Blog No. 2023/72 Date: 23rd , March 2023. मित्रांनो , काल , सर्वजण हिंदू नववर्ष “गुढीपाडवा” साजरे करण्यात व्य ग्र होते.त्यामुळे मी देखिल ब्लॉगिंगपासून दूर राहणे पसंत केले आणि माझी नात "आर्या" सोबत खेळण्याचा आनंद घेतला.सिलिकॉन व्हॅली बँक , सिग्नेचर बँक आणि क्रेडिट सुईस बँक कोसळल्यानंतर , साहजिकच भारतीयांच्या मनात भारतीय बँकांमधील त्यांच्या ठेवींच्या भवितव्याबद्दल शंका उत्पन्न झाल्या असतील.मी 38 वर्षे बँकर होतो आणि मी वाणिज्य शाखेचा विद्यार्थी देखील आहे , पदवी स्तरावर बँकिंग हा विशेष विषय होता.अशा रितीने बँकिंगशी माझा संबंध जवळपास ४८ वर्षांचा आहे.म्हणून मला बँकिंगविषयी आत्मीयता तर आहेच,पण बँकांची बँक अशी ज्या बँकेची ओळख आहे.त्या रिझर्व्ह बँकेवर पूर्ण विश्वास देखिल आहेच.ह्या ला कारण देखिल तसेच आहे.तीच आज तुमच्यासमोर मी घेऊन आलो. रिजर्व बँक आणि भारतीय बँका बँकांमध्ये ज्या एकूण ठेवी जमा होतात.ती 100% रक्कम ही कर्ज म्हणून देता येत नाही.त्यासाठी रिजर्व बँकेने निकष ठरवून दिले ...
prasadnatoo.co.in या ब्लॉगवर आरोग्य, करमणूक , माहिती तंत्रज्ञान आणि इतर विविध विषयावरील माहिती आपणास मिळू शकते. .