Skip to main content

ऑटोपे ही एक स्वयंचलित पेमेंट सिस्टम

  ब्लॉग नं. 2025/35 4 . दिनांक: 1 8 डिसेंबर, 2025. मित्रांनो, " ऑटोपे ही एक स्वयंचलित पेमेंट सिस्टम आहे, जी कंपन्यांना तुमच्या बँक खात्यातून पैसे काढण्याची, किंवा बिल आणि खर्च भरण्यासाठी,एका निश्चित वेळापत्रकानुसार,तुमच्या क्रेडिट कार्डवर शुल्क आकारण्याची परवानगी देते ," असे गेटश्योरचे आर्थिक सल्लागार आणि सीईओ रिकिन शाह म्हणतात. "हे आवर्ती बिल भरणे अधिक सोयीस्कर बनवण्यासाठी डिझाइन केले आहे." याविषयी आहे आजचा ब्लॉग. सविस्तर:  दरमहा बिल भरणे सुलभ करण्यासाठी,तुमच्या आर्थिक टूलबॉक्समध्ये हे एक उत्तम साधन आहे , परंतु कोणते बिल ऑटोपे करायचे हे ठरवताना,अनेक घटक विचारात घेतले पाहिजेत. सुरुवातीला , जर तुम्हाला खात्री असेल की तुम्ही पूर्ण पैसे देऊ शकता,तरच तुमचे मासिक बिल भरण्यासाठी स्वयंचलित पेमेंट वापरा. "अन्यथा , तुम्ही एक शिल्लक जमा करू शकता,ज्यामुळे तुम्हाला व्याज आकारले जाईल आणि ते तुमच्या बिलांवर लक्ष ठेवण्याच्या तुमच्या प्रयत्नांना कमकुवत करू शकते ," क्रेडिट कर्माच्या कम्युनिकेशन्स आणि ब्रँडच्या माजी उपाध्यक्ष डाना मरीनाउ म्हणतात. "जर तुम्हा...

सुलोचनाताई चव्हाण

 Blog No. 2023/67     

Date: 17th, March 2023.


 

मित्रांनो,

            लावणी ऐकणाऱ्यांचा एक वेगळा वर्ग असतो ही व्याख्या मोडून काढली ती सुलोचनाताई चव्हाण यांनी. फड सांभाळ तुऱ्याला गं आला, तुझ्या उसाला लागंल कोल्हा असं ठसक्यात म्हणावं ते सुलोचनाताईनी. चपखळ,फटकेबाज शब्दांना आपल्या भारदस्त आवाजात ठसका आणि खटका देण्याचे काम सुलोचनाताईनी केलं आणि गायनाच्या क्षेत्रात आपली एक ओळख निर्माण केली.अशा या रसिकांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण केलेल्या गायिकेची आज जयंती.

 

प्रास्ताविक

            सुलोचना कदम हे सुलोचनाताईचे माहेरचं नांव. त्यांचा जन्म 17 मार्च 1933 चा. म्हणजे बरोबर 10 वर्षांनी आपण त्यांचे शताब्दी वर्ष साजरे करु. सुलोचना कदम ह्यांचा जन्म मुंबईत झाला.मुंबईच्या चाळीतच त्यांचे बालपण गेले.वयाच्या पंधराव्या वर्षापासून त्यांनी गायला सुरुवात केली. त्यांच्या घरचाच एक “श्रीकृष्ण बालमेळा” होता.ह्या मेळ्याच्या माध्यमातून त्यांनी कलाक्षेत्रात पदार्पण केले. प्रसिद्ध अभिनेत्री संध्या या देखिल ह्या मेळ्यात भाग घेत. मेळ्याच्या सोबत त्यांनी हिन्दी,गुजराती आणि उर्दू नाटकांत बालभूमिका केल्या.त्या काळी घरी ग्रामोफोन ऐकून त्या गायनाचा रियाज करीत. त्यांनी कुठलेही शास्त्रीय संगीत शिकले नाही.

            “कृष्ण सुदामा”ह्या हिन्दी चित्रपटात त्या आपले पहिले गाणं गायल्या.त्या वेळेस त्या नऊ वर्षाच्या होत्या. या नंतर त्यांनी मा. भगवान ह्यांच्या काही चित्रपटात पार्श्वगायन केले. यात त्यांचे सहकलाकार होते, सी. रामचंद्र.त्याच वेळेस त्यांनी मो. रफी, मन्ना डे, शमशाद बेगम या सारख्या आघाडीच्या गायकांसोबत सहगायन केले. पुढे मराठी लावणीसम्राज्ञी ठरलेल्या सुलोचना चव्हाण यांनी पहिली लावणी.


लावणी गायन 

सांभाळ गं, सांभाळ गं, सांभाळ दौलत लाखाची" ही लावणी सुलोचना चव्हाण लहानपणी वारंवार गुणगुणत असत आणि त्यासाठी आईकडून त्यांनी भरपूर ओरडाही खाल्ला होता.मुलींनी लावणी ऐकू नये, गाऊ नये असे त्याकाळी मत होते. आचार्य अत्रे यांच्या "हीच माझी लक्ष्मी" या चित्रपटात त्यांनी पहिली लावणी गायली. ही लावणी हंसा वाडकर यांच्यावर चित्रित करण्यात आली होती.संगीत वसंत देसाई यांचे होते. "मुंबईच्या कालेजात गेले पती, आले होऊनशान बीए बीटी..." हे त्या लावणीचे बोल होते.पुढे “लावणी सम्राज्ञी" हा किताब त्यांना आचार्य अत्रे यांनीच दिला.नंतर “कलगीतुरा” ह्या चित्रपटासाठी त्या काही गाणी गायल्या. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक  शमराव चव्हाण यांच्याशी त्यांचे लग्न झाले. गीतकात जगदीश खेबुडकर यांच्या "नाव गाव कशाला पुसता अहो मी आहे कोल्हापुरची, मला हो म्हणत्यात लवंगी मिरची" या गाण्याने त्यांचे आयुष्यच बदलून गेले.

सुलोचना चव्हाण यांना १९६५ साली "मल्हारी मार्तंड" या चित्रपटातील पार्श्वगायनासाठी महाराष्ट्र राज्याचा पुरस्कार मिळाला. त्याहीपलीकडे जाऊन विविध स्तरावर त्यांनी गायलेल्या गाण्यांनी आणि विशेषतः लावण्यांनी त्यांना जनमानसांच्या हृदयात मानाचे स्थान मिळाले आहे.

सुलोचना चव्हाण यांची काही गाजलेली गाणी:
१. नाव गाव कशाला पुसता अहो मी आहे कोल्हापुरची, मला हो म्हणत्यात लवंगी मिरची
२. तरुणपणाच्या रस्त्यावरच पहिलं ठिकाणं नाक्याचं, सोळावं वरीस धोक्याचं
३. पाडाला पिकलाय आंबा
४. फड सांभाळ तुऱ्याला गं आला, तुझ्या उसाला लागंल कोल्हा
५. कळीदार कपूरी पान, कोवळं छान, केशरी चुना रंगला काथ केवडा वर्खाचा विडा घ्या हो मनरमणा
६. खेळताना रंग बाई होळीचा होळीचा, फाटला गं कोना माझ्या चोळीचा
७. कसं काय पाटील बरं हाय का, काल काय ऐकलं ते खरं हाय का?
८. पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, आई मला नेसव शालू नवा
९. गोरा चंद्र डागला
१0. मला म्हणत्यात पुण्याची मैना
११  लई लई लबाड दिसतोय ग

पुरस्कार आणि सन्मान

१. महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार “मल्हारी मार्तंड” चित्रपटातील पार्श्वगायनाकरिता.

२. महाराष्ट्र सरकारचा संगीत क्षेत्रातील विशेष कामगिरीसाठी “लता मंगेशकर” पुरस्कार.

३. मार्च,२०२२ मध्ये पद्मश्री हा शासनाचा चतुर्थ सर्वोच्य नागरी पुरस्कार. 


मृत्यु 

       अशा या वेगळ्या धाटणीच्या आणि स्वतःचा अमिट असा ठसा उमटविलेल्या गायिकेने मागच्याच वर्षी १० डिसेंबर ला मुंबई येथे जगाचा निरोप घेतला.

आज त्यांच्या 91 व्या जयंती निमित्त त्यांना माझा मानाचा मुजरा.

 फोटो सौजन्य :- https://en.wikipedia.org/wiki/Sulochana_Chavan

प्रसाद नातु,पुणे.   

Comments

  1. Lavni samradnyi.Sulochana Chavhan .ANANT

    ReplyDelete
  2. विनम्र श्रद्धांजलि🌺🌺

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...