ब्लॉग नं. 2026/08 2 दिनांक: 23 मार्च , 2026. मित्रांनो मधुमेह आणि आवळा: रक्तातील साखर नियंत्रित करणारे एक नैसर्गिक ' सुपरफूड ' आजच्या धावपळीच्या युगात ' मधुमेह ' (Diabetes) हा जीवनशैलीशी संबंधित,एक अत्यंत वेगाने पसरणारा आजार बनला आहे.चुकीच्या खाण्याच्या सवयी , मानसिक ताण , लठ्ठपणा आणि व्यायामाचा अभाव,ही यामागची प्रमुख कारणे आहेत. मधुमेह केवळ रक्तातील साखरेवरच परिणाम करत नाही , तर तो हळूहळू डोळे , किडनी , हृदय आणि मज्जातंतूंवरही विपरीत परिणाम करू शकतो.चला सविस्तर जाणून घेऊ. सविस्तर: अशा परिस्थितीत , औषधांसोबतच ' काय खावे आणि काय टाळावे ' हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेकदा मधुमेही रुग्ण फळे खाण्यास घाबरतात , परंतु निसर्गामध्ये असे एक ' सुपरफूड ' उपलब्ध आहे जे साखरेची पातळी नैसर्गिकरित्या नियंत्रित करण्यास मदत करते— ते म्हणजे ' आवळा ' . आवळा: पोषकतत्त्वांचा खजिना : आवळ्याला ' इंडियन गूसबेरी ' असेही म्हणतात.अनेकांना वाटते की आवळा आंबट असल्याने तो हानिकारक ठरेल , पण सत्य याच्या उलट आहे. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी , फा...
Blog No.2023/318. Date: -27 th , December 2023. मित्रांनो , सहकारी बँका विशेषतः नागरी सहकारी बँका या लोकांच्या जिव्हाळ्याच्या बँका समजल्या जातात. गावातले ओळखीचे,जवळचे लोक व्यवस्थापनात असतात.त्यांना आपल्या अर्थविषयक गरजा/समस्या जास्त व्यवस्थित आणि परिणामकारक पद्धतीने समजावून सांगितल्या जाऊ शकतात आणि ते समजावून घेऊ शकतात. अशी धारणा खूप मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये झाल्यामुळे राष्ट्रीयकृत बँकेच्या गावात अनेक शाखा उघडून देखिल या नागरी सहकारी बँकाकडील ग्राहकांचा ओढा थांबला नाही.दुसरं कारण हे देखिल की राष्ट्रीयकृत बँकेचे अधिकारी खूप नियम सांगतात आणि कागदपत्रे खूप मागतात असं लोकांच म्हणणं आहे.पण खरोखर या बँका सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करतात की बँकाच्या संचालकांच्या नात्यातील, संबंधातील लोकांच्या अपेक्षा पूर्ण करतात आणि हे सारे करत असतांना त्या बँकिंग नियमांचे उल्लंघन तर करीत नाही ना.हेच आपण आज बघणार आहोत. प्रास्ताविक ...