Skip to main content

Posts

'या' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर

ब्लॉग नं. 2026/1 71.   दिनांक: 20 जून, 2026. मित्रांनो, संध्याकाळी 5 नंतरच्या ' या ' 6 सवयी वाढवू शकतात तुमच्या रक्तातील साखर दिवस मावळत असताना , आपल्यापैकी बहुतेक जण कोणताही विचार न करता,आपल्या नेहमीच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात किंवा आरामात रमून जातात.कुणी टीव्ही पाहत बसतं , तर कुणी मोबाईल स्क्रोलिंग करतं. पण आहारतज्ज्ञांच्या मते , संध्याकाळी 5` वाजल्यानंतर तुम्ही जे काही करता , त्याचा तुमच्या रात्रीच्या रक्तातील साखरेवर ( Blood Sugar) आणि सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या आकड्यांवर आश्चर्यकारकपणे मोठा परिणाम होऊ शकतो.चला याबद्दल आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊ.    सविस्तर: ' ईटिंगवेल ' (EatingWell) च्या एका अहवालानुसार , आपल्या शरीराचं अंतर्गत घड्याळ,संध्याकाळनंतर ग्लुकोजवर प्रक्रिया करण्याची क्षमता बदलतं.जसजशी संध्याकाळ पुढे सरकते , तसतसं आपलं शरीर कमी इन्सुलिन तयार करतं आणि त्याला कमी संवेदनशील बनतं.परिणामी , रात्री साखर अचानक वाढण्याचा आणि सकाळी ती विस्कळीत होण्याचा धोका वाढतो. आहारतज्ज्ञ मिशेल रौथेनस्टाईन आणि अलिसा पॅचेको यांनी,अशा 6 सामान्य सवयी सांगितल्या ...

आयसीसी वर्ल्ड कप फायनल भारत वि ऑस्ट्रेलिया

  Blog No.2023/290 Date: -19 th , November 2023.   मित्रांनो,             आज आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2023  ICC World Cup 2023  चा अंतिम सामना/मॅच खेळली जाणार आहे.5 ऑक्टोबर, 2023 पासून सुरू झालेला हा भव्य दिव्य सोहळा/ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यापर्यन्त पोहोचली आहे . स्पर्धेतील अंतिम सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया India vs Australia असा,अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. साखळी सामन्यातील 9 पैकी 9 सामने जिंकून उपांत्य फेरीत पोहोचलेल्या भारताने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला.तर दुसऱ्या बाजूला साखळी सामन्यातील 9 पैकी 7 सामने जिंकून उपांत्य फेरीत पोहोचलेल्या ऑस्ट्रेलियाने रंगलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 3 विकेटसने पराभव करीत अंतिम फेरी गाठली आहे.   प्रास्ताविक             ऑस्ट्रेलिया आजपर्यन्त 5 वेळा आयसीसी वर्ल्ड कपचा विजेता राहिलेला आहे आणि त्यांनी या वेळेला आठव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आह...

ChatGPT चे एक वर्ष

  Blog No.2023/289 Date: -17 th , November 2023. मित्रांनो,             याच वर्षी 8 फेब्रुवारी,2023 ला ChatGPT वर एक ब्लॉग लिहिला होता. त्या गोष्टीला आता बरेच दिवस काय आज 17 नोव्हेंबर म्हटले तर 9 महिने होऊन गेले.कारण ते 30 नोव्हेंबर 2022 रोजी लॉन्च झाले. त्या वेळेला मला नव्यानेच ChatGPT बद्दल माहित झाले होते.आता मला याबद्दल बऱ्या पैकी माहित झाले आहे.एवढेच नव्हे तर मी त्याचा उपयोग देखिल करत असतो.म्हणून आज मी पुनः एकदा ChatGPT बद्दल हा ब्लॉग लिहीत आहे.   प्रास्ताविक                तुम्ही इंटरनेटचा वापर करत असाल, तर तुम्हाला निश्चितच ChatGPT बद्दल माहित असेल. Google Bard आणि Bing चॅट प्रमाणेच हे एक कृत्रिम बुद्धीमत्तेचे चॅटबॉट आहे ,ज्यावर विपुल प्रमाणात डेटा उपलब्ध करण्यात आला आहे. ChatGPT ला तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळवू शकता. ChatGPT ची उत्तरे कधीकधी शंकास्पद असतात.ती regenerate करुन त्यात बर...

प्रदूषणमुक्त फटाके- एक वास्तव?

  Blog No.2023/288 Date: -16 th , November 2023.   मित्रांनो,             मी माझ्या कालच्या ब्लॉगमध्ये शिवकाशीतील फटाका उद्योगाचा ओझरता उल्लेख केला होता. शिवकाशीतील फटाका उद्योगाला देशातील वाढत्या प्रदूषणाचा फटका बसला आहे. फटाक्यात वापरले जाणारे बेरियम हे हवेत मोठ्या प्रमाणात प्रदूषण करत असल्याने,सूप्रीम कोर्टाने बेरियमयुक्त फटाक्यांच्या उत्पादनावर बंदी घातल्याने हा उद्योग संकटात आला आहे. आज आपण बघूया की या उद्योगाची सुरुवात केव्हा आणि कशी झाली.   प्रास्ताविक             शिवकाशीतील फटाका उद्योग कसा अस्तित्वात आला हे जाणून घेणे महत्वाचे ठरेल.साधारणतः एकोणिसाव्या शतकातील दुसऱ्या दशकातील गोष्ट आहे.तेव्हाच्या मद्रास राज्यातील दोन तरुण चुलत भाऊ शनमुगा आणि अय्या नाडर यांनी सुरुवातीला काड्याची पेटी म्हणजे माचिसच्या फॅक्टरीमध्ये काम करण्यास सुरुवात केली.त्या नोकरीतून त्यांना जे काही शिकायला मिळाले,त्यातून त्यांच्या लक्षात आले की आपण जे काही शिकलो आहे, त्या शिक...

दिवाळी एक सण की व्यवसायाची संधी

  Blog No.2023/287 Date: -14 th , November 2023.   मित्रांनो,             आज बली प्रतिपदा. सध्या आपण दिवाळी किंवा दीपावली हा आपला सर्वात मोठा सण साजरा करत आहोत.या सणाला जसं पौराणिक महत्व आहे तसंच त्याला एक व्यवसायिक संबंधाची जोड देखिल आहे. खरीपाचा हंगाम संपून शेतकऱ्याच्या हाती चार पैसे येतात.पूर्वीच्या काळी सर्व काही शेतकऱ्याच्या हातच्या पैश्यावर अवलंबून असायचं आणि एकदा शेतकऱ्याच्या हातात पैसे आले की ते आपल्या मनात वर्षभरात साठवून ठेवलेली कामे सुरू करीत असत.यावर आहे आजचा ब्लॉग.   प्रास्ताविक             दिवाळी हा एक सण एक उत्सव आहे.कारण दिवाळी ही आपण साजरी करत असतो.दिवाळी साजरी करण्यामागे चार हातांना काम मिळणे हा उद्देश होताच.अगदी दिवाळीचा पहिला दिवस घेतला तर सुरुवात होत असे बाहेर रांगोळी काढण्यापासून ते त्यात रंग भरण्यापर्यंत, हे रांगोळी साहित्य आणि रांगोळीचे रंग तयार करणाऱ्या कारागिरांना काम आणि पैसे या निमित्ताने मिळत असतं.रांगोळी नंतर पणत्या लावल्या ज...

कार्य आणि कार्यपूर्तीची वेळ सांगड आवश्यक

  Blog No.2023/285 Date: -10 th , November 2023.   मित्रांनो,             आज लगेच दूसरा ब्लॉग लिहायचे कारण असे की, कॉंग्रेसचे एक नेता मनीष तिवारी यांनी इन्फोसिसचे सर्वेसर्वा श्री. नारायण मूर्ती यांनी सुरू केलेल्या “कर्मचाऱ्यांनी आठवड्यात 70 तास काम करावे” या चर्चेत उडी घेतली आहे.त्यांचे म्हणणे आहे लोकप्रतिनिधी तर रोज 12-15  तास काम करतात.याचा अर्थ कर्मचाऱ्यांनी करायला काय हरकत आहे. लोकप्रतिनिधींनी 12-15  तास काम करुन देश अजून विकासाच्या वाटेवरच आहे. तर देशाच्या संपूर्ण विकासासाठी त्यांनी 24 तास काम केले पाहिजे.असो.श्री. नारायण मूर्ती साहेब ज्या आयटी उद्योगाशी संबंधित आहे.त्या आयटीचे नवे गोंडस बाळ म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता.त्या कृत्रिम बुद्धिमत्तेचे म्हणजेच चॅटजीपीटीचे आठवड्यात 70 तास काम यावर काय म्हणणे आहे. ते वाचा चॅटजीपीटीच्याच शब्दांत.                             ...