Skip to main content

टरबूज खरेदीच्या खास टिप्स

  ब्लॉग नं. 2026/ 081. दिनांक: 22 मार्च , 2026.   मित्रांनो, उन्हाळ्याची गोड मेजवानी: टरबूज खरेदीच्या खास टिप्स आणि बालपणीच्या आठवणी! मार्च महिना संपत आला की,उन्हाचा तडाखा वाढू लागतो आणि या उन्हाळ्यात मनाला अन् शरीराला थंडावा देणारे,एकच फळ डोळ्यासमोर येते , ते म्हणजे ' टरबूज ' . रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांच्या गाड्यांवरील,त्या लालभडक टरबूजाच्या फोडी पाहिल्या की , उन्हाची तमा न बाळगता पाय आपोआप तिकडे वळतात.टरबूज निवडावे कसे याबद्दल जाणून घेऊ, आजच्या ब्लॉगमध्ये.   आठवणींचा गारवा : बऱ्याच जणांसाठी टरबूज हे केवळ एक फळ नसून ते आठवणींचे प्रतीक आहे. बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या , दुपारच्या वेळी अंगणात सगळ्या भावंडांसोबत आणि कुटुंबासोबत बसून टरबूजाच्या फोडींवर मारलेला ताव... तो हास्यकल्लोळ आणि साधा आनंद आजही मनाला उभारी देतो. टरबूज खाणे ही केवळ तहान भागवण्याची प्रक्रिया नसून , तो एक कौटुंबिक सोहळा असतो. परफेक्ट आणि गोड टरबूज कसे ओळखावे ? बाजारात गेल्यावर ' लाल आणि गोड ' टरबूज निवडणे हे एक मोठे कसब आहे. पण काळजी करू नका , पुढील काही सोप्या गोष्टी लक्षा...

लिथियम आणि भारत

Blog No. 2023/39    

Date: 16th, February 2023.






मित्रांनो,

            सिनेमा, साहित्य इत्यादि विषयापासून आज जरा तुम्हाला दूर घेऊन जातो आहे.नुकतीच एक बातमी झळकली.तुम्हा सर्वांच्या नजरेतून ही बातमी नक्की सुटली नसणार आणि ती म्हणजे जम्मू आणि काश्मीर मधे लिथियमचे साठे सापडले. कदाचित तुम्हीच काय मी देखिल कर्नाटकात 1600 टन लिथियमचे साठे मिळाल्याचे वाचले नसेल.कारण लिथियमचे आज जितके महत्व वाटते किंवा वाढले आहे,ते तेव्हा नव्हते. काय आहे एवढे लिथियमचे महत्व वाचूया आजच्या ब्लॉग मधे.

लिथियमचा उपयोग

        आपण जेव्हा पारंपरिक इंधनाचा वापर करतो तेव्हा,कार्बन-डाय-ऑक्साइड आणि मिथेन सारखे हानिकारक वायु वातावरणात सोडत असतो.ज्याला उत्सर्जन असेही म्हटले जाते.जर हे वायूचे उत्सर्जन टाळायचे असेल तर आपल्याला या इंधनांचा जसे पेट्रोल, डिझेल इत्यादि इंधनाचा त्याग करावा लागेल.सध्या पूर्ण त्याग करणे शक्य नसले तरी वापर कमी करण्यासाठी आपण निश्चितच प्रयत्न करु शकतो.त्यासाठी आपल्याला अन्य  पर्यायांकडे वळणे आवश्यक आहे.जसे इ
लेक्ट्रिक कारचा वापर वाढविणे.सौर आणि पवन उर्जेचा वापर वाढविणे आणि इथेच संबंध येतो लिथियमचा. सौर ऊर्जा किंवा पवन ऊर्जा आपल्याला साठवून ठेवायची असेल तर ,त्यासाठी लागेल लिथियम आयन बॅटरी ज्यासाठी लागते लिथियम..

 लिथियम आयन बॅटरी विषयी माहिती

          लिथियम हा जगातील सर्वात हलका (वजनाने) धातू आहे. सामान्य लीड आयन बॅटरी पेक्षा ह्या लिथियम आयन बॅटरीचे वजन कमी असल्याने कारचे वजन वाढत नाही.बॅटरीचे वजन कमी असले की कारच्या वजनात फरक पडतं नाही.साधारणतः वजनाचा कारच्या वेगावर परिणाम होतोच पण mileage वर देखिल होतो. त्यामुळे वाहनांचे वजन कमी ठेवण्याकडे निर्मात्याचा कल असतो.सामान्य लीड आयन बॅटरी पेक्षा लिथियम आयन बॅटरीची ऊर्जा साठवून ठेवण्याची क्षमता अधिक असते.सामान्य लीड आयन बॅटरी प्रति किलो फक्त 25 वॅटतास इतकी ऊर्जा साठवते तर लिथियम आयन बॅटरीची ऊर्जा साठवून ठेवण्याची क्षमता 1500 वॅटतास इतकी आहे. शून्य उत्सर्जन हे लक्ष सध्या करायचे असेल तर मोठ्या प्रमाणात  लिथियम लागणार.जम्मू आणि काश्मीरमधे 5.9 दशलक्ष टन एवढे लिथियमचे साठे सापडले आहेत.ज्यामुळे आपण पर्यायी इंधन निर्माणामधे क्रांती करू शकतो.आता सध्या लिथियम आयात करतो,त्या पायी मोजावे लागणारे परकीय चलन वाचवू शकतो.

 If and Buts                                       

            पण प्रत्येक गोष्टीला जसे किंतु परंतु असतात तसे यांस देखिल आहेत. ते एक एक करून बघूया.

1.       5.9 दशलक्ष टन एवढे लिथियमचे साठे सापडले आहेत,पण हा प्राथमिक अंदाज आहे.जरी शास्त्रज्ञ ठेवी किती पप्रमाणात आहेत या बद्दल ठाम आहेत. पण त्याचा दर्जा काय ह्याची अजून कल्पना नाही.त्यावर प्रक्रिया करायचा खरच किती लागेल हे त्या लिथियमच्या दर्जावर अवलंबून आहे.

2.       लिथियम प्राप्त करण्याची प्रक्रिया ही किचकट आहे.ते धुण्यासाठी पाणी खूप लागते.1 टन लिथियम तयार करण्यासाठी 2000 टन पणी लागते. ह्याचा परिणाम भूजल पातळीवर होतो.

3.       जम्मू आणि काश्मीरची भौगोलिक परिस्थिति लक्षात घेता खनिज कार्य करणे जरा जिकिरीचे आहे.

4.       अर्थात प्रदूषण मुक्त हिरव्या जगात जाण्यासाठी भारत लिथियमच्या साठयामुळे निश्चितच फार मोठी झेप घेऊ शकेल असा विश्वास ठेऊ या आणि तसे झाले तर भारत लिथियमच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईलच पण लिथियमची निर्यात देखिल करु शकेल.

ssसारांश 

        लिथियमच्या ह्या साठयामुळे भारत एक महासत्ता बनू शकेल असे देखिल लोक बोलू लागले आहेत.आणि कां नाही होणार भारतात महासत्ता बनण्याची क्षमता निश्चित आहे. क्रूड ऑइलच्या आयातीसाठी लागणारे परकीय चलन आपण जर अन्य उत्पादक कार्यासाठी वापरता आले. तर गरीबी दूर करण्यास सहाय्यकारक होईल.भारत महासत्ता झाल्याचा फायदा 140 कोटी जनतेस झाला तर खऱ्या अर्थाने भारत महासत्ता झाला असे म्हणता येईल.  

 

प्रसाद नातु,पुणे                  

Comments

  1. खूप छान माहिती..लिथियमचा वापर इव्हेईकलच्या बॅटरीत करावा लागतो व नुकताच काश्मीरमध्ये साठ्यांचा शोध लागला आहे त्यामुळे ही माहिती खूप उपयुक्त आहे 👌👌👌

    ReplyDelete
  2. छान माहिती🙏

    ReplyDelete
  3. नवीन विषयावरची अभ्यासपूर्ण माहिती. सहजसोप्या लेखनशैलीत.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद, तुमच्या सारख्यांचे प्रोत्साहन हे सर्व करण्याची प्रेरणा देते.

      Delete
  4. मीनल ओगले.नातू सर,तुम्ही फारच वेगवेगळ्या पण महत्वपूर्ण माहिती लोकांसमोर आणत आहात.अभिनंदन.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे

ब्लॉग नं: 2025/2 22 . दिनांक: 10 ऑगस्ट , 2025. मित्रांनो, : 🌿 रात्री झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाण्याचे 6 अद्भुत फायदे: भारतीय स्वयंपाकघरात वेलदोडा किंवा वेलची (इलायची) ही एक सुगंधी आणि मौल्यवान मसाला म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वेळा आपण ती फक्त चहा , मिष्टान्न किंवा बिर्याणीमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतो. मात्र , वेलचीची खरी ताकद तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांमध्ये दडलेली आहे. विशेषतः जर ती रात्री झोपण्यापूर्वी खाल्ली तर.प्राचीन आयुर्वेदात वेलचीला एक शक्तिशाली , त्रिदोषनाशक आणि आरामदायक औषध मानले गेले आहे. फक्त एक शेंग चावून खाल्ल्याने शरीर आणि मन दोघांवरही सकारात्मक परिणाम होतो. चला तर मग पाहूया , रोज रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाण्याचे 6 प्रमुख फायदे: 🥇 1 . पचन सुधारते आणि गॅसचा त्रास कमी करते: झोपण्यापूर्वी वेलदोडा किंवा वेलची खाल्ल्याने,पाचक एंजाइमचे स्राव वाढतात , जे झोपेत असतानाही अन्न पचवण्यास मदत करतात.अ‍ॅसिडिटी , पोटफुगी किंवा गॅसचा त्रास असल्यास,वेलदोडा चावल्याने लगेचच आराम मिळतो.तिचे अँटीस्पास्मोडिक गुणधर्म पोटाचे स्नायू शांत करतात,आणि वायू कमी करतात.नियमित व...