Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

आत्मचिंतन करा आणि स्वतःस ओळखा

Blog No. 2023/61      

Date: 10th, March 2023.



मित्रांनो,

               आज कविवर्य मंगेश पाडगांवकर सरांची जयंती. त्यामुळे तुम्हाला नक्कीच वाटले असणार की,आजचा ब्लॉग निश्चितपणे कविवर्य मंगेश पाडगांवकर सरांवर असणार. नाही मित्रांनो, आज तुम्ही विविध माध्यमांवर दिवसभर त्यांच्या विषयी खूप वाचणार आणि ऐकणार देखिल.माझा प्रयत्न नेहमीच वाचकांना म्हणा रसिकांना कही हटके द्यावे हा असल्याने मी आज पाडगांवकर सरांवर नाही लिहिणार. 


               पण त्यांची एक कविता ही एक भावगीत देखिल आहे. "या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे" हे माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक त्याचा संदर्भ मी येथे घेणार आहे. नाही, रसग्रहण देखिल नाही करणार. जीवनाचा खरोखर आनंद घ्यावयाचा असेल तर, या जन्मावर आणि या जगण्यावर प्रेम करणे आवश्यक आहे आणि ते आपण करीत देखिल असतोच.      


प्रास्ताविक

                माणूस हा समाजशील प्राणी असल्याने त्याला समाजात वावरायला म्हणा रमायला आवडते. तसेच तो कुटुंबवत्सल देखिल आहे. घरातील वडील किंवा बाबा आणि आई ह्यांचेवर बरेच काही वाचायला मिळतं. कारण बाबा किंवा आई हे स्वतःच्या सुखाचा विचार न करता आपल्या मुलांना आपल्याला काय सर्वोत्तम देता येईल ह्याचा, आपल्या आपल्या परिस्थितीनुसार नेहमीच प्रयत्न करीत असतात.त्यात जबाबदारी पडली तर आई वडिलांचा आणि भावंडांचा विचार करीत असतात. पण हे सारे करण्याच्या प्रयत्नात, विचारात,आनंदात ती व्यक्ति स्वतःला हरवून बसते. स्वतःला काय हवे आहे,काय करायचे होते हे विसरून जाते. मग स्वतःबद्दल चार ओळी लिहा म्हटलं तर लिहू शकत नाही. माझ्या वयाच्या लोकांच्या बाबतीत म्हणायचे झाले तर बरेचसे पाणी पुलाखालून वाहून गेले.पण जे आता तरुण आहेत किंवा जे 40 ते 50 ह्या वयोगटातील आहेत,त्यांनी थोडे स्वतःकडे लक्ष देणे आवश्यक आहे. 




स्वतःकडे लक्ष देणे म्हणजे नेमके काय?

1. स्वतः बद्दल जाणून घ्या :- मला जीवनात काय हवे आहे, जीवनाचे माझं काय उद्दिष्ट आहे? मला स्वतःला काय आवडतं? मला काय करावसं वाटतं? मला काय केल्याने आनंद मिळतो. त्या गोष्टींचा शोध घ्या. 


2. वर सांगितल्याप्रमाणे केले तर कधी कधी लोक तुम्हाला स्वार्थी म्हणू शकतात पण हा स्वार्थीपणा अजिबात नाही.हा आत्मशोधनाचा म्हणा/आत्मचिंतनाचा एक प्रकार आहे. जो तुमचे जीवन समृद्ध करण्यास उपकारक ठरतो. 


3. स्वतःच्या शरीरावर प्रेम करा. सर्वांचे सारे काही करण्याच्या प्रयत्नात,विशेषतः महिला वर्ग,स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते.असे होऊ देऊ नका. तुम्हाला आवश्यक आणि झेपेल तेवढा व्यायाम करा. व्यायामाला सुरुवात करतांना आधी थोडा मग हळूहळू वाढवत न्या. आजकाल व्यायाम करतांना देखिल मृत्यु आल्याचे वाचायला मिळते. दिवसातील एक तास स्वतःसाठी द्या. 


4. वाचन केल्याने वेळ तर चांगला जातोच पण वाचनाने मन निरोगी राखण्यास/राहण्यास मदत होते. तुम्हाला जे आवडते ते वाचा. (सोशल मीडिया वरुन येणारे फॉरवर्ड मेसेज सोडून)


5. ध्यानधारणा करणे ही तितकेच आवश्यक आहे. ध्यानधारणा अर्थात मेडीटेशन केल्याने नकारात्मक विचारांचा नाश होण्यास मदत होते तसेच शरीर आणि मनास नविन ऊर्जा मिळून,नव्या उत्साहाने कार्य सुरू करता येते. त्या सोबत तुमच्या चिंता,यातना दूर होण्यास मदत होईल. 


6. असे म्हणतात की सर्व सुखाचा मार्ग पोटातून जातो. म्हणून आठवड्यातून एकदा आपल्या आहारात आपल्या आवडीच्या पदार्थाचा समावेश करा.आज काल डॉक्टर्स ही कबूल करायला लागलेत की पोट स्वस्थ तर शरीर स्वस्थ. 


7. इतरांशी तुलना करु नका. कारण हयातून कदाचित नैराश्य येण्याची शक्यता असते.विशेषतः जीवनातील उद्दिष्टाच्या बाबतीत स्वतःशी तुलना करा. मी मागील वर्षी कुठे होतो. अन आज कुठे आहे. त्याच वेळी दुसरे काय म्हणतात किंवा काय म्हणतील ह्याची काळजी करण्यापेक्षा त्यातून शिकण्याजोगे आत्मसात करा आणि बाकीच्या कडे दुर्लक्ष करा. जास्त बोलण्यापेक्षा जास्त ऐकणे शिका. जास्त बोलण्याने कधी कधी आपल्यातील उणिवा दुसऱ्यांपर्यंत विनासायास पोहोचतात.    


8. सकारात्मक रहा आणि मुख्य म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. म्हणजे सारे सोपे होईल. 


9. आवश्यक तेवढी झोप घ्या. हे यासाठी लिहितो आहे की कुणी जागे आहे म्हणून आपण कंपनी देण्यासाठी जागे राहू नका. तुम्हाला जेवढी झोप आवश्यक वाटते तेवढी घ्या.कारण त्यामुळे शारीरिक स्वास्थ आणि मानसिक आरोग्य लाभते. 


10. संगीत म्हणजे गाणं किंवा शास्त्रीय संगीत किंवा तुम्हाला जे आनंद देते ते ऐका,येत असेल तर म्हणा. आपल्याला माहित असतं की आपण लता दीदी किंवा किशोरकुमार नाही म्हणून आपण म्हणायचे नाही असे नाही. Music is a great tension releaser असे म्हणतात ते खोटे नाही.     


तात्पर्य 

            शेवटी हेच म्हणेन की यातील बऱ्याच गोष्टी आयुष्यात करण्याचा मी स्वतः प्रयत्न केला जरी 100% केल्या नसतील किंवा ज्या केल्यात त्यात 100% यश मिळाले असेल असे देखिल नाही.पण म्हणून प्रयत्न सोडलेला नाही आणि ज्या गोष्टी जमल्या नाही त्या आता बघतोय. 

                आज कविवर्य मंगेश पाडगांवकर यांच्या जयंती निमित्त त्यांना माझी विनम्र श्रद्धांजली.त्यांच्या असंख्य कवितांच्या रुपाने ते अजूनही आपल्यात आहेत आणि राहतील.    



  प्रसाद नातू ,पुणे       

                                                           


Comments

  1. Sir, tumhi khoop chan lihita. Short and sweet. Today's blog is really useful for the younger generation. 👍

    ReplyDelete
  2. छान उदबोधक ब्लॉग 👍🙏
    : रा.रा. जोशी

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...