ब्लॉग नं. 2026/1 71. दिनांक: 20 जून, 2026. मित्रांनो, संध्याकाळी 5 नंतरच्या ' या ' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर दिवस मावळत असताना , आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं , तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते , संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता , त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर ( Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ. सविस्तर: ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या एका अहवालानुसार , आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते , तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी , रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो. आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या ...
Blog No. 2024/ 1 32 . Date: 25 th ,June 2024 मित्रांनो, कालच्या लोकसत्तात एक बातमी छापून आली.एलटीटी- कोचूवेली गरीबरथ एक्सप्रेसला लिंक हॉफमॅन बुश कोच जोडले जाणार आहेत.ही बातमी मी सकाळी वाचली. पण आजकाल माझ्या ब्लॉगचे वाचकच मला सुचवित असतात की,एखाद्या विषयावर ब्लॉग लिहा.म्हणून खरं तर आजचा ब्लॉग लिहितोय,एलएचबी रेल्वे कोचेसवर. सविस्तर: Linke-Hofmann-Busch (LHB) कोच हा भारतीय रेल्वेचा एक प्रवासी कोच आहे,जो जर्मनीच्या Linke-Hofmann-Busch ने विकसित केला आहे. आता ज्याचे निर्माण कपूरथला , चेन्नई आणि रायबरेली येथील रेल्वे कोच उत्पादन युनिट्सद्वारे केले जाते.हे डबे 2000 पासून भारतीय रेल्वेच्या 1 , 676 मिमी (5 फूट 6 इंच) ब्रॉडगेज नेटवर्कवर वापरले जात आहेत.सुरुवातीला , शताब्दी एक्स्प्रेसमध्ये वापरण्यासाठी जर्मनीतून 24 वातानुकूलित डबे आयात करण्यात आले , त्यानंतर तंत्रज्ञान हस्तांतरणानंतर, रेल्वे कोच कारखान्याने उत्पादन सुरू केले. भारतीय रे...