Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) खरोखर सुदृढ आहेत कां?

 Blog No.2023/316.  

Date: -25th, December 2023. 

मित्रांनो,

            नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) म्हणजे काय? हे तुमच्या पैकी बऱ्याच जणांना ठाऊक असेल.कदाचित काही जणांनी नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) कडून वैयक्तिक कर्ज देखिल घेतले असेल.या नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) कडे बँकिंग परवाना नसतो. त्यामुळे त्या तुमचे बचत खाते उघडू शकत नाही.पण त्यांना तुमच्याकडून मुदती ठेवी अर्थात फिक्स्ड डिपॉजिट स्वीकारण्याची परवानगी असते.या गैर-बँकिंग वित्तीय संस्थेस मग तुम्हाला तुमच्या फिक्स्ड डिपॉजिटवर व्याज द्यावे लागणार.मग या गैर-बँकिंग वित्तीय संस्थांना काही उत्पन्न कमावणे भाग आहे.मग त्या त्यांचे भांडवल आणि तुमचं फिक्स्ड डिपॉजिट ठराविक व्याजाने कर्ज म्हणून देतात.त्यासाठी परतफेडीचा अवधि ठरवून देत असतात.या परतफेड करण्याच्या अवधीत जर दिलेले कर्ज परत नाही आले तर ते एनपीए (NPA) होते. या संबंधात आज मी तुमच्याशी बोलणार आहे. 

कर्ज एनपीए केव्हा होते?

            जर दिलेल्या कर्जाचे हप्ते आणि त्यावरील व्याज 90 दिवसांपेक्षा अधिक दिवस थकीत राह्यले तर खाते एनपीए होते. एनपीए म्हणजे Non-Performing Assets म्हणजे त्या अॅसेटस् पासून प्रत्यक्ष प्राप्ती काहीच होतं नाही.व्याज खात्याला नुसते डेबिट किंवा नांवे करून होत नाही.तर ते वसूल झाले तर आणि तरच त्याला उत्पन्न समजले जाते.

            समजा गैर-बँकिंग वित्तीय संस्थाने एका बांधकाम उद्योगातील व्यावसायिकाला रु. 15 कोटीचे कर्ज दिले.त्याची ठराविक मुदतीत परतफेड करायला सांगितली.पण काही अडचणी या व्यावसायिकाला आल्या आणि त्याने परतफेड करणे थांबविले आणि NBFC ला 6 महिन्याचा कालावधी वाढवून मागितला.जरी NBFC ला वाटतं असेल की त्याची अडचण व्यवहार्य आहे.पण RBI च्या आयआरएसी म्हणजे Income Recognition Assets Classification नॉर्मस प्रमाणे हा अतिरिक्त कालावधी देता येणे शक्य नाही.त्यामुळे NBFC ला हे खाते एनपीए घोषित करावे लागेल.एवढे मोठे खाते एनपीए झाल्यास NBFC च्या बॅलेन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉसवर याचा वाईट परिणाम होईल. एका ठराविक टक्केवारीपेक्षा एनपीएची टक्केवारी जास्त झाल्यास याचा वाईट परिणाम होईल आणि NBFC ज्या स्टॉक एक्स्चेंजमध्ये लिस्टेड कंपनी असतात. त्यांच्या शेअरवर त्याचा परिणाम होईल. परिणामी फिक्स्ड डिपॉजिट करायला लोकं अनिच्छुक असतील. NBFC चा शेअर कुणी खरेदी करणार नाही. हे सगळे नियमाप्रमाणे केले तर होईल. NBFC ला स्वतःच्या गरजांसाठी पैसे उभे करणे कठीण जाईल. जेव्हा NBFC ला कर्ज घ्यायचे असेल तेव्हा प्रत्येकजण NBFC ला जास्त व्याज दर देण्यास सांगेल.

 मग NBFC काय करतात?

            या NBFC नी मग एक मार्ग शोधून काढला. तो अर्थात योग्य मार्ग नाही.पण त्यामुळे त्या बिल्डरला मदत करता आली आणि खाते एनपीए झाले नाही. NBFC ने अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड (एआयएफ) शी संपर्क केला. हा असा फंड आहे जो  गुंतवणूकदारांकडून निधी गोळा करतो आणि गुंतवणूक धोरणानुसार त्यांची गुंतवणूक करतो.हे अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड (एआयएफ) RBI च्या छाननीखाली नसून, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) च्या अंतर्गत आहेत.हे पर्यायी गुंतवणूक निधी आहेत.हे श्रीमंत व्यक्ती किंवा इतर कंपन्यांकडून गुंतवणूक म्हणून किमान ₹1 कोटी स्वीकारतात. ही गुंतवणूक ते असंख्य गोष्टींमध्ये गुंतवतात जसे की शेअर बाजार, बाँड्स आणि रिअल इस्टेट प्रकल्पांमध्ये.गुंतवणुकदारांकडून पैसे गोळा करण्यापूर्वी त्यांना फक्त त्यांची पसंतीचे गुंतवणूक धोरण काय आहे हे निर्दिष्ट करावे लागेल.

            अशा वेळेस हा बांधकाम व्यवसायिक काही बॉन्ड जारी करतो.हे बॉन्ड हे एआयएफ विकत घेतात आणि त्याचे पैसे त्या बांधकाम व्यावसायिकाला देतात.तो NBFC च्या कर्जाच्या परतफेडीसाठी वापरतो आणि अकाऊंट एनपीए होण्यापासून वाचवतो.याला अर्थात रिजर्व बँक ऑफ इंडियाची संमती नाही. याला evergreening म्हणतात.पण हा बिल्डर कर्ज वेळेत परत करून मोकळा झाला आहे.

            आता जर हा बांधकाम व्यावसायिक लगेच पैसे देऊ शकला नाही तर AIF चे काय? AIF ला याचा काही फरक पडत नाही. जर बॉन्ड 7 वर्षाचे असतील तर 7 वर्षे AIF वाट पाहिल कारण त्यांना Income Recognition Assets Classification नॉर्मस नाहीत.आणि ते त्यांच्या मोठ्या गुंतवणूकदारांकडून पैसे स्वीकारतांना दीर्घ मुदतीत स्वीकारत असतात. बांधकाम  व्यावसायिक देखिल त्याची अडचण दूर झाली की AIF ला बॉन्डचे पैसे परत देऊ शकतो.

या गोष्टींमुळे आरबीआय समाधानी नाही.कारण आरबीआयचा असा विश्वास आहे की या गोष्टी NBFC ला असलेल्या समस्या लपवू शकतात. त्यामुळे मंगळवारी, RBI ने एक NBFCs (आणि ते नियमन करणाऱ्या इतर वित्तीय संस्थांना) एक हुकूम जारी केला आहे.पण याचा NBFC उद्योगावर कसा परिणाम होईल ते पाहू या.

तर ते NBFC आहेत जे सदाहरित बनण्यात तज्ञ बनले आहेत, ते आता रेड हँड पकडले जातील. त्यांना काही डीफॉल्ट घोषित करण्यास भाग पाडले जाऊ शकते. आणि त्या बदल्यात आम्ही आधी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या स्टॉकच्या किमती किंवा क्रेडिट रेटिंगवरही परिणाम होऊ शकतो.यातून ते कसे बाहेर पडतात ते पहावे लागेल.

 समारोप

            वास्तविक पहाता अनेकांना हे वाटण्याची शक्यता आहे की, NBFC ने असे केल्यास वाईट काय? RBI ला देखिल अकाऊंट चांगले म्हणजे परफॉरमिंग अकाऊंट राह्यले तर त्रास काय आहे? बांधकाम व्यवसायिकाची अडचण दूर होईल,त्याला परतफेड करायला अतिरिक्त वेळ मिळेल वगैरे वगैरे.पण खरी गोष्ट अशी आहे की हे evergreening RBI च्या आर्थिक शिस्त लावण्याच्या प्रयत्नाच्या विपरित आहे.काही दिवसांनी अनेक मोठे कर्जदार अशा प्रकारे कर्ज एनपीए होण्यापासून वाचवतील आणि काही शिस्त रहाणार नाही आणि अर्थकारणात जर शिस्त पाळली गेली नाही, तर व्यवसायाचा डोलारा कोसळायला वेळ लागत नाही.       

तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

  

image courtesy @imageIQ

 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...