ब्लॉग नं. 2026/052.
दिनांक: 21 फेब्रू, 2026.
मित्रांनो,
वजन नाही तर चरबी कमी करा! – “Reduce Fat, Not Weight”
आजकाल फिटनेस म्हटलं की पहिला प्रश्न असतो, “किती किलो वजन कमी झालं?” पण खरा प्रश्न असा असायला हवा,की “किती चरबी कमी झाली?” कारण वजन कमी होणे म्हणजे नेहमीच आरोग्य सुधारणे असे नाही. आजच्या ब्लॉगमधून Weight Loss vs Fat Loss फरक समजून घेणार आहोत.
सविस्तर:
वजन कमी करण्यासाठी, जेव्हा तुम्ही क्रॅश डाएट करता तेव्हा वजन तर कमी होतं पण त्यासोबत शरीरातील पाणी कमी होतं, स्नायू कमी होतात आणि थोडी चरबी देखिल कमी होतं. त्यामुळे वजन कमी दिसतं पण शरीर अशक्त होतं.
पण जेव्हा Fat loss करता तेव्हा, चरबी कमी होते, स्नायू टिकून रहातात, मेटाबॉलिझम वाढतो आणि शरीर टोनअप होतं. म्हणूनच “Reduce fat, not weight” हा खरा फिटनेस मंत्र आहे.
शरीरात चरबी तीन प्रकारची असते. जी खालीलप्रमाणे आहे.
🧈 शरीरातील चरबीचे प्रकार
1. Subcutaneous Fat (त्वचेखालील चरबी)
ही चरबी मुख्यतः त्वचेखाली असते. ती पोट, मांड्या, नितंब येथे असते. ती व्यक्तीच्या सौंदर्यावर परिणाम करते. अशा प्रकारची चरबी,आरोग्यास फारसा धोकादायक नाही (मर्यादेत असेल तर)
2 Visceral Fat (अंतर्गत अवयवांभोवतीची चरबी):
ही सर्वात धोकादायक
चरबी आहे.ती चरबी कुठे असते? ही चरबी यकृत, पॅन्क्रियाज आणि आतडे यांच्या भोवती असते. Visceral
fat मुळे होणारे धोके म्हणजे,टाईप २ मधुमेह,हृदयरोग,Fatty
liver,उच्च रक्तदाब,
इन्सुलिन रेझिस्टन्स इत्यादि. बाहेरून पोट फार मोठं नसतानाही ही
चरबी जास्त असू शकते. यालाच “TOFI – Thin Outside Fat Inside” म्हणतात.
3. Intramuscular Fat:
स्नायूमध्ये साठलेली चरबी जिचा संबंध इन्सुलिन रेझिस्टन्सशी असतो.
🎯 कोणती चरबी कमी करणे सर्वात महत्त्वाचे?
तुम्ही सौंदर्यासाठी चरबी कमी इच्छित असाल तर Subcutaneous fat कमी करायसाठी प्रयत्न करा, पण आरोग्यासाठी मात्र Visceral fat कमी करणे अत्यावश्यक आहे.
फिटनेसचा खरा उद्देश Visceral fat reduction:
📏 Visceral Fat वाढल्याची लक्षणे:
Visceral Fat वाढल्याची लक्षणांमध्ये, कंबरेचा घेर वाढणे. पोट कडक व पुढे आलेले असणे, HDL कमी असणे, ट्रायग्लिसराइड वाढणे,शुगर वाढणे यांचा समावेश होतो.
🏃 Visceral Fat कमी करण्याचे सर्वोत्तम मार्ग:
1. Strength Training:
मसल वाढ केल्याने मेटाबॉलिझममध्ये वाढ होते,ज्यामुळे visceral fat जलद कमी होते.
2. चालणे: सामान्य चालणे Normal walking + Intermittent brisk walking, असे साधरणतः 30-45 मिनिटे चालले पाहिजे.
3.प्रोटीनयुक्त आहार:
आहारामद्धे डाळी, पनीर, अंडी, कडधान्य आणि दही यासारख्या प्रोटीनने समृद्ध गोष्टींचा समावेश असायला हवा.
4. साखर आणि रिफाइंड कार्ब कमी करा:
आहारातून बिस्किटे, पांढरी ब्रेड, सॉफ्ट ड्रिंक्स यासारखे साखरयुक्त पदार्थ टाळायला हवेत.
5. झोप:
रोज 7 तास झोप घ्यायलाच हवी,ज्यामुळे fat burning hormones सक्रिय होतात.
6. ताण कमी करा:
ताण असला किंवा वाढला की जास्त कॉर्टिसोलची निर्मिती होती,ज्याचे पर्यावसन पोटाची चरबी वाढण्यात होते.
🥗 Visceral Fat कमी करणारा भारतीय आहार:
सकाळी → प्रोटीनयुक्त नाश्ता, दुपार → भाकरी / मल्टीग्रेन + डाळ + भाजी, संध्याकाळ → सुका मेवा + ताक आणि रात्री → हलका आहार + सूप.
✅ Fat Loss Progress कसा मोजावा?
वजन काटा वापरुन
चालणार नाही तर कंबरेचे माप मोजणे, शरीरात ऊर्जा वाढणे, कपडे सैल होणे
शुगर नियंत्रण या गोष्टी दिसून येतात.
✨ समारोप:
वजन कमी करणे हा फिटनेस नाही, चरबी कमी करून स्नायू टिकवणे हाच खरा फिटनेस आहे. विशेषतः:
Visceral fat कमी करणे, हृदय सुरक्षित असणे, शुगर नियंत्रणात असणे. ही असेल तर दीर्घायुष्य मिळणे निश्चित.
आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.
प्रसाद नातु.
(आरोग्य आणि जीवनशैली विषयांवर लेखन करणारे लेखक)
अस्वीकरण: हा लेख केवळ माहितीवर आणि या क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केलेल्या मतांवर आधारित आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.

Comments
Post a Comment