ब्लॉग नं. 2026/259. दिनांक: 16 सप्टेंबर, 2026. मित्रांनो, कालच्या ब्लॉगमध्ये आपण Hba1c म्हणजे काय? ही प्रक्रिया कशी चालते? आणि काही वेळा रक्तातील साखरेची पातळी जास्त नसतांना देखिल, HbA1c ची पातळी जास्त दिसू शकते.हे बघितलं.आजच्या ब्लॉगमध्ये, काही वेळा रक्तातील सकहहारेच्या पातळीच्या विपरीत परिणाम दिसू शकतो, हे आपण बघू या. सविस्तर: व्हिटॅमिन B12 आणि फोलेटच्या कमतरतेचाही HbA1c च्या पातळीवर परिणाम होऊ शकतो , कारण या घटकांमुळे लाल रक्तपेशी,रक्ताभिसरणात किती काळ टिकून राहतात यावर परिणाम होतो.हे एक कारण आहे, ज्यामुळे डॉक्टर केवळ HbA1c च्या निकालावर अवलंबून राहत नाहीत. कधीकधी HbA1c ची पातळी प्रत्यक्षात कमी दिसू शकते: ज्याप्रमाणे काही परिस्थितींमुळे HbA1c ची पातळी वाढू शकते , त्याचप्रमाणे काही परिस्थितींमुळे ती वास्तविक पातळीपेक्षा कमी दिसू शकते.डॉ.जैन नमूद करतात की ," काही परिस्थितींमध्ये लाल रक्तपेशींचे आयुष्य कमी होते - उदाहरणार्थ ' हेमोलिटिक ॲनिमिया ' (hemolytic anemia), अलीकडे झालेले रक्त कमी होणे (रक्तस्राव) आणि रक्त संक्रमण ( blood transfusion) - ज...
prasadnatoo.co.in या ब्लॉगवर आरोग्य, करमणूक , माहिती तंत्रज्ञान आणि इतर विविध विषयावरील माहिती आपणास मिळू शकते. .