ब्लॉग नं. 2026/1 71. दिनांक: 20 जून, 2026. मित्रांनो, संध्याकाळी 5 नंतरच्या ' या ' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर दिवस मावळत असताना , आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं , तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते , संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता , त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर ( Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ. सविस्तर: ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या एका अहवालानुसार , आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते , तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी , रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो. आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या ...
ब्लॉग नं: 2025/173. दिनांक: 23 जून , 2025. मित्रांनो , आपल्याला ठराविक अवधि नंतर हेल्थ रिपोर्ट घ्यावे लागतात.या हेल्थ रिपोर्ट रक्ताचे sample घेतांना दंडात सुई टोचून रक्त घेतले जाते.रक्त घेणाऱ्याचा हात हलका असेल तर, त्याचा त्रास होत नाही.हात जड असल्यास वेदना होतात. काही वेळा नस न सापडल्याने तो ट्रायल आणि एरर पद्धतीने विविध ठिकाणी सुई डोकहून रक्त घेण्याचा प्रयत्न करतो,हे सारं त्रासदायक असतं,त्यामुळे रक्त तपासणीसाठी रुग्णालयात जाणे, म्हणजे अनेकांसाठी भीतीदायक अनुभव ठरतो. पण जर रक्त काढण्याची गरजच उरली नाही , तर ? हो आजचा ब्लॉग या विषयावर आधारित आहे. सविस्तर: हैदराबादच्या निलोफर हॉस्पिटलने,भारतातील पहिले एआय-आधारित , नॉन-इनवेसिव्ह म्हणजे सुई न टोचता,रक्त निदान साधन तयार केले आहे. ‘अमृत स्वस्थ भारत’ नावाचा हा नवा तंत्रज्ञान चमत्कार,केवळ एका सेल्फीद्वारे संपूर्ण शरीराची तपासणी करू शकतो. तंत्रज्ञान कसे कार्य करते ? या प्रक्रियेचा आधार म्हणजे फोटोप्लेथिस्मोग्राफी ( PPG) तंत्रज्ञान.सोप्या भाषेत , हे तंत्र त्...