ब्लॉग नं. 2026/1 71. दिनांक: 20 जून, 2026. मित्रांनो, संध्याकाळी 5 नंतरच्या ' या ' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर दिवस मावळत असताना , आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं , तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते , संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता , त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर ( Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ. सविस्तर: ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या एका अहवालानुसार , आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते , तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी , रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो. आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या ...
ब्लॉग नं. 2026/026. दिनांकः 26 जानेवारी , 2026. मित्रांनो , 🍏 पोटाच्या समस्यांवर – एक नैसर्गिक आणि प्रभावी इलाज- पेरू आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत पोटाच्या तक्रारी सामान्य झाल्या आहेत.अपचन , बद्धकोष्ठता , आम्लपित्त , गॅस किंवा मूळव्याध यांसारख्या समस्या अनेकांना त्रास देतात.औषधांकडे धाव घेण्याआधी जर आहारात थोडा बदल केला , तर या समस्या नैसर्गिकरित्या कमी होऊ शकतात. अशाच एका प्रभावी उपायाचे नाव आहे – पेरू.सध्या पेरू सर्वत्र उपलब्ध आहे. तर पेरूचे फायदे जाणून घेऊ,आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: फळांमध्ये भरपूर पोषक घटक असतात आणि त्यामुळे फळांचे सेवन आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक मानले जाते.पेरू हे एक स्वस्त , सहज उपलब्ध आणि पोषणमूल्यांनी भरलेले फळ आहे.पेरूमध्ये पोटॅशियम , कार्बोहायड्रेट्स , आहारातील फायबर आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात.विशेष म्हणजे पोटाच्या विविध समस्यांवर पेरू खूपच उपयोगी ठरतो. पेरूचे पोषणमूल्य: पेरूमधील फायबर पचनक्रिया सुधारण्यास मदत करते , तर पोटॅशियम पोटातील स्नायूंना योग्य कार्य करण्यास मदत करते. त्यामुळे पेरू केवळ पोट भरण्यासाठी नाही , तर प...