Skip to main content

मधुमेह आणि आवळा, एक सुपरफूड

  ब्लॉग नं. 2026/08 2 दिनांक: 23 मार्च , 2026. मित्रांनो मधुमेह आणि आवळा: रक्तातील साखर नियंत्रित करणारे एक नैसर्गिक ' सुपरफूड ' आजच्या धावपळीच्या युगात ' मधुमेह ' (Diabetes) हा जीवनशैलीशी संबंधित,एक अत्यंत वेगाने पसरणारा आजार बनला आहे.चुकीच्या खाण्याच्या सवयी , मानसिक ताण , लठ्ठपणा आणि व्यायामाचा अभाव,ही यामागची प्रमुख कारणे आहेत. मधुमेह केवळ रक्तातील साखरेवरच परिणाम करत नाही , तर तो हळूहळू डोळे , किडनी , हृदय आणि मज्जातंतूंवरही विपरीत परिणाम करू शकतो.चला सविस्तर जाणून घेऊ. सविस्तर:  अशा परिस्थितीत , औषधांसोबतच ' काय खावे आणि काय टाळावे ' हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेकदा मधुमेही रुग्ण फळे खाण्यास घाबरतात , परंतु निसर्गामध्ये असे एक ' सुपरफूड ' उपलब्ध आहे जे साखरेची पातळी नैसर्गिकरित्या नियंत्रित करण्यास मदत करते— ते म्हणजे ' आवळा ' . आवळा: पोषकतत्त्वांचा खजिना : आवळ्याला ' इंडियन गूसबेरी ' असेही म्हणतात.अनेकांना वाटते की आवळा आंबट असल्याने तो हानिकारक ठरेल , पण सत्य याच्या उलट आहे. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी , फा...

मोहम्मद रफी सुरेल आवाजाचा दैवी गायक

 Blog No.2023/315.  

Date: -24th, December 2023. 

मित्रांनो,

            आज रसिकांचे आवडते गायक मोहम्मद रफी यांची 99 वी जयंती. मोहम्मद रफी यांना लोक आदराने रफी साहाब म्हणतं असतं.भारतात जे दैवी देणगी लाभलेले गायक होऊन गेले,त्यांत एक नांव मोहम्मद रफी यांचे घेता येईल.1941 ला सुरु झालेली त्यांची कारकीर्द ही 1980 ला त्यांचा मृत्यू होईपर्यन्त सुरु होती.त्यांनी त्यांच्या मृत्यूच्या काही तास आधी एक रेकॉर्ड केल्याचे सांगितले जाते.आज त्यांना शब्द सुमनांजली वहाण्यासाठीच हा ब्लॉग. 

प्रास्ताविक

            मोहम्मद रफी यांचा जन्म 24 डिसेंबर, 1924 ला पंजाबमधे अमृतसर जिल्ह्यातील कोटला सुलतानसिंग या गांवी झाला.रफी हे उस्ताद अब्दुल वाहिद खान,पंडित जीवनलाल मट्ट आणि फिरोज निजामी यांच्याकडून  शास्त्रीय संगीत शिकले होते.वयाच्या 13 व्या वर्षी त्यांनी कुंदन लाल सैगल याच्या सोबत गाणे केले.1941 मध्ये रफी यांनी संगीत दिग्दर्शक श्याम सुंदर यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली पंजाबी चित्रपट “गूल बलोच” मध्ये पहिल्यांदा एक पार्श्वगीत गायले.1945 मध्ये “गांव की गोरी” या चित्रपटातून हिन्दी चित्रपटातून हिन्दी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आणि मग मागे वळून पाहिले नाही.




 मोहम्मद रफी यांची काही हिट गाणी

            मोहम्मद रफी यांची काही हिट गाणी लिहिणे खरं तरं खूप कठीण आहे.कारण त्यांची हिट गाणी खूप आहेत.म्हणून खरं तरं मोहम्मद रफी यांची मला आवडलेली हिट गाणी असे शीर्षक योग्य ठरले असते.पण असो.

 1.       मधूबन मी राधिका नाचे रे गिरीधर की मुरलिया बाजे रे.

2.       सावन आये या ना आये पिया जब झुमे सावन है.

3.       तेरी आँखों के सिवा दुनिया मे रखा क्या है.

4.       मै निगाहे तेरे चेहरे से हटाऊँ कैसे.

5.       मेरे महबूब तुझे मेरे मुहब्बत की कसम.  

6.       एक घर बनाऊँगा तेरे घर के सामने.

7.       झील मिल सितारोंका आँगन होगा.

8.       लेके पहला पहला प्यार.

9.       सौ साल पहले मुझे तुमसे प्यार था.

10.  अभी ना जाओ छोड़कर के दिल अभी भरा नहीं.

11.  हमदम मेरे मान भी जाओ कहना मेरे प्यार का.

12.  तेरी बिंदियाँ रे,हाय हाय तेरी बिंदियाँ रे.

13.  दो सितारों का जमी पर है मिलन आज की रात.

14.  यह मेरा प्रेम पत्र पढ़कर के तुम नाराज ना होना.

15.  याद न जाए बीते दिनों की,जाके न आए वो दिन.

16.  मैं जिंदगीका साथ निभाता चला गया.

17.  एहसान तेरा होगा मुझ पर दिल चाहता है वो.

18.  अभी ना जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं.

19.  दिल का भंवर करे पुकार प्यार का राग सुनो रे.

20.  चौदवी का चाँद हो या आफताब हो.

21.  चाँद मेरा दिल चाँदनी हो तुम 

22.  ऐ गुलबदन फूलोंकी महक काटों की चुभन

23.  शिर्डी वाले साई बाबा आया है तेरे दरपे.

24.  मन तड़पत हरी दर्शन को आज.

25.  कुहु कुहु बोले कोयलिया. 


ही यादी खूप मोठी होऊ शकेल,पण ब्लॉगच्या काही मर्यादा आहेतच.मोहम्मद रफी यांनी काही मराठी गाणीही म्हटली, त्यातील प्रभू तू दयाळू कृपावंत दाता, शोधीशी मानवा राऊली मंदिरी, अगो पोरी संभाल दर्याला तूफान आयलयं भारी, हा रुसवा सोड सखे पुरे हा बहाणा, नको आरती की नको पुष्पमाला, प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा ही शलीच गाणी खूप गाजली.

 

समारोप

             मोहम्मद रफी यांच्यावर ब्लॉग लिहायचा म्हणजे सोप काम नाही. 1 हजारावर चित्रपटात त्यांनी आवाज दिला.वेगवेगळे संगीतकार, वेगवेगळे सहगायक आणि बरेच काही.त्यांच्या वर ब्लॉग दोन तीन लिहावे लागतील. एवढे मोठं त्यांच काम.म्हणून त्यांची मला आवडलेली गाणी लिहिली. कदाचित ही गाणी तुमचीही आवडती असतील.तर मोहम्मद रफी यांच्या 99 व्या जयंती निमित्त त्यांना माझे विनम्र अभिवंदन.    

तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुढचा ब्लॉग येईपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

  

प्रसाद नातु, पुणे.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...