Skip to main content

'या' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर

ब्लॉग नं. 2026/1 71.   दिनांक: 20 जून, 2026. मित्रांनो, संध्याकाळी 5 नंतरच्या ' या ' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर दिवस मावळत असताना , आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं , तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते , संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता , त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर ( Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ.    सविस्तर: ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या एका अहवालानुसार , आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते , तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी , रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो. आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या ...

मुलताई,सूर्यपुत्री ताप्तीचे उगमस्थान

Blog No.2023/004

Date:- 9th, January 2023.  


मित्रांनो,

            विदर्भात फेरफटका करीत असतांना,अचानक मध्य प्रदेशात जाण्याचा योग आला.निमित्त होतं माझ्या व्याह्यांचे मुळगावं मूलताई पाहायला चला,असा व्याह्यांचा आग्रह. मुलताई नागपूरपासून 128 किमी अंतरावर आहे. नागपुरातून नागपूर सावनेर मार्गाने पुढे निघायचे. मी आधीच्या माझ्या ब्लॉगमधे लिहिल्याप्रमाणे रस्ता सुरेख होता. साधारणतः गूगल मॅप प्रमाणे 2-2.30 तास लागणार होते. आम्ही 11.15 ला नागपूरहून निघालो.नागपूरला विधानमंडळाचे अधिवेशनाचा शेवटचा दिवस,त्यामुळे मोर्चे वगैरे नव्हते.पण मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त दिसून आला. लोकशाहीची व्याख्या “Government of the people, by the people, for the people असे म्हटले जाते.त्या निवडून आलेल्या लोकांना,ज्यांनी निवडून दिलं,त्यांच्या पासून संरक्षण,काही वेळा हे सारे विडंबन वाटते. पण हे वास्तव आहे आणि हे ज्याचे त्यांनीच ओढवून घेतले आहे. त्याला इलाज काय.

 पाटणसावंगीचे प्राचीन हनुमान मंदिर


            तर मुलताईच्या दिशेने निघालो. रस्त्यात पाटणसावंगी जवळ प्राचीन हनुमानाचे मंदिर आहे असे सांगितले, म्हणून तिथे थांबलो.मंदिराचा जीर्णोद्धार प्रगती पथावर होता.हनुमानाची जरा वेगळीच मूर्ती बघावयास मिळाली. प्रशस्त मंदिर आणि त्या मंदिरासमोर भलेमोठे पटांगण.तिथे कुणी बाबा असतात असे कळले.पण ते तिथे नव्हते.पटांगणात वड,पिंपळ आणि लिंबोणीची मोठमोठाली झाडे परिसराची शोभा वाढवतात.तिथे बाबांची कुटी दिसली.हनुमानाचे दर्शन घेऊन पुढे प्रस्तान केले. 


मुलताईच्या दिशेने प्रवास

            सावनेर बायपास करून पुढे निघालो.महाराष्ट्राची सीमा ओलांडून मध्य प्रदेशात प्रवेश केला.आतापर्यंत मराठीत दिसणारे दुकानांवरचे नामपट्ट, कि.मी.चे दगड मराठी ऐवजी हिंदी दिसू लागले. पांढुरणा बायपास करून पुढे जातांना महाराष्ट्र कापूस एकाधिकार योजनेची आठवण येऊन गेली. फेडरेशनच्या भावापेक्षा कधी कधी मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशात (अर्थातच तेव्हाच्या) जास्त भाव असे. अशा वेळी कापसाच्या गाड्या (बैलगाड्या) ,ट्रॅक्टर आणि ट्रक भरून रात्री मध्य प्रदेशातील पांढुरणा आणि आंध्र प्रदेशातील आदिलाबागकडे निघत त्याची आठवण येऊन गेली.पांढुरणा गेल्यानंतर मुलताईचे कि.मी.चे बोर्ड दिसू लागले.मुलताई समुद्र सपाटी पासून 750 मिटर उंचावर असल्याने थोडा गारवा जाणवत होता.पण त्या वेळेस थोडी थंडी कमी होती. त्यामुळे थंडी प्लेजंट वाटतं होती.

            मुलताई प्रवेश होतो,तो बाजार ओळीतूनच.दोन्ही बाजूला दुकाने मागे सोडत,आम्ही ताप्ती मंदिराच्या जवळ पोहोचलो. तिथे एक मोठा तलाव आहे, “ताप्ती तालाब”  आणि तलावाच्या पश्चिम बाजूस सूर्यपुत्री ताप्तीदेवीचे मंदिर आहे. तेथील उगमातून मग पुढे सात लहानश्या कुंडातून,तापी आपल्या प्रवासाला निघते असे समजले.आपण सगळे तापी नदी म्हणून ओळखत असलेल्या तापीचे खरे नावं ताप्ती असे आहे.ती सूर्यपुत्री आहे.तापी हा ताप्तीचा अपभ्रंश आहे.तापीला आदिगंगा देखिल म्हटले जाते.कारण गंगा किंवा भागीरथी भूलोकावर अवतरण्यापूर्वी तापी अस्तित्वात होती.गंगेच्या भुतलावर अवतरण्यासंबंधीची कहाणी किंवा आख्यायिका आणि तिचा तापीशी संबंध  पुढील भागात.

            माझा हा ब्लॉग आपणांस कसा वाटला. कृपया कमेन्ट बॉक्स मधे लिहा.

 

                                                                                                                        प्रसाद नातु, पुणे.                                     

Comments

  1. छान लिहिलंय सर

    ReplyDelete
  2. खूप छान वर्णन केले आहे.मस्त.

    ReplyDelete
  3. छान लिहिले आहे

    ReplyDelete
  4. खुप सुरेख

    ReplyDelete

Post a Comment