Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

उत्पल दत्त प्रतिभाशाली अभिनेता

 Blog No. 2023/76     

Date: 29, March 2023

 

मित्रांनो,

            आठवतोय तो “गोलमाल” चित्रपटातील ‘भवानी शंकर’ अमोल पालेकर चा बॉस किंवा “रंगबिरंगी” मधील इंस्पेक्टर धुरंधर भाटवडेकर.नक्कीच आठवत असणार. वैशिष्ठपूर्ण शब्दफेक, आवाजातील चढउतार या जोरावर विनोदी आणि तितक्याच जबरदस्त केलेल्या खलनायकाच्या भूमिका.उत्पल दत्त ह्या बंगाली रंगभूमीच्या कलावंताने हिन्दी पडद्यावर सहजतेने भूमिका केल्या.

प्रास्ताविक

            आज उत्पल दत्त यांची जयंती.29 मार्च, 1929 मध्ये बारीसाल येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील गिरिजरंजन दत्ता. त्यांनी सेंट झेवियर्स कॉलेज, कलकत्ता येथून महाविद्यालयीन शिक्षण घेतले.कलकत्ता विद्यापीठातून इंग्रजी साहित्य ऑनर्ससह पदवी प्राप्त केली. ते एक भारतीय अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक-नाटककार होते.सुरुवातीला त्यांनी बंगाली थिएटरमधे काम केले. आपल्या 40 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी 100 हून  अधिक बंगाली आणि हिन्दी चित्रपटातून काम केले. अनेकांना या गोष्टीची कल्पना देखिल की अमिताभ बच्चन यांच्या सोबत “सात हिंदुस्तानी” मध्ये त्यांनी मुख्य नायकाची भूमिका केली होती. उत्पल दत्त हे आजीवन मार्क्सवादी आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) चे सक्रिय समर्थक देखील होते.

1960 मध्ये, दत्त यांनी रंगभूमी आणि चित्रपट अभिनेत्री शोभा सेन यांच्याशी विवाह केला. त्यांची एकुलती एक मुलगी, बिष्णुप्रिया दत्त, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली येथील स्कूल ऑफ आर्ट्स अँड एस्थेटिक्समध्ये थिएटर आणि परफॉर्मन्स स्टडीजची प्राध्यापक होती. 

त्यांचे गाजलेले चित्रपट

1.       भुवन शोम          1969

2.       गुड्डी                1971   

3.       मेरे जीवन साथी   1972

4.       सबसे बडा रुपैय्या 1972

5.       अमानुष             1975

6.       जुली                 1975

7.       दो अंजाने           1976

8.       संतान                1976

9.       ईमान धरम          1977

10.  आनंद आश्रम     1977

11.  अनुरोध              1977

12.  दुल्हन वही जो पिया मन भाये 1977

13.  प्रियतमा             1977

14.  स्वामी                1977

15.  कर्तव्य               1979

16.  गोलमाल            1979

17.  द ग्रेट गैम्बलर     1980

18.  राम बलराम        1980

19.  नरम गरम           1981

20.  बरसात की एक रात 1981

21.  शौकीन              1981

22.  रास्ते प्यार के       1982

23.  हमारी बहू अलका 1982

24.  अंगूर                 1982

25.  रंग बिरंगी           1983

26.  ईन्कलाब            1984

27.  साहेब                1985

पुरस्कार आणि सन्मान

1970 भुवन शोम सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

1980  गोलमाल फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट कॉमेडियन पुरस्कार

1982 नरम गरम फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट कॉमेडियन पुरस्कार

1984 रंग बिरंगी फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट कॉमेडियन पुरस्कार

1990 संगीत नाटक अकादमी फेलोशिप रंगभूमीवरील आजीवन योगदानासाठी

मृत्यु

            19 ऑगस्ट 1993 रोजी, उत्पल दत्त यांचे  एसएसकेएम हॉस्पिटल, कलकत्ता, पश्चिम बंगाल येथून घरी परतल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

या प्रतिभाशाली अभिनेत्याला त्याच्या 94 व्या जयंतीदिनी आदरांजली.

फोटो सौजन्य @ विकिपीडिया  

प्रसाद नातु,पुणे  

Comments

  1. गोलमाल मधील अभिनय अविस्मरणीय

    ReplyDelete
  2. उत्पल दत्त--एक उत्कृष्ट अभिनेता ,अभिनयाची उत्तम जाण होती.त्यांच्या अनेक भूमिका अविस्मरणीय आहेत.छान ब्लाॅग. -----भावना नातु.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...