Blog No. 2023/69
Date: 19th, March 2023.
मित्रांनो,
बऱ्याच मित्रांकडून
अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती की, एखादा ब्लॉग सिलिकॉन
व्हॅली बँकेवर लिहावा.कारण मी एक पूर्वाश्रमीचा बँकर आहे आणि बँक ही खरोखर प्रत्येकाच्या जिव्हाळ्याच्या गोष्ट.बँक आपल्या डिपॉजिटना
व्यवस्थित सांभाळते. एवढेच नव्हे तर आपल्या आर्थिक गरजा भागवते.विशेषतः स्वतःचे घर
ही आधी सेवानिवृत्ती नंतर किंवा मुलांची शिक्षण,लग्न वगैरे आटोपल्यावर साकारायची कल्पना
होती.पण आजकाल ते अगदी तिशीत शक्य झाले आहे ते केवळ आणि केवळ बँकांमुळे.
सिलिकॉन व्हॅली बँकबद्दल जाणून घेऊया
सिलिकॉन
व्हॅली बँक ही अमेरिकेतील 16 व्या क्रमांकाची मोठी
व्यावसायिक बँक होती. तिची स्थापना 1983 ची. भारतातील सरकारी बँकांच्या मानाने ही तरुण
बँक. ही एक व्हेंचर कॅपिटल बँक होती.स्टार्ट अप, नवोदित कंपन्या आणि उभरत्या कंपन्या
यांची खाती ह्या बँकेत होती आणि या उद्योगांना भांडवलाचे पाठबळ देखिल ही बँक पुरवीत
असे. कॅनडा, चीन, डेन्मार्क,
जर्मनी, आयर्लंड, इस्रायल, स्वीडन आणि ब्रिटन मध्ये देखिल या बँकेचा विस्तार झालेला होता. अलीकडच्या काळातील
तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झालेल्या भरघोस
वाढीमुळे एसवीबीला खूप फायदा झाला होता.त्यातच कोविड 19 च्या काळात डिजिटल सेवांची
मागणी वाढली आणि व्याजाचा खर्च कमी झाल्याने या क्षेत्रात चांगली तेजी आली होती.
बँकेची
मालमत्ता (Asset) ज्यामध्ये
बँकेने दिलेल्या कर्जाचा समावेश होतो. त्यात 2019 च्या तुलनेत तिप्पट
वाढ झाली. बँकेच्या मालमत्ता $71 अब्ज पासून तिप्पट वाढून
मार्च 2022 च्या अखेरीस $220 अब्जवर पोहोचल्या.हजारो टेक स्टार्टअप्सनी त्यांची कॅश बँकेकडे आणून ठेवल्यामुळे
त्या कालावधीत ठेवी $62 अब्ज वरून $198 अब्ज झाल्या. हे सर्व व्यवस्थित सुरू असतांना अचानक काय झाले की ही बँक कोसळली.
सिलिकॉन व्हॅली बँक कां कोसळली
याचा मागोवा
घेतला असता,ह्याचा रोख हा त्या कालावधीकडे जातो, जेव्हा अमेरिकेत 0% व्याज दराचा जमाना
होता.या काळात सिलिकॉन व्हॅली बँकेने अब्जावधी रक्कम ही सरकारी रोख्यात जमा केली.फेडरल रिझर्व्हने जी अमेरिकेतील मध्यवर्ती बँक
आहे,आपल्या रिजर्व बँकेसारखी,तिने महागाईला आळा घालण्यासाठी व्याज
दरात वाढ केली. फेडरल रिझर्व्हने व्याज दरात वाढ केल्याने बॉन्डच्या किमती कोसळल्याने सिलिकॉन
व्हॅली बँकेच्या बॉन्ड ह्या संवर्गातील निवेशाचे मूल्य कोसळले. या मध्येच स्टार्ट कंपनीला मिळणारे कर्जही महागले. त्यामुळे त्या कंपन्यानी इतर
बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ठेवी काढून घेण्यासाठी
बँकेकडे धांव घेतली.बँकेच्या मालमत्ता,बॉन्डच्या कोसळलेल्या मूल्यामुळे कमी झालेल्या,
मोठ्या प्रमाणात ठेवी काढून घेण्याचा ताण बँक सहन करु न शकल्याने सिलिकॉन व्हॅली बँक कोसळली.
बँकेवर
धाव कशामुळे झाली?
मी आधीच लिहिल्याप्रमाणे एसव्हीबीच्या समस्यांचे मूळ हे बँकेने
पूर्वी केलेल्या गुंतवणूकीत
होते. बुधवारी बँकेवर धावपळ सुरू झाली जेव्हा बँकेने जाहीर केले की तिने तोट्यात
रोखे विकले आहेत.त्यामुळे मोठ्या प्रमाणात पैसे काढणाऱ्या ग्राहकांमध्ये घबराट
पसरली. बँकेचा शेअर गुरुवारी 60%
घसरला.
बँकेच्या ठेवीदारांचे भवितव्य काय?
अमेरिकेच्या
राष्ट्राध्यक्षांनी हे घोषित केले आहे. सर्व ठेवीदारांना त्यांचे पूर्ण पैसे परत मिळतील.खरे
तर अमेरिकेसारख्या भांडवलशाही देशात हा असा निर्णय सरकारने घेतल्याने मला थोडे आश्चर्य
वाटले. कारण तिथे सगळे काही अर्थव्यवस्था निश्चित करते असे गृहीतक असल्या सारखे असते.पण
आता ही कुजबूज ऐकू येते आहे की ते मोठे ठेवीदार असल्याने त्यांचे हित सरकार जोपासण्याचा
प्रयत्न करीत आहे.जी ओरड ऐकण्याची आम्हा भारतीयांना सवय झाली आहे.त्यामुळे या आरोपात
काही नविन वाटले नाही.
सारांश
सिलिकॉन व्हॅली बँक कोसळली.त्यानंतर
सिग्नेचर बँक देखिल त्याच मार्गाने गेली.अदानीसारखे मानव निर्मित संकट येऊन देखिल भारतावर
विशेष परिणाम झाला नाही.ह्याचे श्रेय रिजर्व बँक ऑफ इंडियाला आहे हे रिजर्व बँक ऑफ
इंडियाला उठसूट शिव्या घालणाऱ्यांनी आणि बोटे मोडणाऱ्यांनी लक्षात घ्यावे.एवढेच ह्या
निमित्ताने सांगावेसे वाटते.
प्रसाद नातु,पुणे.
साध्या आणि सोप्या भाषेत चांगली माहिती 💐💐
ReplyDeleteThanks
Deleteछान समजावून सांगितलं सर 👌👌
ReplyDeletegood blog
ReplyDeleteThanks
ReplyDeleteछान माहितीपूर्ण लेख.
ReplyDeleteExcellent write up. In short you have explained the 2 USA bank collaps position.
ReplyDeleteAt the same time you also appreciated our RBI measures in strengthening the Indian Economy.
Great Study and collection of information.
ALL THE BEST.