Skip to main content

ऑटोपे ही एक स्वयंचलित पेमेंट सिस्टम

  ब्लॉग नं. 2025/35 4 . दिनांक: 1 8 डिसेंबर, 2025. मित्रांनो, " ऑटोपे ही एक स्वयंचलित पेमेंट सिस्टम आहे, जी कंपन्यांना तुमच्या बँक खात्यातून पैसे काढण्याची, किंवा बिल आणि खर्च भरण्यासाठी,एका निश्चित वेळापत्रकानुसार,तुमच्या क्रेडिट कार्डवर शुल्क आकारण्याची परवानगी देते ," असे गेटश्योरचे आर्थिक सल्लागार आणि सीईओ रिकिन शाह म्हणतात. "हे आवर्ती बिल भरणे अधिक सोयीस्कर बनवण्यासाठी डिझाइन केले आहे." याविषयी आहे आजचा ब्लॉग. सविस्तर:  दरमहा बिल भरणे सुलभ करण्यासाठी,तुमच्या आर्थिक टूलबॉक्समध्ये हे एक उत्तम साधन आहे , परंतु कोणते बिल ऑटोपे करायचे हे ठरवताना,अनेक घटक विचारात घेतले पाहिजेत. सुरुवातीला , जर तुम्हाला खात्री असेल की तुम्ही पूर्ण पैसे देऊ शकता,तरच तुमचे मासिक बिल भरण्यासाठी स्वयंचलित पेमेंट वापरा. "अन्यथा , तुम्ही एक शिल्लक जमा करू शकता,ज्यामुळे तुम्हाला व्याज आकारले जाईल आणि ते तुमच्या बिलांवर लक्ष ठेवण्याच्या तुमच्या प्रयत्नांना कमकुवत करू शकते ," क्रेडिट कर्माच्या कम्युनिकेशन्स आणि ब्रँडच्या माजी उपाध्यक्ष डाना मरीनाउ म्हणतात. "जर तुम्हा...

आवश्यक झोप महत्वाची - Sufficient Sleep Required

Blog No. 2023/68     

Date: 17th, March 2023. 


मित्रांनो,

            तुम्हाला माहित आहे कां? जपान नंतर भारत हा जगातला दूसरा आवश्यक तेवढी झोप न घेणाऱ्यांचा देश आहे किंवा ज्यांची झोप उडाली आहे? अशा लोकांच्या देशामध्ये भारताचा जपान नंतर दूसरा नंबर लागतो. पुरेशी झोप न घेतल्याने फक्त थकवा जाणवतो एवढेच नसून पुरेशी झोप ही आपली दैनंदिन गरज आहे.जी आपल्या जीवनातील सुखाशी निगडीत आहे. निरोगी रहाण्यापासून ते दिवसभर कार्यक्षम राहण्यासाठी रात्रीची चांगली झोप घेणे आवश्यक आहे असे प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. हरिष शेट्टी,हिरानंदानी हॉस्पिटल,मुंबई यांचे म्हणणे आहे.थकवा,डोकेदुखी,मन:स्थिती चांगली नसणे ह्या साऱ्याच गोष्टी चांगली झोप न घेण्याशी निगडीत आहेत. चांगली झोप आपले मेंदूचे कार्य कार्यक्षमपणे सुरू ठेवण्यास सहाय्यभूत ठरते.  

तुमची झोप आवश्यक तेवढी होत नाही हे कसे ओळखावे?

डॉ. जॉय देसाई, एमबीबीएस, एमडी - जनरल मेडिसिन, डीएनबी - न्यूरोलॉजी - न्यूरोलॉजिस्ट, जसलोक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, सांगतात की तुम्ही जर वारंवार आजारी पडत असाल तर त्याचा थेट संबंध तुमच्या झोपेशी आहे. पुरेशी झोप घेतल्याने रोगाशी लढा देणाऱ्या अँटीबॉडीज कमी तयार होऊ शकतात, त्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती कमी होते. त्यांच्या म्हणण्यानुसार छोट्या छोट्या गोष्टीवरून अस्वस्थ वाटत रहाणे,सतत थकवा जाणवणे, एकाग्रता कमी होणे ही सर्व आवश्यक तेवढी झोप न झाल्याची लक्षणे आहेत.     

आवश्यक तेवढी झोप घेण्यासाठी काय करावे.  

डॉ. जितेंद्र वार्ष्णेय, Wellness Director, सिक्स सेन्सेस वाना यांनी आवश्यक तेवढी झोप घेण्यासाठी काय करावे हे सुचविले आहे.

1. आपल्या झोपेचे वेळापत्रक ठरवा आणि ते पाळा.यात झोपायची वेळ आणि सकाळी जागे होण्याची वेळ,ह्या वेळा ठरवून ठेवा आणि पाळा. त्यामुळे काही दिवसात तुम्हाला ठराविक वेळेला झोप येईलच.

2. दुपारी 2:00 नंतर कॅफिनयुक्त पदार्थांचे सेवन टाळा.तसे केल्यास तुमची झोपेची वेळ आणि गुणवत्ता अर्थात चांगली झोप,हे दोन्ही साध्य होईल.

3. तुम्ही जर अल्कोहोलचे सेवन करीत असाल तर झोपण्याच्या 3 तास आधच घेणे बंद करा.    

4. दररोज कुठला ना कुठला व्यायाम करा.पण झोपण्याच्या आधी कुठलाही व्यायाम करु नका.

5. दररोज सकाळी 15 मिनिटे सूर्यप्रकाश मिळवा. हे तुमचे सर्कॅडियन घड्याळ (24 तासाचे अंतर्गत घडयाळ,जे तुमच्या मेंदूत असते) ठीक ठेवण्यास मदत करेल आणि आवश्यक तेवढी झोप मिळेल.

आणि सर्वात आणि सगळ्यात महत्वाचे रात्रीच्या वेळी डिजिटल उपकरणांचा वापर टाळा. फक्त 2 तासांच्या डिजिटल उपकरणांच्या वापरात 40% एवढे मेलाटोनिनचे उत्पादन 40% पर्यंत कमी होऊ शकते, ज्यामुळे झोप लागणे कठीण होते.

शेवटी, पुदिन्याची पाने आणि ओवा गरम केलेल्या पाण्याचा वाफारा घेतल्यास चांगली झोप येण्यास मदत होते.

आज जागतिक निद्रा दिवसाच्या निमित्ताने हा दूसरा ब्लॉग लिहिला आहे. आपल्याला सगळ्यांना जागतिक निद्रा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. कुठल्याही प्रकारचा उपाय करावा न लागता तुम्हा सगळ्यांना आवश्यक तेवढ्या झोपेचे सुख लाभो. हीच शुभेच्छा देतो आणि आजचा ब्लॉग संपवितो.     


प्रसाद नातु,पुणे 

सौजन्य :- कल्पना शर्मा, टाइम्स ऑफ इंडिया,17-03-2023. 

 

Comments

  1. Waa. Kya bat hai. Bloug dware lokanchya health chi dekhil kalji ghetay Sir. 👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...