Skip to main content

Select your Language

आधी झोप की आधी व्यायाम? काय सांगतं नवं संशोधन?

ब्लॉग नं. 2026/281. 

दिनांक: 10 ऑक्टोबर, 2026. 

मित्रांनो,

प्रास्ताविक

आधी झोप की आधी व्यायाम? काय सांगतं नवं संशोधन?

आपल्यापैकी अनेकजण आरोग्याची काळजी घेण्यासाठी रोज रात्री नवीन संकल्प करतात.“उद्या सकाळी लवकर उठून पहिलं चालायला जाईन,” किंवा “आज रात्री किमान 6-7 तास झोप पूर्ण करेन,” असे विचार आपण करतो आणि फोनवर ढीगभर गजरही लावून ठेवतो. मात्र, प्रत्यक्षात पुरेशी झोप, नियमित व्यायाम आणि योग्य आहार यांचा ताळमेळ बसवणे आपल्याला बऱ्याचदा जमत नाही. मग कामापलीकडे जाऊन शरीराच्या या महत्त्वाच्या गरजा आपण पूर्ण का करू शकत नाही? यावर प्रकाश टाकणारे एक नवीन संशोधन समोर आले आहे. या बद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ.    

सविस्तर

संशोधनातून काय समोर आलं?

‘कम्युनिकेशन्स मेडिसिन’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका नव्या संशोधनानुसार,बहुतांश प्रौढ व्यक्तींना पुरेशी झोप आणि शारीरिक हालचालींची गरज पूर्ण करणे कठीण जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. संशोधकांनी ट्रॅकिंग डेटाचे विश्लेषण करून,रात्रीची झोप आणि दिवसभरातील हालचाल यांच्यातील परस्परसंबंध तपासले.या अभ्यासात सहभागींनी झोपेचा कालावधी मोजण्यासाठी,गादीखाली सेन्सर आणि रोजची पावलं मोजण्यासाठी,स्मार्टवॉचचा वापर केला होता. यातून काही रंजक गोष्टी समोर आल्या:

मर्यादित यश: केवळ 12.9 % प्रौढ व्यक्तींनी नियमितपणे रात्री 7 ते 9 तास झोप घेतली आणि दररोज 8,000  हून अधिक पावलं चालण्याचे लक्ष्य गाठले.

झोपेचा व्यायामावर प्रभाव: व्यायामापेक्षा झोपेचा शारीरिक हालचालींवर जास्त प्रभाव पडतो. अत्यंत कमी किंवा जास्त झोपेशिवाय, सुमारे सहा ते सात तासांची झोप घेतल्यानंतर लोक सर्वाधिक पावलं चालल्याचे आढळले.

दैनंदिन दगदगीचा झोपेवर परिणाम: दिवसभराच्या शारीरिक हालचालींचा आणि दगदगीचा झोपेवर फारसा नकारात्मक परिणाम होत नाही. जास्त पावलं चालण्यामुळे झोपेच्या कालावधीत आणि गुणवत्तेत केवळ किरकोळ बदल आढळले.

आपली झोप अपूर्ण का राहते?

ही सगळी समस्या उठण्याच्या वेळेपेक्षा झोपण्याच्या वेळेशी निगडीत आहे.जेव्हा आपण उद्यापासून नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप घेण्याचा संकल्प करतो,तेव्हा आपण नेहमीपेक्षा लवकर उठण्यासाठी पहाटे 5 चा गजर लावतो. यामुळे सुरुवातीला काही दिवस चालण्यासाठी वेळ मिळतो खरा; पण झोप अपुरी राहिल्यामुळे दिवसभर आळस आणि चिडचिड वाढते. हळूहळू आपण गजर बंद करतो आणि व्यायाम टाळायला लागतो. रात्री बिछान्यावर पडल्यावर लगेच झोप येत नाही, अशा वेळी मोबाईल पाहण्यात वेळ वाया जातो किंवा दिवसभरातील विचारांमुळे मन अस्वस्थ होते आणि जागरण होते.

समारोप

आरोग्यासाठी झोप आणि व्यायाम या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि त्या एकमेकांशी जोडलेल्या आहेत. मध्यम स्वरूपाच्या शारीरिक हालचालींमुळे झोपेची गुणवत्ता सुधारते, तर पुरेशी झोप आपल्याला दिवसभर सक्रिय राहण्यासाठी ऊर्जा देते. जर तुम्हाला निरोगी आयुष्य जगायचे असेल, तर केवळ सकाळी लवकर उठण्याचा अट्टहास करण्याऐवजी रात्रीची 6 ते 7 तासांची गाढ झोप पूर्ण करण्यावर भर द्या. झोप आणि व्यायामाचा योग्य समतोल साधण्यासाठी रात्री उशिरापर्यंत स्क्रीनचा वापर टाळा आणि आपल्या जीवनशैलीत छोटा पण सकारात्मक बदल करा, जेणेकरून तंदुरुस्तीचे तुमचे ध्येय सहज साध्य होईल !

 

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

महत्वाचे:

या ब्लॉगची लिंक तुम्ही इतरांना पाठवू शकता. हा ब्लॉग मराठी सोबत इंग्लिश,हिन्दी आणि इतर भारतीय भाषात वाचता येतो,तेव्हा मराठी न समजणाऱ्यांना ब्लॉगची लिंक पाठवू शकता.      

  

प्रसाद नातु.

होलीस्टीक हेल्थ कोच

(आरोग्य आणि जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)

📝 टीप: हा लेख केवळ माहितीपुरता आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा. 

 

 


Comments

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...