ब्लॉग नं:2025/173.
दिनांक: 23 जून, 2025.
मित्रांनो,
आपल्याला
ठराविक अवधि नंतर हेल्थ रिपोर्ट घ्यावे लागतात.या हेल्थ रिपोर्ट रक्ताचे sample घेतांना दंडात सुई टोचून रक्त घेतले
जाते.रक्त घेणाऱ्याचा हात हलका असेल तर, त्याचा त्रास होत नाही.हात जड असल्यास वेदना
होतात. काही वेळा नस न सापडल्याने तो ट्रायल आणि एरर पद्धतीने विविध ठिकाणी सुई डोकहून
रक्त घेण्याचा प्रयत्न करतो,हे सारं त्रासदायक असतं,त्यामुळे रक्त तपासणीसाठी रुग्णालयात जाणे, म्हणजे अनेकांसाठी
भीतीदायक अनुभव ठरतो. पण जर रक्त काढण्याची गरजच उरली नाही, तर? हो आजचा ब्लॉग
या विषयावर आधारित आहे.
सविस्तर:
हैदराबादच्या
निलोफर हॉस्पिटलने,भारतातील पहिले एआय-आधारित,नॉन-इनवेसिव्ह म्हणजे सुई न टोचता,रक्त निदान साधन तयार केले
आहे. ‘अमृत स्वस्थ भारत’ नावाचा हा नवा तंत्रज्ञान चमत्कार,केवळ एका सेल्फीद्वारे
संपूर्ण शरीराची तपासणी करू शकतो.
तंत्रज्ञान कसे कार्य करते?
या
प्रक्रियेचा आधार म्हणजे फोटोप्लेथिस्मोग्राफी (PPG) तंत्रज्ञान.सोप्या भाषेत,हे तंत्र
त्वचेवरील प्रकाश कसा परावर्तित होतो,याचे निरीक्षण करते आणि
त्वचेखालील रक्तप्रवाहातील बदलांचा मागोवा घेतो. एआयच्या मदतीने या बदलांचे
विश्लेषण करून रक्तदाब,ऑक्सिजन संपृक्तता, हृदय गती, हिमोग्लोबिन A1c (मधुमेह
निदर्शक), आणि मज्जासंस्था ताण पातळी यासारखी माहिती केवळ 30
सेकंदांत मिळवता येते.
ग्रामीण भारतासाठी
क्रांतिकारी उपाय:
ग्रामीण
भागातील आरोग्यसेवा व्यवस्थेत निदान हे मोठे आव्हान आहे.राष्ट्रीय आरोग्य प्रोफाइल
2023 नुसार, फक्त 12% प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये निदान प्रयोगशाळा
आहेत.परिणामी, अनेक रुग्ण कमी दर्जाच्या खाजगी
प्रयोगशाळांकडे वळतात,ज्यामुळे विलंबित निदान आणि अधिक
खर्चाचा सामना करावा लागतो.
नॉन-इनवेसिव्ह
निदान उपकरणामुळे या समस्या सुटण्यास मदत होऊ शकते. भारताने विकसित केलेला हा
दृष्टिकोन मोबाईल-फर्स्ट, परवडणारा
आणि सार्वजनिक आरोग्यासाठी उपयुक्त आहे, जो जागतिक
बाजारपेठेत वेगळा ठरेल.
पर्यावरणीय परिणाम आणि
आव्हाने
दररोज 700
टनांहून अधिक,बायोमेडिकल कचरा तयार करणाऱ्या देशासाठी, निदान प्रक्रियेतून कचरा कमी करणे,ही
मोठी जमेची बाजू ठरते. मात्र, अचूकता, डेटा
गोपनीयता आणि विश्वासार्हता या क्षेत्रात अजूनही सुधारणा आवश्यक आहेत.
समारोप:
नॉन-इनवेसिव्ह
(सुई न टोचता) रक्त तपासणी,हे तंत्रज्ञान
भारतासाठी आरोग्यसेवेतील मोठा टप्पा ठरू शकतो. कमी वेळेत,कमी खर्चात,आणि
कमी त्रासदायक पद्धतीने,निदान प्रक्रिया पार पडल्याने रुग्णालये,खासगी क्लिनिक, आणि ग्रामीण आरोग्य केंद्रे या
सर्वांसाठी नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.
जर भविष्यात
रक्त तपासणीसाठी सुईचा वापर होणार नसेल, तर आरोग्य तपासणी निश्चितच सोपी, जलद,
आणि कमी त्रासदायक होईल. तुम्ही अशा चाचणीवर विश्वास ठेवू शकाल का,जिथे
तुमच्या रक्ताची गरजच नाही?
आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि
आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.
प्रसाद
नातु, पुणे.

नवीन माहिती कळली.असे झाले तर खरंच खूप बरे होईल. अनेकजणांना सुईची भीतीअसते त्यामधून मुक्तता होईल.शिवाय मेडिकल कचरा कमी होईल
ReplyDeleteही माहिती खरंच अनमोल आहे जेणेकरून आपल्यालाच नवनवीन गोष्टी माहीत होतात.
ReplyDeleteछान नवीन माहिती समजली
ReplyDeleteछान माहिती
ReplyDeleteपण लोक लगेच विश्वास ठेवनार नाही
RR