Skip to main content

ऑटोपे ही एक स्वयंचलित पेमेंट सिस्टम

  ब्लॉग नं. 2025/35 4 . दिनांक: 1 8 डिसेंबर, 2025. मित्रांनो, " ऑटोपे ही एक स्वयंचलित पेमेंट सिस्टम आहे, जी कंपन्यांना तुमच्या बँक खात्यातून पैसे काढण्याची, किंवा बिल आणि खर्च भरण्यासाठी,एका निश्चित वेळापत्रकानुसार,तुमच्या क्रेडिट कार्डवर शुल्क आकारण्याची परवानगी देते ," असे गेटश्योरचे आर्थिक सल्लागार आणि सीईओ रिकिन शाह म्हणतात. "हे आवर्ती बिल भरणे अधिक सोयीस्कर बनवण्यासाठी डिझाइन केले आहे." याविषयी आहे आजचा ब्लॉग. सविस्तर:  दरमहा बिल भरणे सुलभ करण्यासाठी,तुमच्या आर्थिक टूलबॉक्समध्ये हे एक उत्तम साधन आहे , परंतु कोणते बिल ऑटोपे करायचे हे ठरवताना,अनेक घटक विचारात घेतले पाहिजेत. सुरुवातीला , जर तुम्हाला खात्री असेल की तुम्ही पूर्ण पैसे देऊ शकता,तरच तुमचे मासिक बिल भरण्यासाठी स्वयंचलित पेमेंट वापरा. "अन्यथा , तुम्ही एक शिल्लक जमा करू शकता,ज्यामुळे तुम्हाला व्याज आकारले जाईल आणि ते तुमच्या बिलांवर लक्ष ठेवण्याच्या तुमच्या प्रयत्नांना कमकुवत करू शकते ," क्रेडिट कर्माच्या कम्युनिकेशन्स आणि ब्रँडच्या माजी उपाध्यक्ष डाना मरीनाउ म्हणतात. "जर तुम्हा...

सिलिकॉन व्हॅली बँक कां कोसळली?

 Blog No. 2023/69      

Date: 19th, March 2023.

 

मित्रांनो,

            बऱ्याच मित्रांकडून अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती की, एखादा ब्लॉग सिलिकॉन व्हॅली बँकेवर लिहावा.कारण मी एक पूर्वाश्रमीचा बँकर आहे आणि बँक ही खरोखर प्रत्येकाच्या जिव्हाळ्याच्या गोष्ट.बँक आपल्या डिपॉजिटना व्यवस्थित सांभाळते. एवढेच नव्हे तर आपल्या आर्थिक गरजा भागवते.विशेषतः स्वतःचे घर ही आधी सेवानिवृत्ती नंतर किंवा मुलांची शिक्षण,लग्न वगैरे आटोपल्यावर साकारायची कल्पना होती.पण आजकाल ते अगदी तिशीत शक्य झाले आहे ते केवळ आणि केवळ बँकांमुळे.


 सिलिकॉन व्हॅली बँकबद्दल जाणून घेऊया

            सिलिकॉन व्हॅली बँक ही अमेरिकेतील 16 व्या क्रमांकाची मोठी व्यावसायिक बँक होती. तिची स्थापना 1983 ची. भारतातील सरकारी बँकांच्या मानाने ही तरुण बँक. ही एक व्हेंचर कॅपिटल बँक होती.स्टार्ट अप, नवोदित कंपन्या आणि उभरत्या कंपन्या यांची खाती ह्या बँकेत होती आणि या उद्योगांना भांडवलाचे पाठबळ देखिल ही बँक पुरवीत असे. कॅनडा, चीन, डेन्मार्क, जर्मनी, आयर्लंड, इस्रायल, स्वीडन आणि ब्रिटन मध्ये देखिल या बँकेचा विस्तार झालेला होता. अलीकडच्या काळातील तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झालेल्या भरघोस वाढीमुळे एसवीबीला खूप फायदा झाला होता.त्यातच कोविड 19 च्या काळात डिजिटल सेवांची मागणी वाढली आणि व्याजाचा खर्च कमी झाल्याने या क्षेत्रात चांगली तेजी आली होती.                       

            बँकेची मालमत्ता (Asset) ज्यामध्ये बँकेने दिलेल्या कर्जाचा समावेश होतो. त्यात 2019 च्या तुलनेत तिप्पट वाढ झाली. बँकेच्या मालमत्ता $71 अब्ज पासून तिप्पट वाढून मार्च 2022 च्या अखेरीस $220 अब्जवर पोहोचल्या.हजारो टेक स्टार्टअप्सनी त्यांची कॅश बँकेकडे आणून ठेवल्यामुळे त्या कालावधीत ठेवी $62 अब्ज वरून $198 अब्ज झाल्या. हे सर्व व्यवस्थित सुरू असतांना अचानक काय झाले की ही बँक कोसळली.

 

सिलिकॉन व्हॅली बँक कां कोसळली

            याचा मागोवा घेतला असता,ह्याचा रोख हा त्या कालावधीकडे जातो, जेव्हा अमेरिकेत 0% व्याज दराचा जमाना होता.या काळात सिलिकॉन व्हॅली बँकेने अब्जावधी रक्कम ही सरकारी रोख्यात जमा केली.फेडरल रिझर्व्हने जी अमेरिकेतील मध्यवर्ती बँक आहे,आपल्या रिजर्व बँकेसारखी,तिने महागाईला आळा घालण्यासाठी व्याज दरात वाढ केली. फेडरल रिझर्व्हने व्याज दरात वाढ केल्याने बॉन्डच्या किमती कोसळल्याने सिलिकॉन व्हॅली बँकेच्या बॉन्ड ह्या संवर्गातील निवेशाचे मूल्य कोसळले. या मध्येच स्टार्ट कंपनीला मिळणारे कर्जही महागले. त्यामुळे त्या कंपन्यानी इतर बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ठेवी काढून घेण्यासाठी बँकेकडे धांव घेतली.बँकेच्या मालमत्ता,बॉन्डच्या कोसळलेल्या मूल्यामुळे कमी झालेल्या, मोठ्या प्रमाणात ठेवी काढून घेण्याचा ताण बँक सहन करु न शकल्याने सिलिकॉन व्हॅली बँक कोसळली.

 

बँकेवर धाव कशामुळे झाली?

मी आधीच लिहिल्याप्रमाणे एसव्हीबीच्या समस्यांचे मूळ हे बँकेने पूर्वी केलेल्या गुंतवणूकीत होते. बुधवारी बँकेवर धावपळ सुरू झाली जेव्हा बँकेने जाहीर केले की तिने तोट्यात रोखे विकले आहेत.त्यामुळे मोठ्या प्रमाणात पैसे काढणाऱ्या ग्राहकांमध्ये घबराट पसरली. बँकेचा शेअर गुरुवारी 60% घसरला.

बँकेच्या ठेवीदारांचे भवितव्य काय?

            अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी हे घोषित केले आहे. सर्व ठेवीदारांना त्यांचे पूर्ण पैसे परत मिळतील.खरे तर अमेरिकेसारख्या भांडवलशाही देशात हा असा निर्णय सरकारने घेतल्याने मला थोडे आश्चर्य वाटले. कारण तिथे सगळे काही अर्थव्यवस्था निश्चित करते असे गृहीतक असल्या सारखे असते.पण आता ही कुजबूज ऐकू येते आहे की ते मोठे ठेवीदार असल्याने त्यांचे हित सरकार जोपासण्याचा प्रयत्न करीत आहे.जी ओरड ऐकण्याची आम्हा भारतीयांना सवय झाली आहे.त्यामुळे या आरोपात काही नविन वाटले नाही.

 

सारांश

            सिलिकॉन व्हॅली बँक कोसळली.त्यानंतर सिग्नेचर बँक देखिल त्याच मार्गाने गेली.अदानीसारखे मानव निर्मित संकट येऊन देखिल भारतावर विशेष परिणाम झाला नाही.ह्याचे श्रेय रिजर्व बँक ऑफ इंडियाला आहे हे रिजर्व बँक ऑफ इंडियाला उठसूट शिव्या घालणाऱ्यांनी आणि बोटे मोडणाऱ्यांनी लक्षात घ्यावे.एवढेच ह्या निमित्ताने सांगावेसे वाटते.

 

 

प्रसाद नातु,पुणे.         

Comments

  1. साध्या आणि सोप्या भाषेत चांगली माहिती 💐💐

    ReplyDelete
  2. छान समजावून सांगितलं सर 👌👌

    ReplyDelete
  3. छान माहितीपूर्ण लेख.

    ReplyDelete
  4. Excellent write up. In short you have explained the 2 USA bank collaps position.
    At the same time you also appreciated our RBI measures in strengthening the Indian Economy.
    Great Study and collection of information.
    ALL THE BEST.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...