

लता मंगेशकर

संगीत

3

१९९९

विजय भटकर

विज्ञान

4

२००१

सचिन तेंडुलकर

खेल

5

२००२

भीमसेन जोशी

संगीत

6

२००३

अभय बंग और रानी बंग

चिकित्सा कार्य

7

२००४

बाबा आमटे

समाज सेवा

8

२००५

रघुनाथ अनंत माशेलकर

विज्ञान

9

२००६

रतन टाटा

लोक प्रशासन

10

२००७

र.कृ. पाटील

समाज सेवा

11

२००८

नानासाहेब धर्माधिकारी

समाज सेवा

12

२००८

मंगेश पाडगाँवकर

साहित्य

13

२००९

सुलोचनादीदी

कला, सिनेमा

14

२०१०

जयंत नारळीकर

विज्ञान

15

२०११

अनिल काकोडकर

विज्ञान

16

२०१५

बलवंत मोरेश्वर पुरंदरे

साहित्य

17

२०२१

आशा भोसले

संगीत

18

2022

आप्पासाहेब धर्माधिकारी

समाजसेवा



    27 वर्षात 18 च वेळा हा पुरस्कार देण्यात आला.या यादीत काही नावे कां नाहीत यांचे आश्चर्य वाटते.जसे सुनील गावस्कर, ग.दि. माडगूळकर, सुधीर फडके, व्ही. शांताराम,             


                                                                                                                         प्रसाद नातु,पुणे. 
 






Comments

Post a Comment