Skip to main content

हायपोग्लायसेमिया, रक्तातील साखर अचानक कमी होणे

ब्लॉग नं. 2025/351. दिनांक: 15 डिसेंबर, 2025.    मित्रांनो,  डायबेटीस असलेल्या व्यक्तींना “साखर वाढते” या भीतीइतकीच आणखी एक गंभीर भीती असते,ती म्हणजे हायपोग्लायसेमिया , म्हणजेच रक्तातील साखर अचानक धोकादायकरित्या कमी होणे.ही स्थिती शरीराला ‘तत्काळ आपत्ती’ भासवते आणि योग्य वेळी उपचार न झाल्यास मेंदूवरही गंभीर परिणाम होऊ शकतात.याच विषयावर सविस्तर वाचा आजच्या ब्लॉगमध्ये. सविस्तर: हायपोग्लायसेमिया म्हणजे काय ? सामान्यतः , डायबेटीस असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 70 mg/dl खाली गेली तर आणि डायबेटीस नसलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर 50 mg/dl खाली गेली तर ही स्थिती हायपोग्लायसेमिया म्हणून ओळखली जाते.मानवी मेंदूला सतत ऊर्जेचा पुरवठा ग्लुकोज मधूनच होतो. त्यामुळे रक्तातील साखर अचानक कमी झाल्यावर मेंदूला “इमर्जन्सी सिच्युएशन” निर्माण झाल्यासारखे वाटते आणि शरीरात अनेक बदल घडतात. ⭐ हायपोग्लायसेमियाची सुरुवातीची लक्षणे: मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यावर पुढील लक्षणे दिसू शकतात, गोंधळ , चक्कर , विस्मरण, नकारात्मक विचार , नैराश्य, डबल व्हिजन / ब्लर म्हणजे अंधुक दिसणे, बोलण्यात अडथळा , ...

आयसीसी वर्ल्ड कप फायनल भारत वि ऑस्ट्रेलिया

 Blog No.2023/290

Date: -19th, November 2023. 

मित्रांनो,

            आज आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2023  ICC World Cup 2023  चा अंतिम सामना/मॅच खेळली जाणार आहे.5 ऑक्टोबर, 2023 पासून सुरू झालेला हा भव्य दिव्य सोहळा/ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यापर्यन्त पोहोचली आहे.स्पर्धेतील अंतिम सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया India vs Australia असा,अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. साखळी सामन्यातील 9 पैकी 9 सामने जिंकून उपांत्य फेरीत पोहोचलेल्या भारताने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला.तर दुसऱ्या बाजूला साखळी सामन्यातील 9 पैकी 7 सामने जिंकून उपांत्य फेरीत पोहोचलेल्या ऑस्ट्रेलियाने रंगलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 3 विकेटसने पराभव करीत अंतिम फेरी गाठली आहे. 

प्रास्ताविक

            ऑस्ट्रेलिया आजपर्यन्त 5 वेळा आयसीसी वर्ल्ड कपचा विजेता राहिलेला आहे आणि त्यांनी या वेळेला आठव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारताने ही स्पर्धा 1983 आणि 2011 अशी दोन वेळा जिंकली असून या वेळेस पाचव्यांदा आपण अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.भारत आणि ऑस्ट्रेलियाचा संभाव्य संघ असा  असणार आहे.

भारत (IND): रोहित शर्मा (c), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, KL राहुल (w), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज. 

ऑस्ट्रेलिया (AUS): डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (डब्ल्यू), ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स (सी), मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, अॅडम झम्पा. 

भारताची बलस्थाने

            भारताची बलस्थानांचा विचार करायचा झाला तर, रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, KL राहुल हे पहिले पाच बॅट्समन जबरदस्त फॉर्मात आहेत. सूर्यकुमार यादव आणि रविंद्र जडेजा हे वेळ पडल्यास चांगली फलंदाजी करू शकतात.हे त्यांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे.भारताच्या वेगवान त्रिकूटामधील मोहम्मद शमी हा 22 विकेटस घेत पूर्ण वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्त विकेटस पटकावणारा गोलंदाज ठरला आहे. जसप्रीत बुमराह हा आपल्या रन देण्यात कंजूषीमुळे सध्या गाजतोय.तर मोहम्मद सिराज हा देखिल ऐन मोक्याच्या क्षणाला विकेट काढून देत आहे. याशिवाय रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादवने आपल्या फिरकीने यावेळेस धूम केली आहे.थोडा काळजीचा विषय आहे तो काही सामन्यात भारताची फिल्डिंग अतिशय ढिसाळ झाली आहे.कॅच सोडणे हा त्यातील सगळ्यात कच्चा दुवा म्हणता येईल.तरी देखिल भारत हा वर्ल्ड कपसाठीचा प्रमुख दावेदार आहे असे म्हटले तर ते अतिशयोक्तीचे होणार नाही.   

ऑस्ट्रेलियाची बलस्थाने

              ऑस्ट्रेलियन्सची झुंजार आणि लढाऊ वृत्ती हे त्यांचे सर्वात मोठे बलस्थान आहे.अफगाणिस्तान विरुद्धची गेलेली मॅच,त्यांनी ग्लेन मॅक्सवेलच्या झुंजार द्विशतकी खेळीच्या जोरावर जिंकली हे विसरून चालणार नाही.डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (डब्ल्यू), ग्लेन मॅक्सवेल अशी त्यांच्याकडे बॅट्समनची फळी आहे. त्यांनी साखळी सामन्यात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत 7 मॅचेस जिंकल्या.पॅट कमिन्स,मिचेल स्टार्क,जोश हेझलवूड आणि कॅमेरॉन ग्रीन या जलदगती गोलंदाजांचा समावेश असलेला त्याचा तिखट मारा आणि त्याच्या जोडीला ग्लेन मॅक्सवेल आणि अॅडम झम्पा यांची जादुई फिरकी यांना कमी लेखून चालणार नाही.

            भारताने दोन्ही प्रकारे म्हणजे आधी फलंदाजी करुन आणि आधी गोलंदाजी करुन सामने जिंकले आहेत.पण अहमदाबादच्या खेळपट्टीवर देखिल टॉस हा निर्णायक ठरेल असे दिसते.टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याकडे भारताचा कर्णधार रोहित शर्माचा कल पहावयास मिळाला.उतरत्या उन्हात फिल्डिंग करायला लावून शारीरिक दृष्ट्या विरुद्ध संघाला थकविल्यानंतर,त्यांना फ्लड लाइटच्या प्रकाशात खेळवण्याची चाल यशस्वी झाल्याचे दिसले.रोहित शर्माची एक शतकी खेळी सोडली,तर त्याची फलंदाजीची नीती सुरुवातीला येऊन फटकेबाजी करुन प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांचे मानसिक दृष्ट्या खच्चीकरण करण्याची दिसते.त्याच्यानंतर येणारा विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि KL राहुल यांना याचा बराच फायदा झाल्याचे दिसून आले.इतक्यात तेवढा यशस्वी न ठरलेल्या मोहम्मद सिराज ऐवजी रविचंद्रन अश्विनला घेऊन त्याच्या अनुभवाचा फायदा रोहित शर्मा करून घेईल कां हे पाहणे देखिल औत्सुक्याचे ठरेल.कारण रविचंद्रन अश्विनने दोन दिवस कसून नेट प्रॅक्टिस केल्याचे वृत्त आहे.तसेच मिचेल स्टार्कने पॉवर प्ले मध्ये रोहित शर्माला आउट करण्याचे आव्हान देऊन त्याला ललकारले आहे. ही खरं तर ऑस्ट्रेलियन्सची वृत्ती आहे.तिला बळी पडता रोहित शर्मा त्यांचा प्रतिकार कसा करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.विजेत्या टीमला रोख बक्षीस रु. 33.00 कोटी मिळणार असून,उपविजेत्यास रु.16.64 कोटी मिळणार आहेत.दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडला अनुक्रमे रु. 6.65 कोटी,तर उरलेल्या सहा टीम म्हणजे इंग्लंड,पाकिस्तान,बांगलादेश, श्रीलंका,अफगाणिस्तान आणि नेदरलँडस् यांना प्रत्येकी रु.83.00 लाख मिळणार आहेत.यावरून टीकाकार टीका करतीलच पण ती ऐकून घेणे यातच खरे स्पोर्टसमन स्पिरीट आहे.                   

 सारांश

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 1 लाख 30 हजार प्रेक्षकांसमोर खेळणे हे जसे ऑस्ट्रेलियासमोर एक आव्हान आहे.तसेच याच 1 लाख 30 हजार प्रेक्षकांसमोर सर्वोत्तम खेळ करत वर्ल्ड कप 2023 जिंकणे हे भारतीय टीम समोर तेवढेच आव्हानात्मक असणार आहे,हे निश्चित.आता कोण जिंकेल अशी अटकळ लावत बसण्यापेक्षा,हा ब्लॉग पोस्ट केल्यापासून 8 तासांच्या आंत मॅच सुरू होत आहे. घोडा मैदान जवळ आहे.पण भारतच जिंकेल अशा पॉजिटिव्ह नोटवर आजचा ब्लॉग संपवितो. आजच्या ब्लॉगबद्दल तुमचे काय मत आहे ते कमेन्ट बॉक्समध्ये जरूर लिहा.

आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला,हे कमेन्ट बॉक्स मध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. स्वस्थ रहा,आनंदी रहा,मस्त जगा.  

 

प्रसाद नातु, पुणे.   

photo courtesy@mykhel  

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वजन कमी करण्यासाठी काय चांगले-गव्हाची पोळी की ज्वारीची भाकरी

Blog No. 2024/ 1 23 .   Date: 16 th ,June 2024 मित्रांनो,             मराठीत पोळी किंवा इतर प्रदेशात,विशेषतः हिन्दी बेल्टमध्ये ज्याला रोटी म्हणतात. ती पोळी किंवा रोटी आपल्या जेवणातील एक प्रमुख पदार्थ आहे.दक्षिण भारतात हा प्रकार तेवढा प्रचलित नाही.पण रोजच्या जेवणातील हा प्रमुख पदार्थ असल्याने ज्यांना वजन कमी करायचे आहे,त्यांना निश्चितपणे पोळी किंवा रोटी किती खावी आणि खावी तर कुठल्या पिठाची खावी, हा प्रश्न पडतो.अलीकडेच आहारतज्ञ रुचिता बत्रा यांनी आपल्या ईन्स्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी कुठले पीठ वापरावे याविषयी मार्गदर्शन केले आहे.त्याच विषयी आजच्या ब्लॉगमध्ये चर्चा करू. सविस्तर:             मराठीत पोळी , किंवा हिन्दीत रोटी , अशी अनेक भारतीय जेवणांमध्ये एक मुख्य पदार्थ असलेली पोळी, बनविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वापरले जाते.राजस्थानमध्ये , बाजरे की रोटी (मोती बाजरी) सामान्य आहे , तर पंजाबसारख्या प्रदेशात मैदा आणि इतर पिठापासून बनवलेले न...

आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण वेदांचे वचन

Blog No. 2023/98          Date: 21st , April 2023 .   मित्रांनो ,                आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्य तृतीया   साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभमुहूर्त समजला जातो . साडेतीन मुहूर्त असे दिवस असतात की   ज्या दिवशी कुठलेही कार्य करावयाचे असेल तर मुहूर्त पहायची गरज नाही. असे म्हणतात की ह्या तिथीला केलेले दान क्षयाला जात नाही म्हणजेच ते अविनाशी असते, या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अक्षय होते.हा दिवस पितरांचे ऋण फेडण्याचा आहे असेही म्हणतात.तर आजच्या दिवसाला एक अनन्य साधारण असे महत्व आहे.   प्रास्ताविक                माझा ह्या सऱ्यावर विश्वास नाही असे नाही पण त्या निमित्ताने जो ढोंगीपणा चालतो त्याचा मला मनापासून राग येतो.ज्याच्या स्वतःच्या मनातल्या वासना मरेपर्यंत संपत नाही असा वासनांवर विजय कसा मिळवायचा हे सांगू  लागतो. तेव्हा हसू येतं.जन्मभर पाप करीत फिरणारे चारोधाम यात...

प्रयागराजचा महाकुंभ-माझे अनुभव

ब्लॉग नं.2025/043   दिनांक: 12 फेब्रुवारी,2025.   मित्रांनो,             नुकतीच मी प्रयागराज,अयोध्या आणि वाराणसी या तीन, धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्थळांची यात्रा करून परतलो.यातील अयोध्या आणि वाराणसी या स्थळांची यात्रा आपल्याला केव्हाही करता येते/येईल. पण  प्रयागराज येथे सध्या म्हणजे 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी,या 26 दिवसांत महाकुंभ साजरा केला जात आहे. तसा तो दर 12 वर्षानी कुंभमेळा साजरा केला जातो. पण या वर्षीचा कुंभमेळा विशेष आहे. आणि जो 144 वर्षातून एकदाच होत असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्व आहे. आणि त्रिवेणी संगमावर या 45 दिवसांत जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे. आजच्या ब्लॉगमध्ये या विषयीच विषयी सारे काही. सविस्तर:             पुराणात असे सांगितले जाते की, देव आणि दैत्य किंवा सुर आणि असुर यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले.या युद्धाच्या दरम्यान समुद्र मंथन करण्यात आले,त्याचा एक हेतु हा होता की,समुद्रात दडलेले अमृत मिळवायचे,ज्याचे प्राशन के...