Skip to main content

ताटात भात आणि पोळी दोन्ही एकत्र असावे की नाही? 2106

  ब्लॉग नं. 2026/1 72.   दिनांक: 21 जून, 2026.   मित्रांनो, आपल्यापैकी बहुतेकांच्या घरात,रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणात एक चर्चा नेहमी रंगते, " मधुमेह ( Diabetes) असेल , तर ताटात भात आणि पोळी दोन्ही एकत्र असावे की नाही ?" आपल्या समाजात हा समज इतका घट्ट रूढ झाला आहे की , रक्तातील साखर वाढण्याच्या भीतीने,अनेक रुग्ण नाईलाजाने या दोन मुख्य पदार्थांपैकी एकाचीच निवड करतात. पण खरंच हा नियम वैद्यकीयदृष्ट्या योग्य आहे का ? चला , आजच्या ब्लॉगमध्ये,आपण यामागील वैज्ञानिक सत्य आणि योग्य पद्धत सविस्तरपणे जाणून घेऊया. सविस्तर: 🛑 समज की गैरसमज ? काय म्हणतात तज्ज्ञ ? ' जीव्हीके हेल्थकेअर ' चे वैद्यकीय संचालक आणि वरिष्ठ मधुमेह तज्ज्ञ डॉ. एन. जी. शास्त्री यांच्या मते , भात आणि पोळी यांचे एकत्र सेवन करणे ही अजिबात समस्या नाही. हा एक मोठा गैरसमज आहे. डॉ. शास्त्री म्हणतात: " भात आणि पोळी हे दोन्ही कर्बोदकांचे ( Carbohydrates) स्रोत आहेत.जेव्हा आपण ते खातो , तेव्हा शरीर ऊर्जेसाठी त्यांचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करते.खरी समस्या या दोन पदार्थांच्या संयोजनात ( Combinat...

आवश्यक झोप महत्वाची - Sufficient Sleep Required

Blog No. 2023/68     

Date: 17th, March 2023. 


मित्रांनो,

            तुम्हाला माहित आहे कां? जपान नंतर भारत हा जगातला दूसरा आवश्यक तेवढी झोप न घेणाऱ्यांचा देश आहे किंवा ज्यांची झोप उडाली आहे? अशा लोकांच्या देशामध्ये भारताचा जपान नंतर दूसरा नंबर लागतो. पुरेशी झोप न घेतल्याने फक्त थकवा जाणवतो एवढेच नसून पुरेशी झोप ही आपली दैनंदिन गरज आहे.जी आपल्या जीवनातील सुखाशी निगडीत आहे. निरोगी रहाण्यापासून ते दिवसभर कार्यक्षम राहण्यासाठी रात्रीची चांगली झोप घेणे आवश्यक आहे असे प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. हरिष शेट्टी,हिरानंदानी हॉस्पिटल,मुंबई यांचे म्हणणे आहे.थकवा,डोकेदुखी,मन:स्थिती चांगली नसणे ह्या साऱ्याच गोष्टी चांगली झोप न घेण्याशी निगडीत आहेत. चांगली झोप आपले मेंदूचे कार्य कार्यक्षमपणे सुरू ठेवण्यास सहाय्यभूत ठरते.  

तुमची झोप आवश्यक तेवढी होत नाही हे कसे ओळखावे?

डॉ. जॉय देसाई, एमबीबीएस, एमडी - जनरल मेडिसिन, डीएनबी - न्यूरोलॉजी - न्यूरोलॉजिस्ट, जसलोक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, सांगतात की तुम्ही जर वारंवार आजारी पडत असाल तर त्याचा थेट संबंध तुमच्या झोपेशी आहे. पुरेशी झोप घेतल्याने रोगाशी लढा देणाऱ्या अँटीबॉडीज कमी तयार होऊ शकतात, त्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती कमी होते. त्यांच्या म्हणण्यानुसार छोट्या छोट्या गोष्टीवरून अस्वस्थ वाटत रहाणे,सतत थकवा जाणवणे, एकाग्रता कमी होणे ही सर्व आवश्यक तेवढी झोप न झाल्याची लक्षणे आहेत.     

आवश्यक तेवढी झोप घेण्यासाठी काय करावे.  

डॉ. जितेंद्र वार्ष्णेय, Wellness Director, सिक्स सेन्सेस वाना यांनी आवश्यक तेवढी झोप घेण्यासाठी काय करावे हे सुचविले आहे.

1. आपल्या झोपेचे वेळापत्रक ठरवा आणि ते पाळा.यात झोपायची वेळ आणि सकाळी जागे होण्याची वेळ,ह्या वेळा ठरवून ठेवा आणि पाळा. त्यामुळे काही दिवसात तुम्हाला ठराविक वेळेला झोप येईलच.

2. दुपारी 2:00 नंतर कॅफिनयुक्त पदार्थांचे सेवन टाळा.तसे केल्यास तुमची झोपेची वेळ आणि गुणवत्ता अर्थात चांगली झोप,हे दोन्ही साध्य होईल.

3. तुम्ही जर अल्कोहोलचे सेवन करीत असाल तर झोपण्याच्या 3 तास आधच घेणे बंद करा.    

4. दररोज कुठला ना कुठला व्यायाम करा.पण झोपण्याच्या आधी कुठलाही व्यायाम करु नका.

5. दररोज सकाळी 15 मिनिटे सूर्यप्रकाश मिळवा. हे तुमचे सर्कॅडियन घड्याळ (24 तासाचे अंतर्गत घडयाळ,जे तुमच्या मेंदूत असते) ठीक ठेवण्यास मदत करेल आणि आवश्यक तेवढी झोप मिळेल.

आणि सर्वात आणि सगळ्यात महत्वाचे रात्रीच्या वेळी डिजिटल उपकरणांचा वापर टाळा. फक्त 2 तासांच्या डिजिटल उपकरणांच्या वापरात 40% एवढे मेलाटोनिनचे उत्पादन 40% पर्यंत कमी होऊ शकते, ज्यामुळे झोप लागणे कठीण होते.

शेवटी, पुदिन्याची पाने आणि ओवा गरम केलेल्या पाण्याचा वाफारा घेतल्यास चांगली झोप येण्यास मदत होते.

आज जागतिक निद्रा दिवसाच्या निमित्ताने हा दूसरा ब्लॉग लिहिला आहे. आपल्याला सगळ्यांना जागतिक निद्रा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. कुठल्याही प्रकारचा उपाय करावा न लागता तुम्हा सगळ्यांना आवश्यक तेवढ्या झोपेचे सुख लाभो. हीच शुभेच्छा देतो आणि आजचा ब्लॉग संपवितो.     


प्रसाद नातु,पुणे 

सौजन्य :- कल्पना शर्मा, टाइम्स ऑफ इंडिया,17-03-2023. 

 

Comments

  1. Waa. Kya bat hai. Bloug dware lokanchya health chi dekhil kalji ghetay Sir. 👍

    ReplyDelete

Post a Comment