ब्लॉग नं:2025/172.
दिनांक: 22 जून, 2025.
मित्रांनो,
कधी तरी
तुम्ही आणि तुमच्या घरातील सदस्य किंवा जोडीदार,यांच्यात एसीच्या
तापमानावरून वाद झाला असेल. टीम 18°C च्या सदस्यांना थंडगार वातावरण हवे असते, तर टीम 24°C ला सौम्य थंडावा हवा असतो. मात्र,
लवकरच हे "शीतयुद्ध" संपुष्टात येऊ शकते.कारण केंद्र सरकार
संपूर्ण भारतात,एसी तापमानाचे नियमन लागू करण्याची योजना आखत आहे.आजचा ब्लॉग या विषयावर
आहे.
सविस्तर:
सरकारचा प्रस्ताव आणि
त्यामागील कारणे:
नवीन
प्रस्तावानुसार,एसीचे आता 20°C
पेक्षा कमी किंवा 28 °C पेक्षा जास्त तापमान
सेट करता येणार नाही.सरकारचा हेतू कोणाच्या झोपेची काळजी घेणे नसून वीज बचतीचा
आहे.2010 पासून,भारतात एसी वापरणाऱ्या घरांची संख्या तिप्पट झाली आहे.परिणामी,
विजेची मागणीही 20% ने वाढली आहे. भारतात सध्या थंड होण्यासाठी
वापरण्यात येणाऱ्या विजेचे प्रमाण एकूण विजेच्या 10% इतके आहे.
एसी तापमान आणि ऊर्जा बचत:
एसी
तापमान 24-26°C दरम्यान
ठेवले तर वीजेची बचत होऊ शकते.तापमान 20°C वरून 24°C पर्यंत वाढवल्यास वीज वापर 24% पर्यंत कमी होतो. यामुळे ग्राहकांचे विजेचे
बिल कमी होऊन,देशाला लाखो कोटी रुपयांची बचत करता येईल.
इतर देशांत काय आहे:
इटली,स्पेन,जपानसारख्या
देशांनीही,सार्वजनिक ठिकाणी एसी तापमान नियंत्रित करण्याचे नियम लागू केले आहेत.
मात्र, भारतीय हवामानातील उष्णता आणि आर्द्रता लक्षात घेता,आपल्याला वेगळ्या उपायांची गरज आहे.
रस्त्यांवरील उष्णतेचा
परिणाम आणि उपाय:
भारतातील
डांबरी रस्त्यांमुळे उष्णता शोषली जाते आणि आसपासच्या परिसराचे तापमान वाढते. यावर
उपाय म्हणून थंड पृष्ठभागाचा वापर, पांढऱ्या रंगाचा कोटिंग, तसेच
उष्णता-प्रतिबंधक रस्ते वापरण्याचे प्रयोग होऊ शकतात. ठाणे आणि लॉस एंजेलिसमधील
उदाहरणे यशस्वी ठरली आहेत.
भारतीय वास्तुकला:
उपायांचा वारसा
भारतीय
पारंपरिक वास्तुकलेतून प्रेरणा घेऊन,उष्णतेचा परिणाम कमी करण्याचे उपाय करता येऊ
शकतात.जाली,जाड भिंती,सावली देणारे डिझाइन अशा गोष्टी उष्णतेपासून संरक्षण करतात.नोएडातील
मायक्रोसॉफ्टच्या ऑफिसने जाली-आधारित डिझाइन वापरून LEED प्लॅटिनम
रेटिंग मिळवले आहे.
कर धोरणांमध्ये सुधारणा:
सध्या
एसीला 28% GST लागू
आहे. यामुळे स्वस्त आणि कमी कार्यक्षम मॉडेलला प्राधान्य दिले जाते. परंतु,एसीच्या कार्यक्षमतेवर आधारित कर धोरण राबवले तर ग्राहक अधिक कार्यक्षम
मॉडेल निवडतील, ज्यामुळे विजेची आणि खर्चाची बचत होईल.
संपूर्ण दृष्टीकोनाची गरज
सरकारने
केवळ एसी तापमान नियंत्रित न करता,रस्ते,घरे,शहरे
यांची रचना,तसेच कर धोरणांमध्ये सुधारणा केली, तर वीज बचतीसाठी व्यापक उपाययोजना करता येईल.शेवटी, ही
योजना दीर्घकालीन लाभासाठी उष्णता नियंत्रित करण्याचा एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.
समारोप:
एसीच्या तापमानाचे नियमन करून जर ग्राहकांचे पैसे वाचत असतील
आणि त्यासोबत विजेची बचत होत असेल तर सोने पे सुहागा. इतर देशातील अशा चांगल्या
गोष्टींचे अनुकरण केले गेले तर चांगलेच आहे.असं मला वाटतं.तसेही खूप कमी तापमान ठेवणे
हे आरोग्यासाठी चांगले नाही.त्यासोबत मला असं वाटतं की दर वर्षी एसीचा मेंटेनेंस केला
तर देखील वीचेची आणि पर्यायाने पैश्याची बचत होऊ शकते.
आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि
आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.
प्रसाद
नातु, पुणे.

सुंदर माहिती दिली आपण साहेब.
ReplyDeleteछान माहिती
ReplyDelete🙏R R J
ReplyDelete