Skip to main content

Posts

Select your Language

Pill Free आरोग्यविषयावरील पुस्तक भाग 2

  ब्लॉग नं. 2026/277.  दिनांक: 6 ऑक्टोबर , 2026.   मित्रांनो , प्रास्ताविक Pill-Free : एका उपयोगी पुस्तकाचा परिचय            काल आपण सार्वजनिक आरोग्यतज्ज्ञ आणि physician डॉ. चंद्रकांत लहरिया यांच्या पुस्तका तील काही मुद्यांचा परिचय करून घेतला. आज त्यापुढील मुद्दे.    सविस्तर            कालच्या भागात आपण डॉ. चंद्रकांत लहरिया यांच्या पुस्तका तील खालील मुद्यांचा परामर्श घेतला.       1 .प्रत्येक abnormal report म्हणजे आजार नसतो ! 2 .‘जास्त तपासण्या = चांगली आरोग्यसेवा’ असे नाही : 3 . Supplements म्हणजे नेहमीच सुरक्षित असे नसते : 4 .औषध सुरू करणे जितके महत्त्वाचे , तितकेच ते कधी कमी किंवा बंद करायचे हेही महत्त्वाचे . 5 . Cholesterol चा report पाहून लगेच निष्कर्ष काढू नका : 6 . Uric acid वाढला म्हणजे लगेच औषध ? आज पूढील मुद्दे समजून घेऊ या.   7 ...

खरंच आपल्याला प्रत्येक गो॓ळीची गरज असते कां?

  ब्लॉग नं. 2026/2 76 .  दिनांक: 5 ऑक्टोबर , 2026.   मित्रांनो , प्रास्ताविक Pill-Free : एका उपयोगी पुस्तकाचा परिचय            आजच्या आधुनिक वैद्यकशास्त्रामुळे लाखो लोकांचे प्राण वाचले आहेत. संसर्गजन्य आजार , हृदयरोग , मधुमेह , उच्च रक्तदाब , कर्करोग अशा अनेक आजारांच्या उपचारांमध्ये औषधांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.मग प्रश्न असा आहे की , औषधे वाईट आहेत का ? नाही! आणि हाच महत्त्वाचा मुद्दा सार्वजनिक आरोग्यतज्ज्ञ आणि physician डॉ. चंद्रकांत लहरिया यांच्या नव्या पुस्तकाचा आहे , “Pill-Free: You Don't Need Everything You Have Been Prescribed.” पुस्तकाचा संदेश “ औषधे घेऊ नका” असा नाही. उलट , योग्य रुग्णाला , योग्य औषध , योग्य वेळी आणि आवश्यक तेवढ्याच कालावधीसाठी देणे हीच चांगल्या वैद्यकीय उपचारांची भूमिका आहे , असा त्यांचा दृष्टिकोन आहे. सविस्तर ‘Pill-Free’ म्हणजे नेमके काय ? ‘Pill-Free’ हा शब्द वाचला की अनेकांना वाटू शकते की हे औषधांविरोधातील पुस्तक आ...

प्रत्येक जेवणानंतर फक्त 'एक मिनिट' जिना चढणे !

  ब्लॉग नं. 2026/2 75 .  दिनांक: 4 ऑक्टोबर , 2026.   मित्रांनो , प्रास्ताविक मुख्य मुद्दे पायऱ्या चढणे: जेवणानंतर पायऱ्या चढण्याच्या फक्त 1-3 मिनिटांमुळे जेवणानंतरच्या रक्तातील ग्लुकोज 14-18 मिलीग्राम / डीएल कमी होऊ शकते, कारण स्नायू इंसुलिनवर अवलंबून न राहता उर्जेसाठी ग्लूकोजचा वापर करतात. हलका एरोबिक व्यायाम: नियमित मध्यम-तीव्रतेच्या क्रियाकलापांमुळे fasting ग्लूकोज, जेवणानंतरचे स्पाइक्स आणि Hba1C कमी होते, ज्यामुळे पूर्व-मधुमेहापासून मधुमेहापर्यंत प्रगती रोखण्यास मदत होते. हायड्रेशन आणि श्वासोच्छ्वास: पुरेसे पाणी पिण्यामुळे मूत्रपिंडातील ग्लुकोज साफ होण्यास मदत होते, तर हळू, खोल श्वासोच्छ्वास तणाव हार्मोन्स कमी करतो, एकूणच चयापचय संतुलनास मदत करतो. सविस्तर आरोग्याची नवी गुरुकिल्ली: जेवणानंतर फक्त ' एक मिनिट ' जिना चढणे ! आजच्या धावपळीच्या आणि व्यस्त जीवनशैलीमध्ये स्वतःसाठी वेळ काढणे अनेकांसाठी कठीण झाले आहे. मला आठवतंय काही दिवसांपूर्वी मी लिहिले होते की, "प्रत्येक जेवणानंतर क...

वृद्धापकाळात आत्महत्येच्या विचारांचा धोका का वाढतोय?

  ब्लॉग नं. 2026/2 74 .  दिनांक: 3 ऑक्टोबर , 2026. मित्रांनो , प्रास्ताविक वृद्धापकाळात आत्महत्येच्या विचारांचा धोका का वाढतोय ? मानसोपचार तज्ज्ञ काय सांगतात ? मित्रांनो,             कालच मी माझ्या ब्लॉगमध्ये,मी सेवानिवृत्त झालेल्या किंवा होऊ घातलेल्या व्यक्तींसाठी मी लिहिलेल्या “आशयघन निवृत्ती” या पुस्तकाचा संक्षिप्त परिचय करून दिला. सेवानिवृत्त पश्चात सुखी जीवन म्हणजे केवळ चांगले शारीरिक आरोग्य नव्हे तर चांगले मानसिक आरोग्य, मिळविण्यासाठी काय काय करावे याबद्दल मार्गदर्शन या पुस्तकाद्वारे केले आहे.आणि नेमकी आजचं माझ्या वाचनांत ही बातमी यावी आणि आज मी त्यावर ब्लॉग लिहितो आहे, काय म्हणायचं याला.सविस्तर माहिती करून घेऊ,आजच्या ब्लॉगमध्ये.            सविस्तर दिल्लीचे माजी मुख्य सचिव राकेश मेहता यांनी वयाच्या 75 व्या वर्षी आपली जीवनयात्रा संपवली . नोएडा येथील राहत्या घरी त्यांचा मृतदेह आढळून...

सेवानिवृत्ती की पुनर्जन्म? जाणून घ्या.

  ब्लॉग नं. 2026/2 73 .  दिनांक: 2 ऑक्टोबर , 2026.   मित्रांनो , प्रास्ताविक AI च्या मदतीने केलेले हे पुस्तक परिक्षण. आशयघन निवृत्ती: निवृत्तीनंतरच्या समृद्ध आणि अर्थपूर्ण प्रवासाचा मार्गदर्शक ग्रंथ निवृत्ती हा शब्द उच्चारताच,अनेकांच्या मनात एकाच वेळी दोन परस्परविरोधी भावना दाटून येतात ; एक म्हणजे वर्षानुवर्षे केलेल्या धावपळीतून मिळणारा सुटकेचा दिलासा आणि दुसरी म्हणजे त्यानंतर काय? असा प्रश्न निर्माण करणारी अस्वस्थता . समाज आपल्याला सांगतो की,आता वयाची साठी गाठली आहे , त्यामुळे आता विश्रांती घ्या आणि शांत बसा. पण प्रश्न असा पडतो की , शरीर थकले तरी मन कधी निवृत्त होते का ? या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर आणि निवृत्तीनंतरच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारे सुंदर पुस्तक म्हणजे ‘ आशयघन निवृत्ती’ . आजच्या ब्लॉगमध्ये पुस्तकाबद्दल सविस्तर जाणून घेऊ. सविस्तर ज्येष्ठ लेखक आणि बँक ऑफ इंडियाचे सेवानिवृत्त अधिकारी प्रसाद नातू,यांनी आपल्या स्वतःच्या आणि इतरांच्या प्रदीर्घ अनुभवातून हे पुस्तक साकारले आ...