Skip to main content

उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो? 0605

ब्लाॅग नं.2026/126. दिनांकः 6 मे, 2026 . मित्रांनो , 50 पेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींसाठी , उन्हाळा शारीरिकदृष्ट्या थोडा आव्हानात्मक असू शकतो. कारण वाढत्या वयानुसार , शरीराची तापमान नियंत्रित करण्याची क्षमता कमी होते.अशा वेळी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.त्यासाठी काय उपाय करायचे , हे आपण सविस्तर जाणून घेऊ या. सविस्तरः काही महत्त्वाचे उपाय खालील प्रमाणे आहे: 1. खाण्यापिण्याच्या सवयीः नियमित पाणी पिणे: तहान लागली नसली तरीही,दिवसातून किमान 8-10 ग्लास पाणी प्या.वृद्ध व्यक्तींमध्ये तहान लागण्याची जाणीव कमी होते , त्यामुळे पाण्याची बाटली सोबत ठेवा. ताक आणि शहाळे: ताजे ताक , शहाळ्याचे पाणी आणि कोकम सरबत यांसारखी नैसर्गिक पेये शरीराला थंड ठेवतात. प्रथिने आणि हलका आहार: पचायला जड असलेले अन्न (उदा. तळलेले पदार्थ) टाळा. वरण-भात , मुगाची खिचडी , नाचणीचे सत्व यांसारखे हलके आणि पौष्टिक पदार्थ घ्या. 2. ऊन आणि उष्णतेपासून संरक्षण: वेळेचे नियोजन: दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडणे टाळा. जर काही महत्त्वाचे काम असेलच , तर सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा पूर्ण करा. पेहराव: सैल , फ...

Weight Loss आणि Fat Loss मधील फरक

 ब्लॉग नं. 2026/052.

दिनांक: 21 फेब्रू, 2026. 

मित्रांनो,

वजन नाही तर चरबी कमी करा! – “Reduce Fat, Not Weight”

आजकाल फिटनेस म्हटलं की पहिला प्रश्न असतो, किती किलो वजन कमी झालं?” पण खरा प्रश्न असा असायला हवा,की किती चरबी कमी झाली?” कारण वजन कमी होणे म्हणजे नेहमीच आरोग्य सुधारणे असे नाही. आजच्या ब्लॉगमधून Weight Loss vs Fat Loss  फरक समजून घेणार आहोत.

सविस्तर:

वजन कमी करण्यासाठी, जेव्हा तुम्ही क्रॅश डाएट करता तेव्हा वजन तर कमी होतं पण त्यासोबत शरीरातील पाणी कमी होतं, स्नायू कमी होतात आणि थोडी चरबी देखिल कमी होतं. त्यामुळे वजन कमी दिसतं पण शरीर अशक्त होतं.

पण जेव्हा Fat loss करता तेव्हा, चरबी कमी होते, स्नायू टिकून रहातात, मेटाबॉलिझम वाढतो आणि शरीर टोनअप होतं. म्हणूनच “Reduce fat, not weight” हा खरा फिटनेस मंत्र आहे.

शरीरात चरबी तीन प्रकारची असते. जी खालीलप्रमाणे आहे.   

🧈 शरीरातील चरबीचे प्रकार

1. Subcutaneous Fat (त्वचेखालील चरबी)

ही चरबी मुख्यतः त्वचेखाली असते. ती पोट, मांड्या, नितंब येथे असते. ती व्यक्तीच्या सौंदर्यावर परिणाम करते. अशा प्रकारची चरबी,आरोग्यास फारसा धोकादायक नाही (मर्यादेत असेल तर)

2 Visceral Fat (अंतर्गत अवयवांभोवतीची चरबी):

ही सर्वात धोकादायक चरबी आहे.ती चरबी कुठे असते? ही चरबी यकृत, पॅन्क्रियाज आणि आतडे यांच्या भोवती असते. Visceral fat मुळे होणारे धोके म्हणजे,टाईप २ मधुमेह,हृदयरोग,Fatty liver,उच्च रक्तदाब,
इन्सुलिन रेझिस्टन्स इत्यादि. बाहेरून पोट फार मोठं नसतानाही ही चरबी जास्त असू शकते. यालाच “TOFI – Thin Outside Fat Inside” म्हणतात.

3. Intramuscular Fat:

स्नायूमध्ये साठलेली चरबी जिचा संबंध इन्सुलिन रेझिस्टन्सशी असतो.

🎯 कोणती चरबी कमी करणे सर्वात महत्त्वाचे?

तुम्ही सौंदर्यासाठी चरबी कमी इच्छित असाल तर Subcutaneous fat कमी करायसाठी प्रयत्न करा, पण आरोग्यासाठी मात्र Visceral fat कमी करणे अत्यावश्यक आहे.  

फिटनेसचा खरा उद्देश Visceral fat reduction:

📏 Visceral Fat वाढल्याची लक्षणे:

            Visceral Fat वाढल्याची लक्षणांमध्ये, कंबरेचा घेर वाढणे. पोट कडक व पुढे आलेले असणे, HDL कमी असणे, ट्रायग्लिसराइड वाढणे,शुगर वाढणे यांचा समावेश होतो.  

🏃 Visceral Fat कमी करण्याचे सर्वोत्तम मार्ग:

1. Strength Training:

मसल वाढ केल्याने मेटाबॉलिझममध्ये वाढ होते,ज्यामुळे visceral fat जलद कमी होते.  

2. चालणे: सामान्य चालणे Normal walking + Intermittent brisk walking, असे साधरणतः 30-45  मिनिटे चालले पाहिजे.

3.प्रोटीनयुक्त आहार:

आहारामद्धे डाळी, पनीर, अंडी, कडधान्य आणि दही यासारख्या प्रोटीनने समृद्ध गोष्टींचा समावेश असायला हवा.   

4. साखर आणि रिफाइंड कार्ब कमी करा:

आहारातून बिस्किटे, पांढरी ब्रेड, सॉफ्ट ड्रिंक्स यासारखे साखरयुक्त पदार्थ टाळायला हवेत.   

5. झोप:

रोज 7 तास झोप घ्यायलाच हवी,ज्यामुळे fat burning hormones सक्रिय होतात.  

6. ताण कमी करा:

ताण असला किंवा वाढला की जास्त कॉर्टिसोलची निर्मिती होती,ज्याचे पर्यावसन पोटाची चरबी वाढण्यात होते.  

🥗 Visceral Fat कमी करणारा भारतीय आहार:

सकाळी प्रोटीनयुक्त नाश्ता, दुपार भाकरी / मल्टीग्रेन + डाळ + भाजी, संध्याकाळ सुका मेवा + ताक आणि रात्री हलका आहार + सूप.

Fat Loss Progress कसा मोजावा?

वजन काटा वापरुन चालणार नाही तर कंबरेचे माप मोजणे, शरीरात ऊर्जा वाढणे, कपडे सैल होणे
शुगर नियंत्रण या गोष्टी दिसून येतात.  

समारोप:

वजन कमी करणे हा फिटनेस नाही, चरबी कमी करून स्नायू टिकवणे हाच खरा फिटनेस आहे. विशेषतः:

Visceral fat कमी करणे, हृदय सुरक्षित असणे, शुगर नियंत्रणात असणे. ही असेल तर दीर्घायुष्य मिळणे निश्चित.  

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा. 

  

प्रसाद नातु.

(आरोग्य आणि जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)

अस्वीकरण: हा लेख केवळ माहितीवर आणि या क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केलेल्या मतांवर आधारित आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.

Comments

  1. महत्त्वपूर्ण माहिती

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...